Monday, 30 April 2018

मानसिक स्थैर्य यासाठी काही सिद्धांत

डॉ . अल्बर्ट एलिस . अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच  केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले . आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .

१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात . त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले  आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो .

२) माणसाला वाटणारी भीती ही  कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते . ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते , परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते . पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही . म्हणजेच भीती हि काल्पनिक असते .

३)निराशा येणे ही  मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे तुम्ही स्वतःच निर्माण करता . जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती `तुम्हाला निराश करू शकत नाही . तुम्ही स्वतःच तसे वाटून घेता.यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये  स्वतःचे आयुष्य तोलू नका . तुमचे यश  हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते . तसेच तुमचे अपयश हे कुणाचेतरी  यश असू शकते . त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसर्यांशी करू नका .

४) जग काय म्हणेल हा विचार खोटा  आहे . प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो . आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू  द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे . कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता .

५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आहे . स्वतःचे अस्तित्व , आपले कुटुंबातील स्थान , समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर तुमचे कोणावाचून काहीही अडत नाही . दुसर्यांवर प्रेम जरूर करा पण त्या आधी स्वतःवर प्रेम करा .

६) स्वतःला स्वीकारा . तुम्ही जसे आहात तसे . आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा . संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका  . कारण आयुष्य अजून संपलेले नाही .  दुसर्यांच्या चुका तर तुम्ही नेहमीच माफ करता . कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा . जर तुम्ही स्वतःला स्वीकारलेत तरच जग स्वीकारेल .

७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात . त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा . दुसर्यांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नाका .

८  ) शारीरिक व्याधींशी सामना करताना बर्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते . अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका . कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा  पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार मनात करा . मानसिक संतुलन आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी महत्वाचे असते .

९) दुसऱ्या व्यक्तीच्या  विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर तुमचा ताबा असू शकत नाही . माणूस आपल्याला हवे तसे जगाने  बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो . परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर तुमचा ताबाच नाही त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही . तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता . वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे  फायद्याचे नसते . तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते . तसंच  अमुक एक व्यक्ती अशी का वागली ? याचा फार विचार न करता तुम्ही कसे वागायचे हे ठरवा .

१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र  बदलवू शकतो . फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे . हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ  आहे . कारण विचारांच्या बदलांना तुमचे स्वतःचेच विचार आड येत असतात . एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते . परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा तुमच्याकडे परतत नाही .

११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो . मानसिक नाही . तुम्ही  व्यक्तीवर हक्क सांगता म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर हक्क सांगता. त्याच्या मनावर आणि भावनांवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही . प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते .

हे  नियम कालाबाधित आहेत . म्हणूनच या थोर मानसोपचार तज्ञाला आदराने प्रणाम !

 

Friday, 27 April 2018

पत्नी मे सारे रिश्ते

🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
"रामलाल तुम अपनी बीबी से इतना क्यों डरते हो?"मैने अपने घरेलू नौकर से पुछा।।
"मै डरता नही मैडम उसकी कद्र करता हूँ उसका सम्मान करता हूँ।"उसने जबाव दिया।
मैं हंसी और बोली-" ऐसा कया है उसमें।ना सुरत ना पढी लिखी।"
जबाव मिला-" कोई फरक नही पडता मैडम कि वो कैसी है पर मुझे सबसे प्यारा रिश्ता उसी का लगता है।"
"जोरू का गुलाम।"मेरे मुँह से निकला।"और सारे रिश्ते कोई मायने नही रखते तेरे लिये।"मैने पुछा।
उसने बहुत इत्मिनान से जबाव दिया-
"मैडम जी माँ बाप रिश्तेदार नही होते।वो भगवान होते हैं।उनसे रिश्ता नही निभाते उनकी पूजा करते हैं।
भाई बहन के रिश्ते जन्मजात होते हैं , दोस्ती का रिश्ता भी मतलब का ही होता है।
आपका मेरा रिश्ता भी दजरूरत और पैसे का है पर,
पत्नी बिना किसी करीबी रिश्ते के होते हुए भी हमेशा के लिये हमारी हो जाती है अपने सारे रिश्ते को पीछे छोडकर।और हमारे हर सुख दुख की सहभागी बन जाती है आखिरी साँसो तक।"
मै अचरज से उसकी बातें सुन रही थी।
वह आगे बोला-"मैडम जी, पत्नी अकेला रिश्ता नही है, बल्कि वो पुरा रिश्तों की भण्डार है।
जब वो हमारी सेवा करती है हमारी देख भाल करती है , हमसे दुलार करती है तो एक माँ जैसी होती है।
जब वो हमे जमाने के उतार चढाव से आगाह करती है,और मैं अपनी सारी कमाई उसके हाथ पर रख देता हूँ क्योकि जानता हूँ वह हर हाल मे मेरे घर का भला करेगी तब पिता जैसी होती है।
जब हमारा ख्याल रखती है हमसे लाड़ करती है, हमारी गलती पर डाँटती है, हमारे लिये खरीदारी करती है तब बहन जैसी होती है।
जब हमसे नयी नयी फरमाईश करती है, नखरे करती है, रूठती है , अपनी बात मनवाने की जिद करती है तब बेटी जैसी होती है।
जब हमसे सलाह करती है मशवरा देती है ,परिवार चलाने के लिये नसीहतें देती है, झगडे करती है तब एक दोस्त जैसी होती है।
जब वह सारे घर का लेन देन , खरीददारी , घर चलाने की जिम्मेदारी उठाती है तो एक मालकिन जैसी होती है।
और जब वही सारी दुनिमा को यहाँ तक कि अपने बच्चो को भी छोडकर हमारे बाहों मे आती है
तब वह पत्नी, प्रेमिका, प्रेयसी, अर्धांगिनी , हमारी प्राण और आत्मा होती है जो अपना सब कुछ सिर्फ हमपर न्योछावर करती है।"
मैं उसकी इज्जत करता हूँ तो क्या गलत करता हूँ मैडम।"

