Monday, 23 September 2019

श्रीदत्तगुरुंची जूनी आरती

🌹🌷🙏🏻🌷🌹
*श्री दत्तगुरूंची जुनी आरती, अलीकडे कुठल्याही आरती संग्रहात नसते म्हणून आज मुद्दाम  audio सह देत आहे.*
☘☘☘☘☘☘☘
*श्रीगुरू दत्तराज मूर्ती ओवाळितो प्रेमे आरती*
*ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार श्रीगुरूंचा*
*कराया उद्धार जगाचा जाहला बाळ अत्री ऋषींचा*
*धरीला वेष असे यतीचा मस्तकी मुगुट शोभे जटेचा*
*कंठी रूद्राक्ष माळ धरूनी*
*हाता मधे आयुध बहुत भरूनी*
*तेणें भक्तांची क्लेश हरूनी*
*त्यासी करूनी नमन, होय अती शमन, होय रिपू दमन असे त्रैलोक्यावरती ॥*
*गाणगापुरी वस्ती ज्याची प्रीती औदुंबर छायेची*
*भीमा अमरजा संगमाची भक्ती असे बहुत सुशिष्यांची*
*वाट दावूनिया योगाची ठेव देतसे निजमुक्तीची*
*काशी क्षेत्री स्नान करीतो*
*करवीरी भिक्षेला जातो*
*माहूर निद्रेला वरी तो*
*तरतरीत छाती, झरझरीत नेत्र, गरगरीत शोभतो त्रिशूल जया हाती ॥*
*अवधूत स्वामी सुखानंदा ओवाळीतो सौख्य कंदा*
*तारी या दास रूदनकंदा सोडवी विषय मोह छंदा*
*आलो शरण अत्रीनंदा दावी सद्गुरू ब्रह्मानंदा*
*चुकवी चौ-यांशीचा फेरा*
*घालिती षड्ररिपू मज घेरा*
*गांजिती पुत्र पौत्र दारा*
*वदवी भजन मुखी, तव पुजन, करीतसे सुजन, जयाचे बलवंता वरती ॥*
☘☘☘☘☘☘☘

No comments:

Post a Comment