आज ज्योतिर्लिंग पाहू या चला
आज केदारलिंग पाहू या चला llधृ ll
वेद शास्त्र अन सर्व पुराणे
वर्णन करिती एक मुखाने
त्रय देवाच्या तेज ज्योतिने
दिव्य अवतार झाला ll1ll
वर्णन करूनी शेष ही थकला
लीन होउनि पदी राहिला
आसन दिधलें श्री नाथाना
तो हा केदारलिंग पाहू या चला ll2ll
हिमालायाचा त्याग करोनि
रत्नागिरीवर आले धाऊनी
दुष्ट राक्षसां संहारोनी
रत्नागिरीवर उभा राहिला ll3ll
युगे युगे अवतार जो घेतो
भक्तांसाठी धावुन येतो
संकटकाली रक्षण करतो
तो हा ज्योतिर्लिंग पाहू या चला ll4ll
राऊळी जाऊन दर्शन घेऊ
ध्यानी मनी ते स्वरूप ठेऊ
क्रमनपदावरी मस्तक ठेऊ
मुखी सदा बोलू चांगभलां ll5ll
No comments:
Post a Comment