प्रभात समयी आली दत्तगुरूंची फेरी
अलख निरंजन अलख निरंजन मंत्र मुग्ध
नगरी झाली मंत्र मुग्ध नगरी
पायी खडावा डमरू डमडम त्रिशूल खण खण
करी
दाही दिशातुनी नभा फाकली आसमंत
चंदेरी
प्रभात समयी आली दत्तगुरूंची फेरी .. !!
थरथरला थरथरला औदुंबर थरथरला येता दत्त
अवतारी
प्रभात समयी आली दत्तगुरूंची फेरी .. !!
रवी किरणांचे तेज पसरले अस्माकीत
तनुवरी
कमंडलातुनी ओमकाराचा नादब्रह्म भूवरी
आनंदाने नाचे तनमन दत्त दत्त गजरी जय जय
दत्त गजरी
प्रभात समयी आली दत्तगुरूंची फेरी .. !!
शुभ सकाल।
No comments:
Post a Comment