Wednesday, 26 December 2018

विष्णू स्तोत्र

शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम् ।
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ॥

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥

सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणम् ।
सहारवक्षस्स्थलशोभिकौस्तुभं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम् ॥

Tuesday, 25 December 2018

पाबळ फाटा तो पुणे महानगर पालिका

RETURN ROUTE: PMPML Pune Bus no ‘159P’ (Kasturi Shikshan Sanstha to → Pune Manapa Bus Station Route &Timings


Stop No.Bus Stop NameFirst Bus Timings

1. Kasturi Shikshan Sanstha7:15 AM
2 .Pabal Phata7:15 AM
3.Shikrapur Phata / Chakan Road7:18 AM4Jakate Vasti7:21 AM5B U Bhandari7:26 AM6Enfield Company7:29 AM7Sanaswadi Nagar Road7:32 AM8RSB7:34 AM9Gupta Steel7:36 AM10Kalyani Forge Nagar Road7:37 AM11S.E.C.O. Company7:43 AM12Wadegaon Phata7:46 AM13Bafna Industries7:48 AM14Koregaon Bhima7:51 AM15Perne Phata7:55 AM16Walke Vasti7:56 AM17Jagtap Vasti8:01 AM18Tulapur Phata / Phulgaon Phata8:04 AM19Lonikand8:08 AM20Jagtap Dairy Lonikand8:10 AM2112th Mile8:13 AM22Rajashri Housing8:15 AM23Vitthalwadi Nagar Road8:17 AM24Gade Vasti8:20 AM25Jadhav Vasti8:22 AM26Bakuri Phata8:24 AM27Kesnand Phata8:29 AM28Wagholi8:31 AM29Satav High School8:32 AM30Panmala Wagholi8:33 AM31Soyrik Mangal Karyalaya8:35 AM32Godown Talera8:37 AM33Sai Satyam Society8:39 AM34Khandve Nagar8:41 AM35Aaple Ghar8:45 AM36Janak Baba Dargah8:46 AM37Kharadi Bypass8:49 AM38Chandan Nagar8:51 AM39TATA Guard Room8:52 AM405 Wa Mile8:54 AM41Viman Nagar Corner8:56 AM42Vadgaonsheri Phata8:59 AM43Ramwadi Jakat Naka9:02 AM44Shastri Nagar9:05 AM45Wadia Bungalow9:07 AM46Gunjan Corner9:09 AM47Yerwada9:10 AM48Bund Garden Central Mall9:12 AM49Connaught Place (Bund Garden Road)9:14 AM50Jahangir Hospital9:17 AM51Alankar Talkies9:18 AM52Income Tax Office9:19 AM53G.P.O.9:20 AM54Collector Office9:21 AM55Ambedkar Bhavan9:22 AM56Mangalwar Gadital9:24 AM57Kumbharwada9:26 AM58Pune Manapa Bus Station9:28 AMओक

गुड खाने के फायदे

एनीमिया के रोगियों के लिए फायदेमंद है गुड।

हड्डियों को मजबूत करता है।

प्रेगनेंसी में गुड़ खाने से आयरन की कमी नहीं होती

जोड़ों के दर्द की दिक्कत नहीं होती

पाचन ठीक रहता है और गैस नहीं बनती

स्वाद और सेहत से भरपूर है गुड

शरीर से विषैले तत्व बाहर निकलता है

चीनी में फास्फोरस बिल्कुल भी नहीं होता है बल्कि बहुत से केमिकल से मिलकर चीनी बनती है इसलिए चीनी बिलकुल नहीं खानी चाहिए

मित्रों गुड छारीय है और चीनी अम्लीय है हमारे शरीर को चार की ज्यादा जरूरत पड़ती है और अब हमारे शरीर को बिल्कुल भी नहीं चाहिए इसलिए हमेशा चीनी की जगह गुड ही खाएं

हमारी स्किन के लिए भी गुड़ खाना बहुत लाभदायक है।  गुड़ स्किन के सफाई करने और खून से हानिकारक पदार्थो को शरीर से निष्कासित करने में सहायता करता है। और ब्लड सर्कुलेशन को भी ठीक करता है।

