Wednesday, 28 September 2016

14 सरपटणाऱ्या प्राण्यांची नावे

14 reptile names: 1. Alligator - मगर 2. Crocodile - मगर 3. Turtle - पाण्यातला कासव 4. Snake - साप a. Python: अजगर b. Viper: एका प्रकारचा विषारी साप जो सामान्यतः Antarctica, Australia, New Zealand, Madagascar, Hawaii, मध्ये आढळतो. c. Cobra: नाग d. Anaconda: एनाकोंडा e. Rattlesnake - अमेरिकेत आढळणारा एका प्रकारचा साप ज्याच्या चालण्याचा खड खड आवाज येतो. 5. Lizard - सरडा 6. Tortoise - कासव 7. Gecko - गर्मीच्या प्रदेशांत आढळणारी घरगुती पाल 8. Tuatara - एक सरड्यासारखा जंतू जो आता फक्त New Zealand मध्ये आढळतो 9. Gila monster - New Mexico सारख्या ठिकाणी आढळणारा विशाल आणि विषारी सरडा

Tuesday, 27 September 2016

श्री विठ्ठलाच्या शरीरावरील खुणा आणि त्याचे विश्लेषण

विठोबाची महापूजा बघतांना मला त्याच्या अंगावर असलेल्या खुणा प्रत्यक्ष बघायच्या होत्या; परंतु विठोबाची मूर्ती माझ्यापासून ६-७ फुटांवर असल्याने त्या मला दिसत नव्हत्या. तेव्हा मी देवाला मनात म्हटले, `तुझ्या अंगावरच्या खुणा मला कशा काय दिसणार ?’ त्या वेळी `तू त्या सूक्ष्मातून बघ’, असे आतून उत्तर आले. त्यानंतर मी विठोबाच्या मूर्तीवर मन एकाग्र करू लागले. मूर्तीजवळ जातांना खूप आनंद होत होता. ज्या वेळी मी आणखी खोल जाऊ लागले, त्या वेळी मन एकदम शांत झाले. (सूक्ष्म-चित्राचे आकृतीतील क्रमांक कंसामध्ये घातले आहेत.)

१. विठोबाच्या अनाहतचक्राशी मोठे निळे विष्णूपद जाणवले. (५)

२. छातीवर भृगू ऋषींनी मारलेल्या लाथेचा अंगठा रुतल्याचे चिन्ह आहे. त्या चिन्हाभोवती पिवळे प्रकाशवलय जाणवले. (४)

३. गळयात कंठाशी असलेला कौत्सुभमणी लाल प्रकाशाने न्हाऊन निघाला होता. (३)

४. डोक्यावर असलेल्या शिवपिंडीभोवती पांढरा प्रकाश होता. (१)

५. मकराकार कुंडले पिवळया रंगाच्या प्रकाशाची होती.

६. कटीवर ठेवलेल्या एका हातात असलेला शंख निळा, तर दुसर्‍या हातातील कमळ लालसर रंगाचे जाणवले.

७. रखुमाईला बसण्यासाठी असलेल्या चंद्राकृती जागेत लाल रंगाचे शक्‍तीतत्त्व जाणवले.

८. कमरेला असणारा वासुकीच्या दोर्‍याचा विळखा संपूर्णत: पिवळया प्रकाशाचा होता व त्यातून अनेक चैतन्यलहरी वायूमंडलात प्रक्षेपित होत होत्या. (७)

९. नाभीमध्ये सरस्वतीतत्त्वाचा वास जाणवून तेथे पांढरे कमळ जाणवले. (६)

१०. आज्ञाचक्रातून विजेरीसारखा निळा झोत सगळीकडे फिरत होता. (२)

११. दोन पायांच्या मधे असलेल्या काठीमध्ये कृष्णतत्त्व जाणवून त्या काठीतून प्रक्षेपित होणार्‍या लाल रंगाच्या मारक लहरी पाताळापर्यंत जात असल्याचे व विठोबा एकाच वेळी ऊर्ध्व लोक व अधो लोक यांवर नियंत्रण ठेवत असल्याचे जाणवले. (८)

१२. विठोबाच्या उजव्या पावलावर मुक्‍तकेशी दासीच्या हातांची बोटे रुतलेला ठसा आहे. मुक्‍तकेशी दासीला तिच्या रूपाचा खूप गर्व होता. तिचे गर्वहरण करण्यासाठी पांडुरंगाने अतिशय सुकुमार रूप धारण केले व ते एवढे कोमल होते की, मुक्‍तकेशी त्याच्या पायाला हात लावून दर्शन घेतांना तिच्या हातांची बोटे पांडुरंगाच्या पावलात रुतली. त्या ठशात लालसर शक्‍तीप्रवाहाचा बिंदू जाणवला.

