Saturday, 12 January 2019

अक्कलकोटी वसे देव माझा,

अक्कलकोटी वसे देव माझा,
      स्वामी समर्थ तो माझा राजा.
सुखाचे द्वार अक्कलकोटी,
        असे स्वामी उभे भक्तांसाठी .
रंजाल्या गंजाल्यांचा सहारा,
       तो चालवी ब्रम्हांण्ड हा सारा.
स्वामी असे सम माऊली,
          भक्तांना सदा कृपा सावली.
भिऊ नको म्हाणे मी पाठीशी, 
        बळ देतो लडण्या संकाटांशी .
स्वामी  माझे असे कृपासिंधु ,
         अन  औदुंबर असे मानबिंदु  .
येता कधी अश्रू डोळ्यात,
          स्वामी नाम घ्या रे मुखात .
जाता स्वामी समर्था शरण,
              धन्य धन्य होई जीवन.
स्वामी प्रेमचा असे हो भुकेला,
     साद देतो भक्तांच्या हाकेला. 
स्वामी तुमच्याविना सर्व व्यर्थ ,
      नाम घेतो फक्त स्वामी समर्थ....
          !!  श्री स्वामी समर्थ   !!
   ⚘⚘शुभ सकाळ ⚘⚘

No comments:

Post a Comment