Sunday, 23 December 2018

रामाचा पाळणा


रामाचा पाळणा

बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना ।

निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥

पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी ।

पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥

रन्तजडित पालख । झळके अलौकिक ।

वरती पहुडले कुलदिपक । त्रिभुवननायक ॥२॥

हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।

पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकार ॥३॥

विश्‍वव्यापका रघुराया । निद्रा करी बा सखया ।

तुजवर कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ॥४॥

येऊनि वसिष्ठ सत्वर । सागे जन्मांतर ।

राम परब्रहा साचार । सातवा अवतार ॥५॥

याग रक्षुनिया अवधारा । मारुनि रजनीचरा ।

जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥

पर्णिले जानकी सुरुपा । भंगुनिया शिवचापा ।

रावण लज्जित महाकोप । नव्हे पण हा सोपा ॥७॥

सिंधूजलडोही अवलीळा । नामे तरतिल शिळा ।

त्यावरी उतरुनिया दयाळा । नेईल वानरमेळा ॥८॥

समूळ मर्दूनि रावण । स्थापिल बिभीषण ।

देव सोडविले संपूर्ण । आनंदले त्रिभुवन ॥९॥

राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला ।

दास विठ्ठले ऎकिला । पाळणा गाईला ॥१०॥

विष्णूचा पाळणा

विष्णूचा पाळणा


जो जो जो जो रे व्यापका । सृष्टीच्या पालका ।


निज निज निज बा तू बालका । तान्हुल्या सात्विका ॥धृ॥

धावसि दासाच्या संकटाला । म्हणवुनि श्रमली काया ।

श्रम सांडुनिया निज ध्येया । हलविते पाळणिया ॥१॥

शीते व्यापिले तुज भारी । निजता सागर जठरी ।

आला काळीमा शरीरी । फणिवर धुधु:कारी ॥२॥

अद्‍भुत तव महिमा श्रुतिनिगमा । न कळे तुझी सीमा ।

तो तू स्त्रीकामा घनश्‍यामा । अंतरी धरुनी कामा ॥३॥

तुजला कैसी बा लाज नसे । कैसे झाले पिसे ।

त्र्यंबक प्रभु विनवी तुज बहुसे । येत असे रे हासे ॥ जो जो ॥४॥

पांडुरंगाचा पाळणा

पांडुरंगाचा पाळणा (pahilya divashi palana)


पहिल्या दिवशी आनंद झाला । टाळ-मृदंगाचा गजर केला ॥


चंदन बुक्क्याचा सुवास त्याला । पंढरपुरात रहिवास केला ॥ जो. ॥१॥

दुसर्‍या दिवशी करुनी आरती । दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