मैं उसकी बात सुकर अवाक रह गयी।।
एक अनपढ़ और सीमित साधनो मे जीवन निर्वाह करनेवाले से जीवन का यह फलसफा सुकर मुझे एक नया अनुभव हुआ ।

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

नृसिंह भगवान जयंती

#आज_भगवान_नृसिंह_जयंती !

जागृत होई बा नरसिंहा
मत्त हा हिरण्यकश्यपू पहा ।।

मानवता बघ दावणीला लागली
शांती विकासाची गोष्ट ही मिटली।
खुळचटअहिंसा सिद्ध करण्या
किती बळी मागसी पुन्हा ।।

जागृत होई रे सिंह अवतारा
दैत्य ओकित आहे गरळा
काढी फाडूनी पुन्हा कोथळा
करी पराक्रम शिवनृपा परी हा।।

सिद्ध करी "साधू परित्राण"
त्रिशुल डमरू जटा उडवून
तिसरे नेत्र पुन्हा उघडून
करी शत्रुसी स्वाहा ।।

अहिंसा शोभे बलशाल्यासी।
न की शक्तिविहिन गांडुळासी।
शस्त्रसज्ज विजयी धुरंधरासी।
जयजयकारीती दिशा दहा।।

शनी साडेसाती

•••◆◆ साडेसाती ◆◆•••

या लेखात आपण साडेसाती म्हणजे काय? आणि साडेसाती मध्ये बारा राशीना शनि महाराज कसे फल देतात साडेसाती मध्ये आपण कोणते उपाय करावेत हे या लेखात पाहू

सतत अडचणी येऊ लागल्या ,की नकळत आपल्या तोंडातून  निघते की काय साडेसाती लागलीय .... कधी संपणार कोणास ठाऊक... ????

अनेकांनी मला साडेसाती म्हणजे नक्की काय अशी विचारणा केली. आणि हा प्रश्न आगदी रास्त आहे.
‘साडेसाती’ म्हणजे सरळ अर्थाने बघू गेल्यास एकूण साडेसात वर्षाचा कालावधी. ‘साडेसाती’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असल्यास प्रथम प्रत्येक ग्रहाचे प्रत्येक राशीतून होणारे भ्रमण म्हणजे काय हे ही समजून घेणे आवश्यक आहे. या लेखात मी हे सोप्या भाषेत परंतू ढोबळमानाने समजावून द्यायचा प्रयत्न करेन.

सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाचा सूर्याभोवतीच्या भ्रमणाचा / फिरण्याचा एक ठराविक कालावधी असतो. हा कालावधी सूर्याभोवतीच्या ३६० अंशात (गोलाकार) मेष ते मीन अशा बारा राशीत विभागलेला आहे. सूर्याभोवती भ्रमण करताना हे सर्व ग्रह वर्षाला ह्या बारा राशीतून भ्रमण करतात अशी कल्पना केली आहे. प्रत्येक ग्रहाची सूर्याभोवती भ्रमण करण्याची कक्षा वेगवेगळी असल्याने आणि प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून ठराविक अंतरावर असल्याने, प्रत्येक ग्रहाचा प्रत्येक राशीतून सूर्याभोवती भ्रमण करण्याचा कालावधीही साहजिकच वेगवेगळा आहे. आपण राशी शिकलो नसलो तरी सुर्य/ग्रहमाला आपण पूर्वी कधीतरी शाळा-कॉलेजात शिकलो आहे त्यामुळे हे लक्षात येईल.

चंद्राचं भ्रमण –
चंद्र हा जरी पृथ्वीचा उपग्रह असला तरी चंद्राला ज्योतीषशास्त्राने ग्रह मानला आहे आणि भ्रमणाचा सर्वात कमी कालावधी चंद्राचा आहे. चंद्र स्वतःभोवती व पृथ्वीभोवती भ्रमण करत असतो हे सर्वांनाच माहित आहे. पृथ्वी जसजशी सूर्याभोवती भ्रमण करते तसा पृथ्वीसोबत चंद्रही सूर्याभोवती भ्रमण करतो हे ही आपल्याला समजू शकतं. अशा चंद्राचा एका राशीतून भ्रमणाचा कालावधी साधारणत: २.२५ (सवा दोन) दिवसांचा आहे.

चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्म राशी मानण्याची भारतीय ज्योतिषशास्त्राची परंपरा आहे. सर्वात जास्त वेगवान चंद्र असल्याने चंद्राला मनाची उपमा दिली आहे. मन जसं कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी पोहोचतं किंवा कोणताही विचार करतं अन मनाला भारती-ओहोटीही येते तसाच चंद्रही दर दोन-अडीच दिवसांनी आपले रूप आणि राशी बदलतो आणि म्हणून माणसाची राशी चंद्रावरून पाहण्याची आपली प्रथा आहे. चंद्र मनाप्रमाणे चंचल आहे. चंद्राला स्त्री व जलतत्वाचं मानलं जातं..
आपले सण चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून असतात म्हणून सणाचे दिवस मागेपुढे होतात. अधिक महिनाही चंद्रभ्रमणाचं फल आहे. साडेसातीचा आणि चंद्राचा जवळचा संबंध आहे म्हणून हे लक्षात ठेवावं..!

सूर्य भ्रमण –
सूर्य कुठेही भ्रमण करत नसला तरी आपल्याला सूर्य रोज उगवताना व मावळताना दिसतो. म्हणजे पृथ्वीवरून पाहताना सूर्य भ्रमण करतो असे आपल्याला दिसते. सूर्य स्थिर असून प्रत्यक्षात पृथ्वी फिरत असते म्हणून आपण सूर्य बुडाला किंवा उगवला असे म्हणत असतो. ज्य्तोतीषशास्त्रात याला पृथ्वीभ्रमण न म्हणता सूर्य भ्रमण असे म्हणतात व सूर्याचा प्रत्येक राशीतून भ्रमणाचा कालावधी एक महिन्याचा असतो. एक वर्षात सूर्य सर्व १२ राशींचे भ्रमण पूर्ण करतो असे मानले जाते. मकर संक्रांति हे याचे उत्तम उदाहरण. दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रांत न चुकता येते. आपल्या इतर सणाप्रमाणे ही तारीख मागे-पुढे होत नाही कारण मकर संक्रांति म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश आणि तो दर वर्षी न चुकता त्याच दिवशी होतो. दरवर्षीच्या १४ जानेवारीपर्यंत सूर्य सर्व राशी फिरून मकर राशीत प्रवेश करतो. मतर राशीत सूर्याने केलेले संक्रमण म्हणून मकर संक्रांत..
ज्योतिष शास्त्रात सूर्य व चंद्र हे दोन महत्वाचे घटक असल्याने वर शक्य तेवढं विस्ताराने लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. शनि हा साडेसातीशी संबंधीत असल्याने त्याच्याबद्दल पुढील भागात विस्ताराने लिहीन. बाकी इतर ग्रहांचा राशी भ्रमणाचा वार्षीक कालावधी थोडक्यात देत आहे.
बुध ८८ दिवसांत यर्व १२ राशीतून भ्रमण करतो म्हणजे एका राशीत बुध साधारणत: ७-८ दिवस असतो. ग्रहांच्या भ्रमणाची कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने हा कालावधी जास्तीत जास्त १७-१८ दिवसाचा होतो. हा कालावधी चंद्राखालोखाल बुध वेगवान असल्याने चंचल वृत्तीचा मानला गेला आहे, तो त्याच्या या एका राशीत कमी दिवस राहाण्याच्या सवयीमुळे.

शुक्र २२५ दिवसांत सुर्य प्रदक्षिणा म्हणजे १२ राशीतून भ्रमण पूर्ण करतो. म्हणजे शुक्र एका राशीत सामान्यत: १८ ते जास्तीत जास्त २४-२५ दिवस असतो.
मंगळ सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: ६८७ दिवस घेतो. १२ राशींना ६८७ दिवस म्हणजे एका राशीत कमीत कमी साधारणत: ४५ दिवस ते जास्तीत जास्त ५७-५८ दिवस म्हणजे ढोबळ मानाने दोन महीने मुक्कामाला असतो.

तर गुरू सुर्य एका प्रदक्षिणेला १२ वर्षाचा कालावधी घेतो. याचा अर्थ गुरू एका राशीत एक वर्षभर असतो.
गुरूनंतर येतात शनीनहाराज, जे एका सूर्य प्रदक्षिणेला अदमासे २९-३० वर्ष घेतात. सूर्याभोवतालच्या १२ राशीतून भ्रमण करण्यासाठी ३० वर्ष तर एका राशीत मुक्राम २.५ वर्ष होतो.

गुरूपर्यंतचे हवेहवेसे वाटणारे ग्रह फार तर वर्षभरात मुक्काम हलवतात आणि नको असलेला शनीसारखा पाहूणा मात्र २.५ वर्ष राहातो. नुसती २.५ वर्ष असती तरी आपण ढकलली असती परंतू तो ७.५ वर्ष पिडणार या ‘समजूतीने’च आपण खलास होतो. ही ७.५ वर्षांची भानगड काय आहे हे पुढील भागात समजावतो. ते नीट कळावं यासाठी हा लेखनप्रपंच..!