१३. विठोबाच्या पायाखाली पुंडलिकाने पांडुरंगाला उभे रहाण्यासाठी फेकलेली वीट आहे. त्या विटेतून दाही दिशांना चैतन्याचे अनेक प्रवाह प्रक्षेपित होतांना जाणवले. विटेकडे पाहून आपोआपच देवाच्या चरणी लीन व्हायला झाले. (९) 

- गुरु बोध

Monday, 26 September 2016

पुण्यातील दुचाकी संस्कृती

आमच्या हातून "पुण्यातील दुचाकी संस्कृती" हा अभ्यासक्रणे पूर्ण झाला आहे. वेचक आणि वेधक असे दुचाकीस्वार:

*काकू*: हा वर्ग कोणत्याही शहरात सापडतो. पुण्यातला हा वर्ग जास्त उठावदार आहे. साडी, सनकोट, चेहरा पूर्ण झाकलेला, डोळ्याला चश्मा किंवा गॉगल अश्या अवतारात यांचा वावर असतो. पायाचा ब्रेक उत्तम ब्रेक ह्या उक्तीवर गाढ विश्वास. गाडीला आरसा असलाच तर चेहर्‍याकडे वळवलेला. ह्यांच्या वाटेत आलात तर डोळे वटारून पाहतात. सिग्नल वर समवर्गीयांना निरखून पाहणे हा आवडता छंद. एका काकूंच्या नंबरप्लेट वर "पतिची कृपा" असे लिहिलेले आमच्या पाहण्यात आहे.

*शीघ्रपलायनवादी*: सिग्नल वर उभे असतांना उजवा पाय ब्रेक वर ठेवून एक्सलरेटर ला उगाच वेठीस धरतात. टेबल फॅन प्रमाणे मान सतत हलती ठेवून चौकातल्या इतर वाहनांचा वेध घेत असतात. हिरवा सिग्नल पडायच्या १० सेकंद आधी हे शीघ्रपलायन तयारी पूर्ण होते आणि सुसाट वेगाने पुढच्या सिग्नल वर पोहोचतात.

*प्रेमवीर*: मागची सीट जवळपास रिकामी. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड दोघे एकाच सिट वर बसलेले असतात. सिग्नलवर आपापसात खुदुखुदू करणे, सेल्फी काढणे आदी प्रकार सुरू असतात. आजूबाजूस उभे असलेल्या वाहनधारकांचे बक्कळ मनोरंजन करतात.

*नवमावळे*: लिहावे तेवढे कमी. रॉयल एनफील्ड वर विराजमान. माणिकचन्द किंवा एकसोबिस-तिनसो ने ओठ रंगलेले. क्वचित प्रसंगी पोटाचा स्पर्श टाकीला झालेला असतो. ह्यांच्या नंबरप्लेटवर किंवा बाइकवर मोकळ्या जागेत शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजामाता, कधी कधी अहिल्याबाई शब्दरूपात किंवा चित्ररूपात आढळतात. धनुष्यबाण किंवा घड्याळ चिटकवलेले दिसते. बाणेदार वाक्यांची पखरण करणे हा आवडता छंद. उदा.: आले मरण पण नाही गेलो शरण; बघतोस काय रागाने ओव्हरटेक केलाय वाघाने.. आदी. रस्त्याच्या मधोमध बाइक लावून चुन्याची ट्यूब आणायला जाणे आणि पानवाल्याशी 'आशिकी 2' वर गप्पा मारणे ह्यात हातखंडा असतो. सिग्नल वर ओळखीच्या रिक्षावाल्याला "कॅ भावड्या.." अशी साद देऊन रस्त्यावर पचकन् शिडकावा करून मागच्या हॉर्न वाजवणाऱ्या वाटसरूला खुन्नस देऊन मार्गस्थ होतात.

*शिस्तप्रिय*: असं काहीहीss नसतंच.