वरती बसविला लक्ष्मीचा पती ॥ जो.॥२॥

तिसर्‍या दिवशी दत्ताची छाया । नव्हती खुलली बाळाची छाया ।

आरती ओवाळू जय प्रभूराया । जो. ॥३॥

चवथ्या दिवशी चंद्राची छाया । पृथ्वी रक्षण तव कराया ।

चंद्रसूर्याची बाळावर छाया ॥ जो.॥४॥

पाचव्या दिवशी पाचवा रंग । लावूनि मृदंग आणि सारंग ।

संत तुकाराम गाती अभंग ॥ जो.॥५॥

सहाव्या दिवशी सहावा विलास । बिलवर हंड्या महाली रहिवास ।

संत नाचती गल्लोगल्लीस ॥जो.॥६॥

सातव्या दिवशी सात बहीणी । एकमेकीचा हात धरुनी ।

विनंती करिती हात जोडूनी ॥जो.॥७॥

आठव्या दिवशी आठवा रंग । गोप गौळणी झाल्या त्या दंग ।

वाजवी मुरली उडविसी रंग ॥जो.॥८॥

नवव्या दिवशी घंटा वाजला । नवखंडातील लोक भेटीला ।

युगे अठ्ठवीस उभा राहिला ॥जो.॥९॥

दहाव्या दिवशी दहावीचा थाट । रंगित फरश्या टाकिल्या दाट ।

महाद्वारातून काढिली वाट ॥जो.॥१०॥

अकराव्या दिवशी आकार केला । सोन्याचा कळस शोभे शिखराला ।

रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला ॥जो.॥११॥

बाराव्या दिवशी बारावी केली । चंद्रभागेत शोभा ही आली ॥

नामदेव ते बसले पायारीला चोखोबा संत महाद्वाराला ॥जो.॥१२॥

गणपती पाळणा

गणपतीचा पाळणा 1


जो जो जो जो रे गजवदना । मयुरेश्‍वर सुखवदना ।


निद्रा करि बाळा एकरदना । सकळादी गुणसगुणा ॥धृ॥

गंडस्थळ शुन्डा ते सरळी । सिदुंर चर्चुनि भाळी ।

कानी कुंडले ध्वजजाळी । कौस्तुभ तेज झळाळी ॥१॥

पालख लावियला कैलासी । दाक्षयणिचे कुशी ।

पुत्र जन्मला हॄषकेशी । गौरिहाराचे वंशी ॥२॥

चौदा विद्यांचा सागर । वरदाता सुखसागर ।

दुरिते निरसिली अपार । विष्णूचा अवतार ॥३॥

लंबोदर म्हणता दे स्फुर्ति । अद्‍भुत ज्याची किर्ती ।

जीवनसुत अर्ची गुणमुर्ती । सकळिक वांछा पुरती ॥४

Friday, 21 December 2018

दत्तावतार

#दत्त_जयंती 

आपणास माहितच असेल की या कलयुगात भक्ताचा उध्दार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रम्हा, विष्णु, शिव या त्रिमूर्तीनी श्री दत्तात्रेय यांचा अवतार घेतला. ब्रम्हदेव 'सोम(चंद्र)' झाला. श्रीविष्णू 'दत्त' झाला आणि महेश 'दुर्वास' झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, "आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा 'दत्त' येथेच राहील. तोच त्रिमुर्ती आहे असे समज." अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमुर्ती दत्त मात्र आई-वडिलांची सेवा करीत तेथेच राहिले. ब्रम्हदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि-अनुसूयेचा पुत्र, श्रीविष्णूचा अवतार असूनही त्रिमुर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व अत्रि-अनुसूयेला देवांनी तो दिला म्हणून 'दत्त'!तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परम्परेचे मूळ पीठ आहे.

श्रीदत्तात्रेय पासून पुढे तीन अवतार झाले प्रथम श्रीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हा अवतार, द्वितीय श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज, व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज. हे तिन्ही अवतार श्री गुरू दत्तात्रेय यांचे आहेत. त्यांची संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे ...

१) श्री गुरु दत्तात्रेय...
माता पिता - अनसूया/अत्रि.
जन्म स्थान - माहुर (नांदेड)
निवासक्षेत्र - गिरनार (गुजरात)
वेष - अवधूत
जयंती - मार्गशीर्ष शु. १५ (दत्त पौर्णिमा)

२) श्रीपादवल्लभ....
माता पिता - सुमती/अप्पलराज.
जन्मस्थान - पीठापुर (आन्ध्र प्रदेश)
निवासक्षेत्र - कुरगड्डी (कुरवपूर) कर्नाटक.
वेष - ब्रम्हचारी
जयंती - भाद्रपद शु. ४ (गणेश चतुर्थी)

३) श्रीनृसिंहसरस्वती....
माता पिता - अंबा/माधव.
जन्मस्थान - लाड कारंजा (वाशीम महाराष्ट्र)
निवासक्षेत्र - नरसोबावाडी, औदुंबर गाणगापूर...
वेष - संन्यासी
जयंती - पौष शु. २

४) श्री स्वामी समर्थ अक्कलकोट....
माता पिता - ( --------- )
जन्मस्थान - कर्दळीवनात वारुळातून प्रगट
निवासक्षेत्र - अक्कलकोट (२२ वर्षे )
वेष - संन्यासी दिगंबर
जयंती - चैत्र शु. २

🔶 पिठापूर, कुरवपूर, कडगंची, गाणगापूर व अक्कलकोट श्री स्थाने अतिशय पवित्र व जागृत आहेत.