हर्षल, नेपच्यून प्लुटो हे एका राशीत अनुक्रमे ७, १६ व २४ वर्ष राहातात आणि
राहू व केतु हे अठरा महिने एका राशीत
राहतात पण आपल्याला या ग्रहांचा साडेसाती या विषयात अभ्यास करण्याची आवश्यकता नाही.

साडेसाती म्हणजे काय?

आपला जन्म चंद्र ज्या राशीत असतो त्याला आपली जन्मराशी असे म्हणतात. बारा राशींपकी आपली कोणतीही राशी असू शकते. भारतीय लोकांना जन्मराशी सहसा माहीत असते. या राशीच्या अगोदरच्या राशीत तो आला की साडेसाती सुरू होते. आपल्या जन्मराशीत आला असता साडेसातीचा मध्य असतो आणि त्याच्या पुढच्या राशीत आहे तोपर्यंत हा तिसरा टप्पा असतो आणि अशी ही साडेसाती चालू असते. शनी एका राशीत साधारणपणे अडीच र्वष असतो. म्हणजे आपल्या राशीच्या अगोदरच्या राशीतली अडीच वष्रे ही पहिली अडीचकी. आपल्या राशीतला अडीच वर्षांचा काळ ती मधली अडीचकी आणि आपल्या पुढच्या राशीत असलेला शनीचा अडीच वर्षांचा काळ ही तिसरी अडीचकी. अशा तीन अडीचकी मिळून साडेसात र्वष अशी ही साडेसाती असते. सर्वसाधारण तीन साडेसातींचा काळ मनुष्याला अनुभवावा लागतो. आणि शतायुषी असणाऱ्यांना कदाचित चार साडेसातीही पाहता येते.

शनि म्हटले की सर्वांच्या अंगावर काटा उभा रहातो, नाहक भीती वाटू लागते. त्यातच टी. व्ही. वर शनि बद्दल कोणी ना कोणी काही ना काही तरी बोलतच असतात. त्यातून काही तरी माहिती मिळते - शनि म्हणजे वाईट, खराब, प्रत्येक बाबतीत विलंब...त्यातच शनिची साडेसाती, शनिची दृष्टी, शनिचा प्रभाव...वगैरे वगैरे....म्हणजेच थोडक्यात लोकाना भरपूर घाबरवले जाते...पण खरे सांगायचे झाले तर शनि सारखा प्रामाणिक,न्याय देणारा, आध्यात्मिक,सचोटीने व सातत्याने काम करणारा, संशोधनवृत्ती असणारा दूसरा कोणताही ग्रह ग्रहमालेत नाही. ज्योतिषशास्त्रीयदृष्टया शनि हा वायुतत्वाचा तसेच मकर व कुंभ राशींचा अधिपती आहे.त्याची आवडती रास कुंभ आहे 

शनि संस्कराचा बराचसा भाग पत्रिकेत दाखवत असतो. हा ग्रह पुर्वकर्मांचा व प्रारब्धाचा कारक आहे. बरयाच कालावधिने घडणारया गोष्टी शनि दाखवतो..... पण त्याचबरोबर अनेक कष्ट करण्याची ,दिर्घोद्योगाची चिकाटी शनि जवळ आहे. उत्तम प्रकारचे नियोजन,सुत्रबद्ता,सुसंगता उभी करणारा असा आहे. मोठमोठी, प्रचंड, यशस्वी,दूरगामी परिणाम करणारी कामे शनिच करू शकतो. तरीही शनिला नेहेमी हिणवले जाते त्याचे वाईट वाटते...

साडेसाती : शनिची साडेसाती बापरे....कधी दुसरया ग्रहाची साडेसाती ऐकली आहे का तुम्ही ?? त्याचे कारणही तसेच आहे.....

शुक्र, चंद्र, सूर्य, गुरु, बुध इ.ग्राहांबद्द्ल नेहेमीच चांगले वाचत आलो आहोत आपण.....ते ग्रह पत्रिकेत कशी चांगली फळ देतात ते तर अनेक ज्योतिषांकडून ऐकलेलेही असेल. पण मला असे वाटते की हे सर्व ग्रह हे फसवे आहेत...कारण जीवनाची खरी बाजू दाखवण्याची ताकद ही फक्त शनितच आहे....

साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालखंड. आपल्या मागची रास,आपली रास व त्याच्या पुढील रास अशा तीन राशीतून जेंव्हा शानिचे भ्रमण होते असते तेंव्हा त्याला साडेसाती असे म्हणतात. शनीला एक राशी भोगण्यास अडीच वर्ष लागतात. अर्थात तीन राशी भोगण्यास साडेसात वर्ष लागतात...म्हणजे समजा तुमची राशी मकर आहे....त्याच्या आधीची राशी आहे धनु.......म्हणजेच जर शनिने मकर राशीत प्रवेश केला तर धनु, मकर आणि कुंभ  ह्या तिन्ही राशीना साडेसाती सुरु झाली.
पण साडेसातीचाही खुप बाऊ केला जातो, साडेसाती म्हणजे वाईट घडणारया गोष्टींचा काळ, कुठलेही काम व्यवस्थीत होणार नाही, कामे रेंगाळत रहातील वगैरे ......पण खरे तर शास्त्रात असेही म्हटले आहे साडेसाती म्हणजे ह्या सर्व गोष्टी होणारच परंतु जी व्यक्ती सचोटीने काम करते... खोटे बोलत नाही.. आळस करत नाही .....न्यायाने वागते...त्या व्यक्तीना साडेसातीचा त्रास जाणवत नाही. पण खरे म्हटले तर आताच्या युगामध्ये हे सर्व पाळणे अशक्य आहे....सचोटीने काम करणारयालाच प्रमोशन मिळत नाही, खोटे तर दिवसातून कित्येकदा बोलावे लागते...मग ह्यावर उपाय काय ?? ह्यावरून मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की तुम्ही साडेसाती साडेसाती म्हणुन ज्या गोष्टीचा बाऊ करताय ती तर पन्नास-शंभर वर्षापूर्वीपासून आहे....मग आजच इतकी बोंबाबोंब का होते ?? ह्याला जबाबदार आपणच आहोत...ह्या बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे हे सर्व परिणाम आहेत......जेंव्हा एकत्र कुटुंबपद्धती होती तेंव्हा म्हातारया-कोतारयांपसून अगदी शेंबड्या पोरापर्यंत सर्व एकाच घरात...एकाच छताखाली रहात.....प्रामाणिकपणा होताच पण त्याच बरोबर त्याने सर्वांमध्ये एकप्रकारची बांधीलकी होती...प्रत्येकाकडून घरातल्या म्हातारया-कोतारयांची सेवा होत होती.... प्रेम होते, आपलेपणा होता आणि मुख्य म्हणजे पैशांचा हव्यास नव्हता. जे जसे चालू आहे त्यात सर्व सुख आणि समाधान मानून चालणारे होते.... आज हे सर्व नाही जमले तरी आपल्या आई- वडिलांची सेवा जरुर करू शकता...सेवा म्हणजे कमीत कमी त्यांच्याजवळ बसून काही वेळ जरी त्यांच्या बरोबर व्यतीत केला.... सुट्टीच्या दिवशी त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी नेले...हे जरी करू शकलो तरी त्यांना बरे वाटेल....तुम्हाला आशिर्वाद तर मिळेलच त्याच बरोबर एक समाधानही वाटेल...शनि हा वृद्ध व्यक्तींचा कारक आहे असे म्हटले जाते....जेव्हा तुमच्याकडून आई-वडिलांची किंवा कुठल्याही वृद्ध व्यक्तींची सेवा होते,त्यांना अपशब्द बोलले जात नाहीत....तेंव्हा असे म्हटले जाते शनिची कृपादृष्टी तुमच्यावर पडायला वेळ लागत नाही. उलटपक्षी साडेसातीत बरयाच लोकांचे भले झाले आहे.... शैक्षणिकदृष्टया व आर्थिकदृष्ट्या लोकांची प्रगती झालीआहे ... ....मोठमोठ्या उद्योजकांचे नवनवीन कारखाने उभे राहीले आहेत.............

ह्याचबरोबरीने अजुन एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनि हा जीवनाची खरी बाजू, खरे स्वरुप तुम्हाला जाणवून देतो...जेंव्हा साडेसातीची सुरवात होते तेंव्हा त्या लोकांना त्याची जाणीव होते ती एकामागोमाग होत असलेल्या संकटाच्या मालिकेतून ........ह्याच वेळी खरया अर्थाने आपली माणसे कोणती .....ऐनवेळी मदतीचा हात अपेक्षीत असताना आपल्याला सोडून जाणारी माणसे कोणती ते ह्याच वेळी लक्षात येते....
म्हणुन मला वाटते की एकदातरी माणसाच्या आयुष्यात साडेसाती यावी आणि त्याला त्याच्या खरया माणसांची ओळख पटावी...

साडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. अर्थात नखाला दुखापत झाली तरी पूर्ण शरीराला वेदना होतात तसं इथे होतं.
शनी ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह मानला गेला आहे परंतु मुळात तो तसा नाही. शनी न्यायी आहे आणि न्याय करताना तो अजिबात आपपरभाव करत नाही. शनी मृत्यूचा कारक आहे. साडेसातीत काही लोकांवर कठीण प्रसंग येतात हे खरे असलं तरी याच काळात आपलं कोण आणि परकं कोण याची नव्याने ओळख होते. साडेसातीच्या काळात आपले अनेक निर्णय चुकतात, योजना फसतात, अनेकदा नको हे जीवन असेही प्रसंग काही लोकांवर येतात परंतु स्वतःवर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसं यातून तावून सुलाखून बाहेर पडतात. म्हणजे शनी चिकाटी आणि सहनशीलता वाढवतो ज्याचा अंतिमतः आपल्याला फायदाच होतो..शनी वाईट काहीच करत नाही तर आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळ देतो. *शनीच्या स्वतःच्या राशी असलेल्या मकर आणि कुंभ या राशींना साडेसाती तेवढीशी वाईट जात नाही कारण शनीच्या असलेल्या ह्या राशी मुळात चिकाटी असलेल्या, मेहेनती असतात त्यामुळे ह्या राशीच्या लोकांना साडेसातीचा प्रभाव जाणवत नाही.