*फटफटीवाले*:  सायलेन्सर फाडलेला असतो. कधी कधी हातात वीडी काडी असते. सीडी हंड्रेड, यामाहा किंवा खुळखुळा झालेली पल्सर चालवतात. ट्रॅफिक मध्ये एक्सलरेटरला पीळ देत नागमोडी वळणाने सर्वाना ओव्हरटेक करणे ही खासियत. शीघ्रपलायन वर्गाचे पुढचे व्हर्जन. कोणत्याही सेकंदाला कुठेही सिग्नल मोडण्यात प्राविण्य.

*आप्पा*: हा वर्ग नामशेष होऊ लागला आहे. वयवर्षे ६० च्या पुढे. पेठांमध्ये अथवा कर्वे रोड, टिळक किंवा प्रभात रोडवर "थोरले बाजीराव सोसायटी/ गुणदर्शन अपार्टमेंट" किंवा तत्सम ठिकाणी वास्तव्य असते. तीर्थरुपांनी रिटारमेंटच्या पैश्यातून घेऊन दिलेली स्कूटर/ एम80 हाकत असतात. हॅंडलला कापडी पिशवी लटकत असते. आरश्यांनी माना टाकलेल्या असतात. डोक्यावर जुन्या धाटणीची टोपी असते. सिग्नल वर उभे असतांना एखाद्या यो यो हनीसिंगकडे "तुला 'गाडलं किंवा 'गीळलं पाहिजे" अश्या नजरेने पाहात असतात. ह्यांना शक्य असते तर ह्यांनी त्यांची नंबरप्लेट मोडी लिपित देखील बनवून घेतली असती.

*मिस युनिवर्स*: लेटेस्ट फॅशन चे कोणतेही कपडे. कोपरा पर्यन्त हातमोजे. गळयापासून संपूर्ण चेहरा स्कार्फने झाकलेला. अर्धा चेहरा व्यापेल एवढा मोठा गॉगल. गाडी चालवतांना फोनवर बोलणे आणि सिग्नलवर व्हॉट्सऍप हे ठरलेलेे. आरश्यातून मागच्या बाइकस्वाराकडे “माझ्याकडे पाहात तर नाही ना” हे पाहण्यासाठी पाहतात. ह्यांच्या मोबाइल स्क्रीनला स्क्रैचगार्ड लावलेला असतो पण डोक्यावर हेलमेट नसते.

ह्या व्यतिरिक्त पुण्याच्या वाहतूक संस्कृती बद्दलची काही इतर निरीक्षणे:

1. झेब्रा क्रॉसिंग हा फक्त रस्ता सुशोभिकरणाचा एक भाग आहे.
2. पुणे वाहतूक पोलिस आणि पुतळेवाल्या मादाम तुसॉ चे गुप्त टाय-अप आहे.
3. पीयूसी करणाऱ्या व्हॅन उभ्या करून पस्तावलेले लोक नंतर नीरा विकणे सुरु करतात.
4. पुण्यात हेलमेटचे दूकान टाकणे म्हणजे पंजाबात हेअर कटिंग सलून टाकण्या सारखे आहे.

अर्थात हा अभ्यासक्रम पूर्ण केला असला तरी त्यात उत्तीर्ण झालेलो नाही.

श्रीयंत्र माहिती

🙏🏻🌷 श्री स्वामी समर्थ महाराज 🌷🙏🏻

श्रीयंत्र माहिती 💐🚩

🙏🏻धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी श्रीयंत्र🙏🏻

आज आपण यातील श्रीयंत्राची सखोल माहिती घेऊ. श्रीयंत्र म्हणजे साक्षात
श्रीमहालक्ष्मी चे स्वरूप आहे. जो मनुष्य
आपल्या श्रीवास्तु मधील देवघरात श्रीयंत्र ची स्थापना करतो त्याच्या श्रीवास्तु
मध्ये साक्षात श्री अष्टलक्ष्मी प्राप्त होते