🔶 कुरवपूर येथे तर साक्षात श्रीपादवल्लभांनी 14 वर्ष अनुष्ठान केले आहे. ही जागा नामस्मरण, पारायणासाठी खूप चांगली आहे...

🏵 श्रीगुरुदेवदत्त 🏵

पादुका दर्शन हां दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे। विविध श्री दत्त क्षेत्री विविध प्रकारच्या पादुका ::

१ ) श्री विमल पादुका = औदुम्बर
२ ) श्री मनोहर पादुका = वाड़ी
३ ) श्री निर्गुण पादुका = कारंजा
४ ) श्री निर्गुण पादुका = गाणगापुर
५ ) श्री निर्गुण पादुका = लातूर
६ ) श्रीपाद श्रीवल्लभ पादुका = कुरवपुर
७ ) श्री करुणा पादुका = कड़ गंची
८ ) श्री स्वामी समर्थ पादुका = अक्कलकोट
९ ) श्रीपाद श्रीवल्लभ पादुका = पीठा पुर
१० ) श्री दत्त पादुका = गिरनार
११ ) श्रीशेष दत्त पादुका = बसव by कल्याण
१२ ) अवधूत पादुका = बाळे कुन्द्री
१३ ) प्रसाद पादुका = वासुदेव निवास ।।

🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹                                           

🙏.गुरुपादुकांचे महत्व.🙏

श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्व आहे. श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त सांप्रदायात गुरूपेक्षा गुरुचरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त पंथीयात श्रीगुरु व त्यांच्या चरणपादुका यांना फार महत्व आहे. श्री गुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर भाव दर्शविला होता.

अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्ती विषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की, श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवीशक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण-स्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तांत संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानांत दत्त मूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे.

गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत.

गाणगापूर येथे श्री नृसिंहसरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे.

नृसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजा केली जाते.

देवगिरीवर जनार्दनस्वामींच्या समाधी स्थानी पादुकाच आहेत.

विष्णुचा जसा शाळीग्राम.... तसे दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्वाचे स्थान आहे. या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच 'मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥' असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते.

🙏पादुकांना नमस्कार कसा करावा?🙏

(पादुका हे शिव आणि शक्ति यांचे प्रतीक असते अन् नमस्कार करतांना त्रास होऊ नये; म्हणून पादुकांच्या खूंटयांवर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करणे.) 'डावी पादुका ही शिवस्वरुप आणि उजवी पादुका ही शक्तिस्वरुप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ति आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ति होय.पादुकांच्या अंगठयातून (पादुकांच्या खूंट्यातून आवश्यकते प्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ति बाहेर पडत असते. ज्या वेळी आपण पादुकांच्या अंगठयावर डोके टेकवून नमस्कार करतो, त्या वेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ति न पेलवल्याने त्रास होऊ शकतो. यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठयावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर (जेथे संतांच्या पायांची बोटे येतात) तेथे टेकवावे.

॥ श्री गुरुदेव दत्त ॥ श्री स्वामी समर्थ ॥

Thursday, 20 December 2018

शेंडीन कापलाय गळा

बळीराजाला मारुनी लाथा, तुकोबाची बुडवली गाथा
संभाजीचा करुनी घात, भटांनी धर्म बुडवला होता
येऊन पेशव्यांनी जाळला शिवशाहीचा मळा
अरे कधी कळणार तुला मावळ्या तुझा
*#_शेंडीने_कापलाय_गळा ।।१।।*

अशी ही गद्दार भटा बामनाची जात
विश्वासाचा त्यांनी केला विश्वासघात
सावधान त्यापासून नका लावू त्यांना लळा
अरे कधी कळणार तुला मावळ्या
*#_शेंडीने_कापलाय_गळा ।।२।।*

लेखणीच्या जोरावर भटांनी बाजार सुरू केला
ज्याची लायकी नाही असा उघडेबाबा गुरु केला
जातीसाठी भटांनी खाल्ला मातीचा गोळा
अरे कधी कळणार तुला मावळ्या
*#_शेंडीने_कापलाय_गळा ।।३।।*