अर्थात शनीची चांगली-वाईट फळं मिळणं हे प्रत्येकाच्या कुंडलीतील मूळ ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. तसंच व्यक्तीच्या वयावरदेखील अवलंबून असतं. लहान मुलं किंवा फार वृद्ध व्यक्तींना साडेसाती अनुभवायला येत नाही कारण लहान वयात आपण आपल्या पालकांच्या पंखाखाली असतो तर वृद्धत्वात सर्व काही भोगून झाल्यामुळे साडेसाती आली काय आणि गेली काय, सारखंच अशी परिस्थिती असते.

आपले कोण व परके कोण?

साडेसातीमध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला कळून चुकते. खरीच आपली माणसे कोण आणि परकी कोण हे या काळात कळते. एरवी आपण ज्यांना मदत केली, ज्यांच्यासाठी आपला वेळ दिला, झुरत राहिलो, त्याच्या कल्याणासाठी झटत राहिलो ती माणसे या साडेसातीच्या काळात येतीलच असे नाही. आपल्या मताचा आदर ते राखतीलच असे नाही. त्यामुळे हेच का ते, असा प्रश्न पडतो आणि त्यामुळे मनस्ताप होतो. हा मनस्ताप एवढाच भाग खरे तर साडेसातीत असतो. पण कदाचित ज्याला आपण झिडकारले किंवा कमी महत्त्व दिले अशी एखादी व्यक्ती आपल्याला येऊन मदत करते. म्हणजे आपले नातेवाईक असो, परिचित असो वा मित्रपरिवार, खरेच आपले कोण आहेत हे दाखवून देणारी साडेसाती असते. स्वत:ची  व सर्व सगेसोयऱ्यांची खरी ओळख शनी करून देतो. त्यामुळे साडेसातीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकतो.

खरा त्रास याचाच…

खरे तर साडेसातीमध्ये फार काही अजब अघटित घडते किंवा संकटांची मालिका येते ही काल्पनिक भीतीच आपल्याला अस्वस्थ करत असते. साडेसाती असणाऱ्यांच्या मनात भयगंड निर्माण होतो. न्यूनगंडही निर्माण होतो. साडेसातीमध्ये आता आपले काही खरे नाही, अशा मानसिक भीतीमुळे येणारे मानसिक दौर्बल्य आपल्याला त्रास देत असते. मनस्ताप होतो. प्रत्यक्ष झाला नाही, कसल्याही दुर्घटना घडल्या नाहीत तरी या काल्पनिक भीतीचे सावट मनावर असते. मुख्यत: ते दूर ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.

साडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. अर्थात नखाला दुखापत झाली तरी पूर्ण शरीराला वेदना होतात तसं इथे होतं.
शनी ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह मानला गेला आहे परंतु मुळात तो तसा नाही. शनी न्यायी आहे आणि न्याय करताना तो अजिबात आपपरभाव करत नाही. शनी मृत्यूचा कारक आहे. साडेसातीत काही लोकांवर कठीण प्रसंग येतात हे खरे असलं तरी याच काळात आपलं कोण आणि परकं कोण याची नव्याने ओळख होते. साडेसातीच्या काळात आपले अनेक निर्णय चुकतात, योजना फसतात, अनेकदा नको हे जीवन असेही प्रसंग काही लोकांवर येतात परंतु स्वतःवर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसं यातून तावून सुलाखून बाहेर पडतात. म्हणजे शनी चिकाटी आणि सहनशीलता वाढवतो ज्याचा अंतिमतः आपल्याला फायदाच होतो..शनी वाईट काहीच करत नाही तर आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळ देतो. शनीच्या स्वतःच्या राशी असलेल्या मकर आणि कुंभ या राशींना साडेसाती तेवढीशी वाईट जात नाही कारण शनीच्या असलेल्या ह्या राशी मुळात चिकाटी असलेल्या, मेहेनती असतात त्यामुळे ह्या राशीच्या लोकांना साडेसातीचा प्रभाव जाणवत नाही.

अर्थात शनीची चांगली-वाईट फळं मिळणं हे प्रत्येकाच्या कुंडलीतील मूळ ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. तसंच व्यक्तीच्या वयावरदेखील अवलंबून असतं. लहान मुलं किंवा फार वृद्ध व्यक्तींना साडेसाती अनुभवायला येत नाही कारण लहान वयात आपण आपल्या पालकांच्या पंखाखाली असतो तर वृद्धत्वात सर्व काही भोगून झाल्यामुळे साडेसाती आली काय आणि गेली काय, सारखंच अशी परिस्थिती असते.