यंत्र म्हणजे विशिष्ट ईश्वरी शक्तीचा आविष्कार प्राप्त करण्याचे साधन. धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी श्रीयंत्र, महालक्ष्मी, लक्ष्मीगणेश, श्रीसुक्त यंत्र तसेच दुष्ट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी महामृत्युंजय यंत्र, रामरक्षा यंत्र, दत्तात्रय यंत्र या यंत्रांची विधीवत पूजा केल्यास त्याचे निश्चित असे फळ मिळते. यंत्रामध्ये विशिष्ट प्रकारच्य रेषा,त्रिकोण,वर्तुळे,पुष्पदल,बीजाक्षरे,बीजमंत्रांच्या विविध रचना असतात. यंत्र घडविण्यासाठी लागणारे साहित्य, घडविण्याची पद्धत, वेळेचे पावित्र्य, शुद्धीकरण, प्राणप्रतिष्ठा आणि सिद्धिकरण या सर्व महत्वपूर्ण गोष्टी आहेत.
त्यामुळे बाजारातून किंवा तीर्थक्षेत्र स्थानातून यंत्र आणून देवघरात ठेवण्या अगोदर तज्ञांची मदत अथवा सल्ला घेणे आवश्यक आहे. यंत्राची शास्रोक्तरीत्या प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय त्याच्या शक्तीचा पूर्ण आविष्कार प्राप्त होऊ शकत नाही. महत्वाची सूचना - यंत्राची रोज पूजा अर्चा करणे आवश्यक आहे कमीतकमी दिवा-अगरबत्ती ओवाळणे आवश्यक आहे.

वेळेची उपलब्धता व आवडीनूसार रोज यंत्राचे पूजनअर्चन,षोडषोपचार किंवा पंचोपचार पूजा,अभिषेक आराधना मंत्रोच्चारण,जप आराधना,बीज मंत्र उपासना,होम यज्ञात्मक उपासना अशा प्रकारे चढत्या क्रमाने आराधन पद्धती त्याअनुसरुन फलप्राप्ती यंत्राच्या माध्यमातून होत असते.