समजून घे तु नीट भटांच कपट
गोड-गोड बोलुनी आपलीच लावली वाट
वारकरी उपाशी बडवे माल करीत गोळा
अरे कधी कळणार तुला मावळ्या
*#_शेंडीने_कापलाय_गळा ।।४।।*

धर्माच्या नावाने यांनी दंगली घडविल्या
आपल्या किती पिढ्या देशोधडीला लावल्या
वापरूनी घेतला त्यांनी शिवबाचा मावळा
अरे कधी कळणार तुला मावळ्या
*#_शेंडीने_कापलाय_गळा ।।५।।*

शूद्र म्हणुनी हिणविले यांनी छत्रपती
तुमची आमची मग काय सांगा काय स्थिती
नका भटाळु आता त्या भटांनाच टाळा
अरे कधी कळणार तुला मावळ्या
*#_शेंडीने_कापलाय_गळा ।।६।।*

धर्मासाठी ब्राह्मणांनी सांगा काय केले
स्वार्थासाठी तुकोबांच्या गाथेला बुडविले
बहुजणांचा यांनी केला पालापाचोळा
अरे कधी कळणार तुला मावळ्या
*#_शेंडीने_कापलाय_गळा ।।८।।*

त्यांची पोरं गेली परदेशात अभ्यास करायला
भडकवुन आपल्याला लावले दंगलीत मरायला
समजून घ्या आतातरी
कपटी भटांचा कपटी चाळा
अरे कधी कळणार तुला मावळ्या तुझा
*#_शेंडीने_कापलाय_गळा ।।९।।*

ज्या दिवशी या देशात दक्षिणा  भेटली नाही म्हणून जोतिषी आत्महत्या करेल, तो दिवस बळी वंशजाच्या मुक्तीचा दिवस असेल.

           *👉🏻महात्मा जोतिराव फुले👈🏻*

दत्तात्रेय स्तोत्र

◆◆◆ मराठी अर्थासहित दत्तात्रेय स्तोत्र ◆◆◆

☆- हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे. असे हे स्तोत्र श्रीनारदपुराणातील असुन हे स्वतः श्रीनारदमुनींनीच रचले आहे.

☆- हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रम्हानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. तथा या स्तोत्राच्या नियमित पठणाने श्रीगुरुदत्तात्रेयांचा कृपाशिर्वाद लाभेल.

◆◆ ॥ श्रीदत्तत्रेय स्तोत्रम् ॥ ◆◆
====================
ध्यानम्
----------
जटाधरं पाण्डुरंगं
शूलहस्तं कृपानिधिम् |
सर्वरोगहरं देवं
दत्तात्रेयमहं भजे ||
◆(अर्थ :- जटाधारी, गौरवर्ण, हातात त्रिशूल धारण करणाऱ्या. दयानिधी, सर्वरोग नाहीसे करणार्या श्रीदत्तत्रेयदेवांना मी भजतो.)

विनियोग: :-
---------------
ॐ अस्य श्रीदत्तत्रेयस्तोत्रमन्त्रस्य
भगवान् नारद ऋषि; अनुष्टुप् छन्दः
परमात्मा देवता, श्रीदत्तप्रीत्यर्थं
जपे विनियोग: ||

जगदुत्पत्तिकर्त्रे च
स्थितिसंहारहेतवे |
भवपाशविमुक्ताय
दत्तात्रेय नमोस्तु ते ||1||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, जगाची उत्पत्ती करणार्या, तसेच जगाचे अस्तित्व व नाश यांना कारण असणार्या पण संसारबंधनापासून मुक्त असणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

जराजन्मविनाशाय
देहशुद्धिकराय च |
दिगंबर दयामुर्ते
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||2||
◆(अर्थ :- हे दिगंबर, दत्तात्रेय, आपण दयेचे मुर्तिमंत रुप. वार्धक्य व पुनर्जन्म नाहीसे करणार्या आणि देह शुद्ध करणार्या तुम्हांला नमस्कार असो. )

कर्पूरकान्तिदेहाय
ब्रम्मूर्तिधराय च |
वेदशास्त्रपरिज्ञाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||3||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, आपली देहकांति कापरासारखी. आपणच ब्रम्हदेवरुप धारण केलेत. वेद-शास्त्र पूर्ण जाणणार्या तुम्हांला नमस्कार असो.)