राशीनुसार साडेसातीचे टप्पे
26 जानेवारी नंतर शनि महाराज बारा राशीनुसार कसे फल आणि भ्रमण असणार ते पाहू

राशीफल
पहिला टप्पा - दुसरा - तिसरा -भ्रमण

मेष :- सम - अशुभ - शुभ -नववा(शुभ)

वृषभ :-अशुभ-शुभ-शुभ- अठवा(अशुभ)          

मिथून:- शुभ-शुभ- अशुभ-सतवा (शुभ)

कर्क:-शुभ-अशुभ-अशुभ-सहवा(मध्यम)

सिंह:-अशुभ-अशुभ-शुभ-पचवा (शुभ)

कन्या:-अशुभ- शुभ-शुभ-चौथा(अशुभ)

तूळ:-शुभ-शुभ-अशुभ- तिसरा(शुभ)

वृश्चिक:-शुभ-अशुभ-सम-दुसरा(शुभ)

धनु :- अशुभ-सम-शुभ- पाहिला(मध्यम)

मकर:-सम-शुभ-शुभ-बारावा(अशुभ)

कुंभ:-शुभ-शुभ-सम-अकरावा(शुभ)

मीन:-शुभ-सम-अशुभ-दहवा(मध्यम)

राशीनुसार तर शनि महाराज फल देताच
आणि जन्म कुंडली नुसार कोणत्या स्थानातुन शनि महाराज देणार हे पाहू
आपल्या जन्मकुंडली समोर ठेऊन फल
पाहा...

मेष लग्न असेल तर शनि तुमच्या भाग्यातुन जात आहे. दशमेश व्ययात जाण्याने नोकरीत उपद्रव घडेल पण पैशाची चिंता असणार नाही. जास्त मानसीक त्रास होईल.

वृषभ लग्न असेल तर शनि अष्टमातुन जात आहे. संकटे येणार आहेत. तयार राहा. पण आत्मविश्वास गमाऊ नका. यातुनही बाहेर पडणार आहात.

मिथुन लग्न असेल तर शनि सप्तमातुन जाणार आहे.  जोडीदाराशी जुळवुन घ्या. जोडीदाराच्या घरच्या मंडळींचा जास्त त्रास होईल. इलाज नाही.

कर्क लग्न असेल तर शनि षष्ठ स्थानातुन जाणार आहे. एखादी कोर्ट केस असेल तर बुध्दी चातुर्यावर ती जिंकाल. शनि सहाव्या स्थानी असताना शत्रु नांगी टाकतील.परिस्थीतीवर नियंत्रण ठेवा. कारण अष्टमेश सहाव्या स्थानातुन जाणार आहे. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

सिंह लग्न असताना शनि पंचम स्थानातुन जाणार आहे.  विद्यार्थी असाल तर अभ्यास जास्त करा. मुले शिकत असतील तर त्यांच्या शैक्षणीक प्रगतीवर लक्ष ठेवा.

कन्या  लग्न असेल तर शनि चतुर्थामधुन जाणार आहे. सुखाला ग्रहण लागेल. वहान त्रास देईल. घरात सुख रहाणार नाही. मातेशी पटणार नाही.

तुळा लग्न असेल तर शनि तृतीय स्थानातुन जाणार आहे. भावंडांशी वाद होतील किंवा त्यांची काळजी करावी लागेल. लेखनाने अडचणीत येणार नाहीना हे पहा.

वृश्चिक लग्न असेल तर शनि कुटुंब स्थानातुन जाणार आहे. कौटुंबीक विवाद तुम्हाला जास्त त्रास देतील. मातेला मनवण्यासाठी खुपच प्रयत्न करावे लागतील.

धनु लग्न असताना शनि तुमच्या लग्न स्थानातुन जाणार आहे. तुमच्या पर्सनालिटीत काही आश्चर्य कारक बदल होतील. तुम्ही बदलेले आहात असे सर्व म्हणतील. डायरी लिहा आणि हे बदल नोंद करा. धनु राशीला हे बदल आश्चर्यकारक असतील.

मकर लग्न असताना शनि तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानातुन जाणार आहे. व्यवसायीक असाल तर नुकसान संभवते. खर्च जोडीदारासाठी सुध्दा करावा लागेल.

कुंभ लग्न असताना शनि तुमच्या लाभातुन जाणार आहे. मनाप्रमाणे अनेक गोष्टी पुढील अडिच वर्षात असुन घडणार आहेत.

मीन  लग्न असताना शनि तुमच्या दशमातुन जाणार आहे. प्रसिध्दीला ग्रहण लागेल. नोकरीत अधिकार सोडावा लागतो की काय अशी परिस्थीती येईल.

गोचर भ्रमण नुसार शनिमहाराज हे
कन्या राशिला चौथा (अशुभ)
कर्क राशिला सहवा (अशुभ)
वृषभ राशिला अठवा (अशुभ)
मकर राशिला बारावा साडेसाती सुरूवात झाली आहे खालील उपाय करावेत

साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून शनि मंत्र म्हणावा असे म्हणतात . ह्या स्तोत्रांचा उपयोग संयम, परिपक्वता एखाद्या गोष्टीकडे तटस्थ दृष्टीने बघण्याची कुवत , मानसिक शांती ह्या दृष्टीने होत असावा त्यामुळे आपोआपच समस्या कमी वाटू लागतात किंवा समस्यांशी लढण्याचे बळ येत असावे .
साडेसाती म्हणजे शनि महाराजांची आपल्यावर वक्रदृष्टी झाली आहे. त्यामुळे आता आपलं कायं होणार? यावरच काही उपाय देखील आहेत.
शनिची प्रतिकूल अवस्था आपल्या दिनचर्येलासुद्धा प्रभावित करते. त्यामुळे आपल्या पत्रिकेत शनि दोष आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे.