श्रीयंत्र हे त्रिपुराशक्तीचे प्रतीक आहे. भगवती, श्रीविद्या, त्रिपुरासुंदरीच्या साधनेमध्ये श्रीयंत्र हे एक अत्यंत प्रभावी उपयोगी यंत्र आहे. किंबहुना श्रीयंत्राशिवाय श्री लीलता महात्रिपुरासुंदरी देवतेच्या साधनेचे उत्तम फळ मिळू शकत नाही. ब्रह्माण्ड पुराणातील उल्लेखाप्रमाणे जिच्या गर्भामध्ये ३३ कोटी देवदेवताचा वास आहे अशा श्रीललिता महात्रिपुरासुंदरी देवीचे श्रीयंत्र हे निवासस्थान आहे. ती त्या निवासस्थानामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती परब्रह्म, परविष्णू परशिवासहित निवास करते. म्हणूनच श्रीयंत्राची पूजा करणार्‍यास विश्‍वातील समस्त देवदेवतांची पूजा केल्याचे पुण्य लाभते व त्याला सर्व स्तरांवरील समृद्धी प्राप्त होते.
श्रीयंत्रात अत्यंत अद्भुत तर्‍हेने संपूर्ण ब्रह्माण्डाची संरचना करण्यात आली आहे. याकरिता विशिष्ट पद्धतीचा वापर करून अनेक भौमितिक रचना एकमेकांत गुंफण्यात आल्या आहेत. या यंत्रातील ९ चक्रे ही मनुष्य देहांतील, ९ आध्यात्मिक चक्रासमान आहेत. यामुळे अनेक साधनांचे पुण्य या एकाच श्रीयंत्र साधनेमुळे प्राप्त होते. श्रीयंत्राचे मनोहर रूप न्याहाळताना जाणवते की याच्या मधोमध एक बिंदू आहे आणि सर्वांत बाहेरच्या बाजूला भूपूर आहे. भूपुराच्या चारी बाजूंना चार द्वारे असतात., बिंदूपासून जर विचार केला तर तेथपासून भूपुरापर्यंत एकूण त्याचे दहा विभाग असतात ते अशाप्रकारे. १) केंद्रबिंदू (सर्वानंदमय चक्र), २) त्रिकोण (सर्वसिद्धिपद चक्र), ३) आठ त्रिकोण (सर्वरक्षक चक्र), ४) दहा त्रिकोण (सर्वरोगहर चक्र – अन्तर्दशार), ५) पुन: दहा त्रिकोण (सर्वार्थसाधक चक्र – बीहर्दशार), ६) चौदा त्रिकोण (सर्वसौभाग्यदायक चक्र – चतुर्दशार), ७) आठ पाकळ्यांचे कमळ (सर्वसंभोक्षण चक्र – अष्टदल, ८) सोळा पाकळ्यांचे कमळ (सर्वाशापरीपूरण चक्र – षोडशदल), ९) तीने वृत्ते (त्रैलोक्यमोहन चक्र), १०) तीन भूपूर (भूपूरचक्र).
श्रीयंत्रातील रचना एकानंतर एक अशा जोडलेल्या असतात त्यामुळे सहजच कोन व रेषा तयार होतात. चतुर्दशार कोनांची टोके बाहेरील अष्टदलाला जोडलेली असतात. अष्टदलांची टोके षोडसदलाबरोबर व षोडसदलाची टोके प्रथम वृत्ताला मिळालेली असतात. या कारणामुळे आणखी कितीतरी कोन तयार होतात ज्याला ‘स्पंदीचक्र’ असे म्हणतात. यामध्ये बिंदू अष्टदल, त्रिवृत्त आणि चतुरस्त्र यांना शिवाचा अंश मानतात आणि त्रिकोण, अष्टकोन, दोन दशकोन आणि चतुर्दशारला शक्तीचा अंश मानले आहे. बाहेरच्या बाजूला जे भूपूर आहे ते एक प्रकारचे तटकुंपण किंवा किल्ल्यासारखे दिसते. अशा प्रकारे श्रीयंत्राची रचना अतिशय मनोहर तरीही गहन आहे.
श्रीयंत्र प्रतिमेची पौराणिक कथा अशी – एकदा लक्ष्मी अप्रसन्न होऊन पृथ्वीवरून वैकुंठाला निघून गेली त्यामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या. वसिष्ठऋषींनी लक्ष्मी मातेला पृथ्वीवर आणण्याचा निश्‍चय करून ते वैकुंठाला पोहोचले पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले नंतर वसिष्ठमुनींनी तपश्‍चर्येला प्रारंभ केला व श्रीमहाविष्णूंना आवाहन केले. श्रीमहाविष्णू प्रकट झाले. श्रीविष्णूंनी वसिष्ठमुनींसह महालक्ष्मीच्या आलयामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी तिची प्रार्थना केली; परंतु देवीने आपला तोच पृथ्वीवर न जाण्याचा आग्रह धरून ठेवला. वसिष्ठमुनी खिन्न मनाने पृथ्वीवर परतले. सगळ्यांच्या समोर त्यांनी एक गोष्ट प्रतिपादन केली ती म्हणजे आता श्रीयंत्र निर्मितीशिवाय मार्ग उरलेला नाही. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आश्रमामध्ये दीपावलीमधील धनत्रयोदशीला विधिपूर्वक श्रीयंत्र प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा केली. या श्रीयंत्र प्रतिमेच्या निर्मितीचे ज्ञान आणि उपासनाक्रम मुख्य गुरू बृहस्पतींनी वसिष्ठ ऋषींना दिग्दर्शित केले. त्यांच्या निर्देशानुसार श्रीयंत्र प्रतिमा तयार झाली. प्रतिमेची शोडषोपचारे पूजन होताच श्रीलक्ष्मी आपल्या सर्व सिद्धीसह त्या श्रीयंत्र सिंहासनावर प्रकट झाली. तिने सर्वांना आशीर्वाद दिला व ती म्हणाली की आपण जो श्रीयंत्र प्रयोग केला त्याने मी प्रभावित झाले असून या श्रीयंत्रामध्ये मी अखंड वास करेन. ज्या साधकाच्या वास्तूमध्ये श्रीयंत्राची विधिवत स्थापना करण्यात येते त्या साधकाने व घरातील सर्वांनी श्रीयंत्राची समाराधना प्रेमपूर्वक भक्तियुक्त अंत:करणाने करावी. प्रात:काली स्नानादी कर्मे पार पाडून शूचिर्भूत होऊन श्रीयंत्रप्रतिमेसमोर नंदादीप लावून आसनस्थ व्हावे. न्यास, संकल्प ध्यानाचे श्‍लोक म्हणून श्रीयंत्राची पंचोपचारे पूजा करावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर श्रीललितासहस्त्रनाम स्तोत्र पाठाने श्रीयंत्रप्रतिमेवर कुंकुमार्चन करावे. तद्नंतर बीजमंत्राचा जप करावा. जप पूर्णतेनंतर आरती व क्षमा प्रार्थना म्हणावी. सायंकाळीसुद्धा धूप-दीप प्रज्वलित करून प्रात: पूजेप्रमाणेच समाराधाना करावी.