ह्रस्वदीर्घकृशस्थूल
नामगोत्रविवर्जित |
पञ्चभूतैकदीप्ताय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||4||
◆(अर्थ :- स्वेच्छेने आखूड, लांब, कृश, स्थूल रुपे धारण करणारे पण नाव व गोत्र नसलेले हे दत्तात्रेय, पंचमहाभूते हेच एक दीप्तिमान शरीर असणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

यज्ञभोक्त्रे च यज्ञाय
यज्ञरुपधराय च |
यज्ञप्रियाय सिध्दाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||5||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, यज्ञाचा उपभोग घेणार्या, स्वतः यज्ञ असलेल्या, यज्ञरुप धारण करणाऱ्या, यज्ञ प्रिय असणाऱ्या सिद्ध अशा तुम्हांला नमस्कार असो.)

आदौ ब्रम्हा मध्ये विष्णुर्
अन्ते देवः सदाशिवः |
मुर्तित्रयस्वरुपाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||6||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, उजवीकडून आधी ब्रम्हा, मध्ये विष्णू, शेवटी सदाशिव अशा त्रिमूर्तिरुप तुम्हांला नमस्कार असो.)

भोगालयाय भोगाय
योगयोग्याय धारिणे |
जितेन्द्रिय जितज्ञाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||7||
◆(अर्थ :- हे जितेन्द्रिय दत्तात्रेय, सर्व सुखभोगांची खाण व सुखभोगस्वरुप आपणच. योगाला योग्य रुप आपण धारण केलेत. संयमी लोकांनाच ज्यांचे ज्ञान होते, अशा तुम्हांला नमस्कार असो.)

दिगंबराय दिव्याय
दिव्यरुपधराय च |
सदोदितपरब्रम्ह
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||8||
◆(अर्थ :- हे नित्य परब्रह्मरुप दत्तात्रेय, दिशा हेच आपले वस्त्र. स्वतः दिव्य असून दिव्य रुप धारण करणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

जम्बूद्वीपे महाक्षेत्रे
मातापुरनिवासिने |
जयमानः सतां देव
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||9||
◆(अर्थ :- नेहमी विजयी होणारे, संतांचें देव, हे दत्तात्रेय, जम्बूद्वीपातील महाक्षेत्र अशा मातापुरात माहुरगडावर आपण राहता. तुम्हांला नमस्कार असो.)

भिक्षाटनं गृहे ग्रामे
पात्रं हेममयं करे |
नानास्वादमयी भिक्षा
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||10||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, हातात सुवर्ण पात्र घेऊन गावागावांत घराघरांतून भिक्षा मागून नाना प्रकारच्या स्वादांनी युक्त भिक्षा घेणार्या तुम्हांला नमस्कार असो.)

ब्रम्हज्ञानमयी मुद्रा
वस्त्रे चाकाशभूतले |
प्रज्ञानघनबोधाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||11||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, ज्यांनी ब्रम्हज्ञान - मुद्रा धारण केली आहे, आकाश व पृथ्वी ही ज्यांची वस्त्रे आहेत. आणि ज्यांची जाणीव आत्मज्ञानपूर्ण आहे, अशा तुम्हांला नमस्कार असो.)

अवधूत सदानंद
परब्रह्मस्वरुपिणे |
विदेहदेहरुपाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||12||
◆(अर्थ :- हे अवधूत, नित्य आनंदरूप दत्तात्रेय, देहात असूनही विदेही अशा परब्रह्मस्वरुप तुम्हांला नमस्कार असो.)

सत्यरुप सदाचार
सत्यधर्मपरायण |
सत्याश्रय परोक्षाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||13||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, सत्यरुपी, सदाचरणात व धर्मात तत्पर व सत्याचे आश्रय तुम्ही आहात. इंद्रियांना न कळणार्या तुम्हांला नमस्कार असो.)