पुण्यकालात शनि महाराजाचा दोष दूर करण्यासाठी उपाय करा:
-तेल, मोहरी, उडदाच्या दाळीचे दान करावे.
-श्री गनपती श्री हनुमान  श्री शनि  याना श्री रूद्र अभिषेक व
आराधना करावी.
-मांस- मद्य यांचे सेवन करू नये.
-दीन दुबळ्यांना मदत करावी.
-काळे वस्त्र परिधान करू नये. मात्र, काळ्या वस्तूंचे दान जरूर करावे. उदा. काळी तीळ, उडीद.

शनि मंत्र

ॐनीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् I
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् II

ध्यानम:-नीलाम्बर: शूलधर: किरीटी गृद्ध्स्थितस्त्रासकरो धनुश्मान.चतुर्भुज: सूर्यसुत: प्रशान्त: सदाअस्तु मह्यं वरदोअल्पगामी..

शनि गायत्री:-ॐ  कृष्णांगाय विद्य्महे रविपुत्राय धीमहि तन्न: सौरि: प्रचोदयात.

वेद मंत्र:-ॐ प्राँ प्रीँ प्रौँ स: भूर्भुव: स्व: ॐ शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शंय्योरभिस्त्रवन्तु न:. ॐ स्व: भुव: भू: प्रौं प्रीं प्रां ॐ शनिश्चराय नम:

जप मंत्र :- ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनिश्चराय नम:।
नित्य २३००० जप प्रतिदिन.

1)शनि ग्रहसाठी उपाय श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व शनिवार फक्त फल आहार करवा

2)रोज श्रीगुरु चरित्राचा एक अध्याय वाचा

3)आपल्या श्रीगुरुच्या प्रतिमेची पुजन व
भक्ती करा

4) रोज श्री हनुमान चालीसा पाठ करा

5)रोज संध्याकाळी पिपंळ वृक्ष किवा
शमी वृक्षा खाली दिवा लावावा अथवा या दोन्ही वृक्षाचे पुष्य नक्षत्रावर किंवा श्रवण नक्षत्रावर हे वृक्ष लावावी

6)या काळात विद्यार्थीजांना अभ्यास आळस असणार त्यामुळे त्यांनी
श्री गनपती ची दर्शन करावे व दर बुधवारी श्रीगनपतीच्या मंदीरात अकरा
मोदक अर्पण करा हा उपाय केल्यावर
सर्वानाच फायदा होईल

7)साडेसातीच्या काळात आपण श्रीक्षेत्र राक्षसभुवन (ता.गेवराई,बीड)
हे श्रीक्षेत्र भगवान श्रीरामचंद्र वनवासत
असताना इथेच श्रीशनि देवाची स्थापना
करून पुजा केली होती आणि दुसरे
शनिशिंगणापुर येथे अधुनमधुन जाऊन शनिमहाराजांचे प्रार्थनापुर्वक दर्शन घेऊन यावे. अनवधानाने झालेल्या अपराधांची क्षमा मागावी.

8)साडेसातीच्या काळात शनी महात्म दर शनीवारी, शनी वज्रपंजरकवचं आणि शनी-स्त्रोत्र (दशरथ श्रृषीनी लिहिलेले)
दररोज वाचावे.

9) दर शनीवारी तेल लावून अभ्यंग स्नान
करावे

10) रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास शनि ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...

11) रत्न:
शनिदेव या ग्रहाचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी शास्त्रों नुसार शुद्ध निलम रत्न वापरण्याचे मी पण प्रमाण देते कारण मंत्र व रत्न हे देवाने मनुष्याचे ग्रहांपासून रक्षण करण्यासाठी निर्माण केले आहे व त्यामुळे रत्नांचा वापर करावा (रत्न का वापरतात या विषयावरचा लेख लवकर माहिती देतो)

दि 26-01-2017 पासुन वृश्चिक - धनु मकर या राशींना साडेसाती आहे. (तुला राशीची साडेसाती संपते) 20 जुन 2017रोजी शनि महाराज वक्री वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि 26 ऑक्टोबर 2017 
रोजी पुनः शनि महाराज धनु राशीत प्रवेश करतील...

विषेश नोट:- साडेसाती मध्ये श्रीशनि महाराज हे स्त्रीयाना मुळीच त्रास देत नाही कारण ब्रह्मवैवर्त पुराण नुसार शनिमहाराजची आई छायादेवीनी असे सांगितले आहे की कोणत्याही स्त्रियांना
तुझ्या साडेसाती त्रास होणार नाही म्हणुन स्त्रीयाना कधीच साडेसाती नसते ही नोंद घ्यावी.... संकलित

•◆ वास्तु सुख ™◆•