श्रीयंत्रप्रतिमेला नित्य स्नानविधी अभिषेक नाहीत, फक्त शुद्ध जलाने पौर्णिमेच्या दिवशी शूचिर्भूततेने ललितासहस्रनाम स्तोत्र पाठाने त्या प्रतिमेला अभिषेक करावा व तद्नंतर पंचोपचारे पूजा करून ललितासहस्रनाम स्तोत्र पाठाने कुंकुमार्चना करावे. ज्या वास्तूमध्ये श्रीयंत्र स्थापना तसेच श्रीललितासहस्रनाम स्तोत्राचा पाठ वाचला जाऊन कुंकुमार्चना होते त्या वास्तूमध्ये श्रीललिता महात्रिपुरासुंदरी देवतेचा नित्य वास असतो हे पक्के धानात ठेवावे. श्रीयंत्र स्थापना आपल्याला व्यापारवृद्धी, ऋणमोचन, संतानलाभ, अतूट संपत्ती, दरिद्रता नाश, भौतिक सुखसंपदा आणि अद्भुत ऐश्‍वर्यासिद्धी प्रदान करते.
अत्यंत प्रभावी श्रीयंत्रामुळे घरात समृद्धी नांदते. सर्व प्रकारचे भय नाहीसे होते. विद्या, शक्ती, यश, मानसन्मान, ऐश्‍वर्य आणि सकलसमृद्धी प्राप्त होते. श्रीयंत्र म्हणजे सर्व संकटातून मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा राजमार्ग आहे. अखंड पंचधातूमधील अनेक वजनांमधील श्रीयंत्रे उपलब्ध आहेत. प्रात: पूजेमध्ये व सायंकालीन पूजेमध्ये श्रीयंत्र प्रतिमेला कोणत्याही प्रकारचे अभिषेक करू नयेत. नित्य सहस्रनामाने कुंकुमार्चना हेच तिचे अभिषेक होय.🚩

🙏🏻🌷 ॐ महालक्ष्मीच् विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्...🌷🙏🏻

