👆
*रोज झोपण्याआधी खात जा गुळ*
थंडीच्या दिवसात गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. आयुर्वेदातील तत्त्वांनुसार गुळामुळे शरीरातील Acid नाश पावते. जर तुम्ही लागोपाठ ७ दिवस गुळ खाल्ला तर त्याचे जे फायदे होतील त्याचा तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल. तुमच्या शरीरासाठी गुळ म्हणजे अमृतासमान आहे. गुळ हा खूप सार्या रोगांवर औषध म्हणून उपयोगी पडतो.
*गुळाचे फायदे*
1) रोज गुळ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच यामुळे तुमच्या पोटात कधीच Gas होणार नाही.
2) गुळ महिलांच्या मासिक पाळीतही फायदेशीर ठरतो. मासिक पाळी आल्याने पोट दुखीचा त्रास होतो, अशात जर गुळ खाल्ला तर होणारा त्रास कमी होईल.
3) रोज गुळ खाल्ल्याने त्वचेला तेज येते आणि त्वचेवरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात.
4) सर्दी, खोकला येत असेल तर गुळाचा खडा टाकून चहा पिल्याने आराम मिळतो.
5) गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही, नेहमी उर्जा राहील आणि प्रसन्न राहाल.
6) गुळात कोणत्याही अलेर्जी विरुद्ध लढणारी तत्व असतात, दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो.
7) गुळाला आल्यासोब्त गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार कमी होतात.
*सूचना :- कृपया वैद्यकीय सल्ला आवश्यक घेणे.*
No comments:
Post a Comment