जय श्रीराम जय हनुमान l
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता
जानकीच्या विरहाने रामराय दु:खी झाले.
आश्वासन देऊनिया तुवा तया तोषविला.
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता
लंकेमाजी सीतामायी उपवासे कृश झाली
रामध्यानी मग्न झाली तुवा तिला आश्वासिले
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता
लक्षुमणाशी मुर्च्छा आली, राममुख शुष्क झाले
संजीवनी देओनिया लक्ष्मणा उठविले
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता
अल्प शक्ती मंद बुद्धी आपला मी आहे भक्त
शक्ती बुद्धी देओनिया दासाला ह्या उद्धरावं
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता
No comments:
Post a Comment