त्राटकाद्ववारे मधुमेहावर उपाय

मंगळवार, ५ जुलै, २०१६ त्राटकाद्वारे रोगोपचार : मधुमेह विकारावर उपाय - ३ मधुमेह विकार बाधीत व्यक्तींचा असा समज असतो की, ' आपला हा विकार कधीच बरा होणार नाही. तो आपला बळी घेणारच. ' हा घातक विचार स्वयंसुचनेच्या मार्गात आड येतो. त्याअर्थी घातक विचार मानसिक स्वरुपात देहत ठाण मांडुन बसल्याने त्याचे परिणाम शरीरावर होतात. व्याधीग्रस्तांनी स्वतःच्या मनात स्वादुपिंडावर ( Pancreas gland ) होकारार्थीं स्वयंत्राटक करावेत. आपल्या शरीरातील कोणतेही रोग, विकार अथवा व्याधींची अतिक्रमणता करण्याची पद्धती सुक्ष्म स्तरावरुन सुरुवात होऊन कालांतराने स्थुल देहावर प्रकट होऊ लागते. त्यायोगे आपले सुक्ष्म शरीर मानसिक, शारीरीक व आध्यात्मिक त्रिविध तापांपासुन सुरक्षित ठेवण्याहेतु मनःशक्तीची ओळख करवुन घ्यावीच लागते. त्यायोगे सोबत काही निवडक पथ्यपाणी जपल्यास जीवनात कधीही अत्याधिक प्रमाणात कोणते रोगविकार होणार नाहीत. जेणेकरुन संपुर्ण घराला त्रास होईल असे परिणाम यथाशक्ति टाळता येतील. स्वशरीर निरोगी राहण्याहेतुने आणि संबंधित देहाच्या त्रासावर आध्यात्मिक स्तरावर उपाय सर्व दत्त भक्तांसाठी प्रकाशित करत आहोत. संबंधित रोग-विकारांचा मनःशक्तीशी संबंध प्रकृती-पुरुषात्मक तत्वावर आधारीत असलेले स्थुल आणि सुक्ष्म शरीर मनाच्या चैतन्यशक्तीने परिचालीत होते. आपले शरीर असंख्य पेशींनी मिळुन बनलेले एक स्थुल साधन आहे. प्रत्येक पेशीला प्रकृती पुरुषात्मक मन असते. या सर्व पेशीतील मन एकत्र येऊन 'महामन' तयार झाले. पायाच्या बोटाच्या अग्राला टाचणीने टोचले असता तात्काळ मस्तकापर्यंत तिच्या संवेदना जातात. याचे एकमेव कारण मानवाचे व्यापक असलेले अंतर्मन आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, शक्ती ही कणाकणाने एकत्र संग्रहीत होते आणि ती मनःशक्ती संग्रहीत होऊन आत्मबळ वाढवते. आजारी माणसाचे मनोधैर्य खचल्यामुळेच आजार बळकावतो. याकरीता प्रत्येक व्यक्तीने आपले मनोबल, सद्विचार आणि सत्संगाद्वारे स्वतःचं आत्मबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहीजे जेणेकरुन शरीर स्वास्थ्य अबाधीत राहील. आपल्या शरीराचे स्वास्थ्य पाच प्रमुख अवयव पोट, फुफ्फुसे, ह्दय, ग्रंथीयुक्त समुह आणि मेंदू यांच्या सुव्यवस्थित कार्य चालु राहाण्यावर अवलंबुन असते. मधुमेह विकारात वरील अवयवांपैकी ग्रंथीयुक्त अवयव स्वादु पिंडाची कार्यक्षमता थांबल्यास पीडा, दुःख व रोगांना निमंत्रण मिळते. बरेच साधक मला देह यातनेबद्दल विचारुन आध्यात्मिक साधनेत उत्पन्न होणाऱ्या विघ्नांवर कसे मात करता येईल याबद्दल विचारत असतात. आपलं स्थुल शरीर नियंत्रणात असल्यावरच यथाशक्ति ज्ञानर्जन करता येते. त्यायोगे त्राटक साधनेतुन दिर्घ श्वासाच्या व्यायामात सर्व अवयवांच्या गति विधींना प्रभावित निमंत्रण दिले जाते. दिर्घ श्वसनाने पोटातील जठरपेशीं प्रदेश सुरळीत राहुन त्याची कार्यशक्ती वाढते. संबंधित कार्यक्षमतेत स्वादुपिंडाचे कार्य पुर्ववत सुरळीत होण्यास मदत होते. आध्यात्मिक तत्वाच्या आधारे मधुमेहासंबंधित ह्दयापासुन ते नाभीपर्यंतचा भाग ईशान रुद्र भगवान शिव देवतेच्या स्वामित्वाखाली येतो. त्यायोगे त्राटक साधना प्रथमतः बेल पत्र त्राटक, शिवलिंग त्राटक आणि स्वयं त्राटक अशा तीन स्तरावर टप्प्याटप्याने करावयाची असते. स्वयं त्राटक साधनेत स्वतःच्या अंतर्मनाचा योग्थ अभ्यास होणे हेतु ईतर दोन त्राटक साधनेत सहभागी व्हावेच लागते. त्राटक साधनेत प्रारंभिक अवस्थेत काही दिवस डोळ्यांसंबंधित पाणी वाहाण्याचे प्रकार होत असतात परंतु सरासरी एका आठवड्यानंतर पाणी येणे आपोआप थांबते. मधुमेहा सारख्या विकारांमुळे मोतीबिंदु, जीभ जड होणे, जखम न भरणे, लखवा बसणे अशा पीडेपासुन बचाव करावयाचा असेल तर स्वयं त्राटक साधना केल्यास चांगलेच परीणाम अनुभवास येतील. स्वयं त्राटक साधनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्वतःवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित होणे. मधुमेह बाधीत लोकांना स्वतःच्या जीभेवर नियंत्रण ठेवाण्याची ईच्छ्या असल्यास संंबंधित त्राटक साधना खालीलप्रमाणे करावी. त्राटकाद्वारे मधुमेहावर स्वनियंत्रण होणे हेतु खालीलप्रमाणे उपाय करावेत. १. स्वयं त्राटक साधनेतुन स्व आहारावर नियंत्रण येणे हेतु. संबंधित ईतर दोन साधनांची तयारी म्हणुन सर्व त्राटक व भगवान शिव संबंधीत ब्लाँग वाचावेत. २. अंतर्मनाच्या प्रबळीकरणातुन जीभेवर नियंत्रण येईल असे सर्वांगीण प्रयत्न करावेत. ३. योगसाधनेत यथाशक्ति कपालभाती सकाळी उपाशीपोटी करणे. ४. शुचिर्भुत होऊन श्री शिव गायत्री मंत्राचा रोग १०८ जप करणे. ५. गाणगापुरचे भस्म, देवापुढे लावलेल्या अगरबत्तीची राख किंवा तुळस, बेल पत्र यांची वाळलेली पाने जाळुन केलेले भस्म मंत्रुन मुखाजवळ धरुन ११ वेळा गायत्रीमंत्र म्हणुन कपाळाला लावल्याने, तीर्थ करुन प्राशन केल्याने व तुळशीच्या रसातुन भस्माचा उपयोग केल्याने मधुमेह विकर नियंत्रणात येतो. मधूमेह विकारासंंबंधीत त्राटक साधनेबद्दल आवश्यक सुचना १. ' माझा मधुमेह बरा होईल ' अशी प्रत्यक्ष सुचना देऊ नका. २. शुद्ध शाकाहारी राहाणे. ३. योग अभ्यास सावधानतापुर्वक योग्य मार्गदर्शकाच्या सहाय्याने करणे. ४. नित्य ईतर दैनंदीन वर्तमान उपचार संबंधित वैद्यकीय सल्याप्रमाणे पालन करणे. ५. स्वादु पिंडावर होकारार्थी लक्ष केंद्रित करणें. ह्या पोस्टशी संबंधित