शूलहस्त गदापाणे
वनमालासुकन्धर |
यज्ञसूत्रधर ब्रम्हन्
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||14||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, आपण हातात त्रिशूळ व गदा धारण केली आहे. आपला गळा वनातील फुलांच्या माळांनी शोभत आहे. यज्ञोपवीत धारण करणार्या ब्राह्मणस्वरुप आपल्याला नमस्कार असो.)

क्षराक्षरस्वरुपाय
परात्परतराय च |
दत्तमुक्तिपरस्तोत्र
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||15||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, विनाशी विश्वरुप व अविनाशी परमात्मरुप आपनच धारण करता. मुक्तिपर स्तोत्र रचण्याची स्फुर्ती आपणच दिली. पर अशा प्रकृतीच्याही पलीकडे असणाऱ्या आपल्याला नमस्कार असो.)

दत्तविद्याय लक्ष्मीश
दत्तस्वात्मस्वरुपिणे |
गुणनिर्गुणरुपाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||16||
◆(अर्थ :- हे लक्ष्मीचे स्वामी दत्तात्रेय, ज्यांनी ब्रम्हविद्या दिली व आत्मस्वरूपाची प्राप्ती करुन दिली, ज्यांची त्रिगुणात्मक व त्रिगुणातीत अशी उभय रुपे आहेत, अशा आपल्याला नमस्कार असो.)

शत्रुनाशकरं स्तोत्रं
ज्ञानविज्ञानदायकम् |
सर्वपापं शमं याति
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||17||
◆(अर्थ :- हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रम्हानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. हे दत्तात्रेय, आपल्याला नमस्कार असो.)

इदं स्तोत्रं महद्दिव्यं
दत्तप्रत्यक्षकारकम् |
दत्तात्रेयप्रसादाच्च
नारदेन् प्रकीर्तितम् ||18||
|| इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं

Tuesday, 18 December 2018

फ्लॅटखरेदी करताना या महत्वपूर्ण गोष्टींची माहिती ठेवा !

फ्लॅटखरेदी करताना या महत्वपूर्ण गोष्टींची माहिती ठेवा !

१. Carpet area – (कार्पेट एरीआ – चटई क्षेत्र) – कार्पेट एरीआ म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारी जागा. याचा अर्थ असा की फ्लॅट मधील जेवढी जागा आपण प्रत्यक्षात राहण्यासाठी वापरु शकतो ती जागा. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चार भिंतींमधील जागा ज्यावर तुम्ही गालिचा (Carpet) पसरवू शकता.

२. Built up Area – ( बिल्ट अप एरीआ) – कार्पेट एरीआ अधिक आतील व बाहेरील भिंतींची जाडी म्हणजे बिल्ट अप एरीआ. बिल्ट अप एरीआ हा साधारणपणे कार्पेट एरीआ पेक्षा १०% ते १५% जास्त असतो.

३. Super built up / Saleable area ( SBU – सुपर बिल्ट अप एरीआ) – बिल्ट अप एरीआ अधिक लिफ्ट, जिना यांसाठी वापरण्यात आलेली संयुक्त जागा म्हणजे सुपर बिल्ट अप (SBU). साधारणपणे Super built up area बिल्ट अप एरीआच्या २५% ते ३०% जास्त असतो. सध्याचे बिल्डर्स स्थावर मालमत्ता ४०℅ पर्यंत सुपर बिल्टअप एरीआच्या आधारे विकतात. ( मात्र प्रत्यक्षात खरेदी करारावर कार्पेट एरीआचीच नोंद असते.)समजा तुम्ही बिल्डर कडून खरेदी करणार असलेल्या फ्लॅटचा सुपर बिल्ट अप एरीआ १००० चौरस फूट इतका असेल तर प्रत्यक्षात वापरासाठी मिळणारा कार्पेट एरीआ ६५० ते ७०० चौरस फूट असेल.

