मल्हारी ध्यान
ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरीनिभं म्हाळसा भूषितांकम l
श्वेताश्वम् खडःग हस्तं विबुधबुधगणै सेव्यमानं कृतार्थे l
युक्तांघ्रि दैत्यमुन्ध्री डमरु विलसितं नैशचूर्णाभिरामम l
नित्यं भक्तेषु तुष्टं श्वगण परिवृत्तं नित्यमोङ्काररूपम् ll
- अर्थ -
ज्याचा वर्ण सुवर्ण आहे, म्हाळसेने ज्याची मांडी भूषितकेली आहे, ज्याचाघोडा पांढऱ्या रंगाचा आहे, ज्याच्याहातांत खड्ग आहे, शहाणे लोक ज्याचीसेवा करण्यांतस्वतःला कृतार्थ समजतात अशा मल्लारी देवाचे नित्यध्यानकरावे. दैत्याच्या मस्तकावर ज्याने पाय ठेवलेलाआहे, त्याच्या एका हातांतडमरू विलसत आहे, हरिद्राचूर्णामुळे तो सुंदर दिसतो आहे, ज्याच्याबरोबरकुत्रे आहे आणि भक्तांवर त्याची नित्य कृपाचअसते, असा हा मल्हारी देवनित्य ओंकाररूपच होय.
श्रीमल्हारि म्हाळसाकांत प्रातःस्मरणं
प्रातःस्मरामि भावभीतिहरं सुरेशं I
मल्हारिमिन्द्रकमलानन विश्ववंद्यम् I
श्रीम्हाळसावदन शोभितवामभागं I
मल्हारिदेवमनघं पुरुषं वसन्तम् II १ II
प्रातर्भजामि मणिमल्लजरुंडमालं I
माणिक्यदीप्ति शरदोज्वलदन्तपंक्तिम् I
रत्नैर्महामुगुटमण्डितमष्टमूर्तिम् I
सन्तप्तहेमनिभगौर शरीरपुष्टम् II २ II
प्रातर्नमामि फ़णिकज्जल मुक्तदीपम् I
चन्द्रार्ककुण्डल सुशोभित कर्णयुग्मम् I
सत्पात्र खड्ग डमरूच त्रिशूल हस्तं I
खण्डेन्दुशेखर निभं शशिसूर्यनेत्रम् II ३ II
इदं पुण्यमयं स्तोत्रं मल्हारेर्यपठेन्नरः I
प्रातः प्रातः समुत्थाय सर्वत्र विजयी भवेत् II ४ II
II इति श्रीमल्हारि म्हाळसाकांत प्रातःस्मरणं II
मराठी अर्थ:
मी सकाळी सकाळी या भवसागरांतील भयाचे हरण करणाऱ्या शंकराचे स्मरण करतो. त्या विश्ववंद्य असलेल्या मल्हारीचे स्मरण करतो. श्रीम्हाळसा या आपल्या पत्नीच्यामुळे त्याच्या शरीराचा डावा भाग शोभून दिसत आहे, देवांना भयमुक्त करणाऱ्या सर्व पुरुषामध्ये श्रेष्ट (वसंत) अशा श्रीमल्हारीचे स्मरण करतो. मी सकाळी मणी व मल्ल या दैत्यांच्या रुंडमाला पायदळी असलेल्या श्रीमल्हारीचे भजन करतो. माणीक्याच्या तेजाने दैदिप्यमान अशी दीप्ती व पांढरीशुभ्र दंतपंक्ति व रत्नांनी मढविलेला मुकुट धारण केलेली मूर्ती व संतप्त (मणी-मल्ल दैत्यांमुळे) झाल्यामुळे हेमनिभगौर झालेले पुष्ट शरीर असलेल्या श्रीमल्हारीचे भजन करतो. मी सकाळी सकाळी या रवी-चंद्र हे कर्णकुंडले असलेल्या, हातांत खड्ग, डमरू व त्रिशूल आणि जणू रवी व चंद्र हेच डोळे असलेल्या श्री मल्हारी- म्हाळसाकांताचे स्मरण करतो. असे हे श्री मल्हारी- म्हाळसाकांताचे पुण्यमय स्तोत्र सकाळी सकाळी जो म्हणेल तो सर्वत्र विजयी होईल. अशा रीतीने हे श्री मल्हारी- म्हाळसाकांताचे प्रातःस्मरण त्यालाच अर्पण करू.
मल्हारी षडःन्यास
ॐ मल्लारये अंगुष्ठाभ्यां नमः ll
ॐ म्हाळसानाथाय तर्जनीभ्यां नमः ll
ॐ मेंग नाथाय मध्यमाभ्यां नमः ll
ॐ महिपतये अनामिकाभ्यां नमः ll
ॐ मैराळाय कनिष्ठाभ्यां नमः ll
ॐ खड्गराजाय करतलपृष्ठाभ्यां नमः ll
एक श्लोकी मल्हारी महात्म्य
ll एक श्लोकी मल्हारी महात्म्य ll
पूर्वं धर्मसुतास्तपोवनगता मल्लेन संतर्जिता
जिष्णुंविष्णुमतीत्य शंभुमभजन् तेनावतीर्य क्षितौ
तत्रोल्का मुखमुख्य दैत्य निवहं हत्वामणिं मल्लकं
देवः प्रेमपुरेSर्थीतोSवतु वसन् लिङ्गं द्वयात्माSर्थदः ll
मल्हारी कवच
No comments:
Post a Comment