नवरात्र

*नवरात्र*

महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र !  नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते.

तिथी

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी.
नवरात्रीस गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असून सकाळपासून दुपारी दीडर्पत घटस्थापना करता येईल, असे पंचांगकर्ते मोहन दाते नी सांगितले. यंदा  विजादशमी (दसरा) 3 ऑक्टोबर रोजी असल्याचे दाते यांनी सांगितले. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे.

नवरात्र व्रताचा इतिहास

१. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.

२. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.

नवरात्र व्रताचे महत्त्व

१. जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन:पुन्हा अवतार घेते.’ उपांग ललिता ’ ही जगज्जननी, जगद्धात्री, पालन पोषण करणारी; लक्ष्मी ही संपत्ती दायिनी; काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात नवरात्रात उपासना व पूजन होते.

२. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात  ” श्री दुर्गादेव्यै नम: । ” हा नामजप जास्तीतजास्त करावा.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. ह्या नवरात्रींत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजने, स्त्रोत्रं म्हटली जातात.

देवी कां प्रकट झाली? कशासाठी अनं कशी प्रकट झाली. ह्या बद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी :

पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर राक्षस फार माजला होता. त्यानं देवदेवता ऋषीमुनी, साधू संत सज्जन आणि भक्त भाविक ह्यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होत. तो सर्वांनाच फार त्रास देत होता.तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली.त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नांव ठेवलं महिषासुर मर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवघरांत, मठ मंदिरात जी घटस्थापना केली जाते ती कशी ह्याच उत्तर असं :

दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात. परडीत काळी माती घालतात त्यात एक सुगड ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात. त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात. हार वेणी गजरा घालतात. घटा खालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात.ह्या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात. त्या दिव्याची काळजी घेतली जाते. दीप म्हणजे प्रकाश. अन प्रकाश म्हणजे ज्ञान, तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात. सकाळ-संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते. भक्ती केली जाते. उपासना केली जाते.नवरात्रातली ही देवी उपासना प्रामुख्याने रात्री करतात. कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते. रात्री मन शांत स्थिर असते. त्याची एकाग्रता तादात्म्य भाव लवकर साधतो. एकेका दिवसानं घटा खालच्या मातीत पेरलेल धान हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता ह्याने अंकुरते – हळू हळू वाढू लागते. तेच त्या देवीच घटावरच दर्शन असत.

आपल्या महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. देवीला साडी-चोळी. पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात.ह्या घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख शांती अन समाधान लाभते.

नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात.

ह्या नवरात्र उत्सव काळांत देवळांतून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. ह्या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते.ही शक्ती देवता देशभरांत अन वेगवेगळ्या भागांत विविध नावांनी ओळखली जाते. ह्या उत्सवाला सुद्धा सध्या सार्वजनिक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे.

मुलींना आवडणारा हादगा हा सुद्ध ह्याच दिवसांत करतात. मुली पाटावर   काढून त्याचे भोवती फेर धरतात. हादग्याची गाणी म्हणतात. नवनव्या खिरापती केल्या जातात.

नवरात्रीला सध्या जे सार्वजनिक स्वरुप आले आहे त्यामध्ये मुले मुली नऊ दिवस गरबा खेळतात. तसेच विविध मनोरंजनाचे स्पर्धा महिलांसाठी भरविल्या जातात. मुलां-मुलींसाठी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम राबविले जातात. शेवटच्या दिवशी देवीची फार मोठी मिरवणूक काढली जाते. शक्ती उपासनेचा हा नवरात्रीला उत्सव फार महत्त्वाचा आहे.