४. Approved plans -(मान्यताप्राप्तआराखडा) स्थावर मालमत्तेचा आराखडा हा संबंधीत महापालिकेने मंजुर केलेला असतो. यामध्ये प्रकल्पाचा आराखडाआणि प्रत्येक फ्लॅटचा आराखडा समाविष्ट असतो.हा एक महत्त्वाचा दस्तऐवज (Document) असुन बांधकाम कायदेशीर रीत्या करण्यात आले असल्याचा एक मुख्य पुरावा असतो. घर खरेदीचा निर्णय घेण्यापुर्वी मान्यताप्राप्त आराखडा अवश्य तपासून पहावा.

५. Completion Certificate -Occupation certificate (OC) हा एक महत्त्वाचा दाखला असतो. हा दाखला महानगर पालिके कडून बिल्डरला देण्यात येतो. ईमारतीमध्ये पाणी विजपुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे तसेच सुरुवातीस मंजुर केल्याप्रमाणे आणि मान्यताप्राप्त आराखड्याप्रमाणेईमारतीचे बांधकाम केले असल्याचा हा दाखला असतो. या दाखल्याद्वारे महानगरपालिकेने सदर ईमारत राहण्यायोग्य असल्याचेजाहीर केलेले असते.फ्लॅटची पुर्नविक्री करताना ह्या दाखल्याची आवश्यकता बैंकेला सर्वात जास्त असते त्याशिवाय लोन सॅक्शन होत नाही व पुढील व्यवहारात अडचणी येतात त्यामुळे हा दाखला लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा.

६. Mortgage (गहाणखत) – गृहकर्ज पुरविणारी बँक आणि खरेदीदार यांमध्ये झालेल्या करारानुसार गृहकर्जाची पुर्ण परतफेड होईपर्यंत विकत घेतलेल्या घराचा ताबा बँकेकडे ठेवला जातो. या करारास गहाणखत किंवा Mortgage deed / Agreement असे म्हणतात.मालमत्तेची सर्व कागदपत्रे कर्ज फिटेपर्यंत बँकेकडेच राहतात.

७. Possession letter – (मालकीपत्र) हे पत्रक बिल्डर कडून ग्राहकास देण्यात येते. यामध्ये असे लिहिलेले असते की मालमत्ता राहण्यासाठी पुर्णपणे तयार आहे आणि आता ग्राहकाकडे हस्तांतरीत करण्यात येत आहे. Possession letter (मालकीपत्र) मिळविल्याशिवाय ग्राहकास सदनिकेत राहण्यासाठी जातायेत नाही.

८. Registration of an agreement (करार नोंदणी) – बिल्डर आणि ग्राहकामध्ये जागेचा/घराचा जो करार झालेला असतो त्याची Indian registration Act खाली नोंदणी केली जाते. नोंदणी करण्यापुर्वी Stamp duty (मुद्रांकशुल्क) भरणे आवश्यक असते. स्थावर मालमत्ता विकत घेताना झालेला व्यवहार व करार यांची नोंदणी करणे अत्यावश्यक असते.सदर नोंदणी करण्यासाठी रजीस्ट्रेशन चार्जेस (Registration charges) द्यावे लागतात.

९. Sales deed (खरेदीखत) – जमिनीचा मूळ मालक/ बिल्डर यांनी ठराविक रकमेच्या मोबदल्यात मालमत्तेचा मालकी हक्क खरेदीदाराच्यानावे हस्तांतरीत करण्यासाठीचा जो करार केला जातो त्यास Sales deed असे म्हणतात. Sales deed ची नोंदणी करणे महत्त्वाचे असते.

१०. Stamp Duty – (मुद्रांक शुल्क)  नोंदणीकृत विक्री मुल्याच्या (Transaction Value) काही टक्के रक्कम मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात सरकारला द्यावे लागतात. ग्राहकाने Stamp duty भरलेली आहे आणि त्याच्या/ तिच्या नावावर मालमत्तेची नोंदणी झालेली आहे. Stamp duty विक्री मुल्याच्या५% ते १४% पर्यंत असते. हे दर वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असतात. घरखरेदीसाठी उपयुक्त ठरणारी ही माहिती आपल्याला नक्कीच आवडेल.