Tuesday, 9 May 2017

सुमंगल सुप्रभात स्वामी समर्थ

सुमंगल सुप्रभात श्री स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ.

नाचू गाऊ आनंदे स्वामी समर्थ ।
नाम त्यांचे घेता मनी होय हर्ष ॥ धृ ॥

घटका जाती पळे जाती वेळ जातो व्यर्थ ।
मुखाने हो म्हणा तुम्ही स्वामी समर्थ ॥ १ ॥

राम नाम घेता वाल्या झाला सार्थ ।
'स्वामी' नामे भरा तुम्ही जीवनात अर्थ ॥ २ ॥

नाम किती सोपे अक्षरे ती दोन ।
जाणूनिया घ्या रे तुम्ही त्याचे सामर्थ्य ॥ ३ ॥

स्वामी लिला असती अगम्य अतर्क्य ।
चाखा तुम्ही तयातील सुक्ष्म मधूअर्क ॥ ४ ॥

गुरुपदी लीन होणे हाचि एक धर्म ।
सदगुरुची सेवा हेचि निष्काम कर्म ॥ ५ ॥
।।ॐ...गुरुदेव दत्त महाराज श्री स्वामी समर्थ।।

No comments:

Post a Comment