पायाच्या टाच दुखीवर घरगुती उपाय
टाचदुखी कशामुळे होते?
बहुतांश प्रकरणी पायातील उतींचा एक पट्टा, ज्याला "प्लांटर फेशिया‘ असे म्हणतात, त्याचे नुकसान झाले किंवा तो घट्ट झाला की टाचदुखी होते. प्लांटर फेशिया हा ऊतींचा एक कडक आणि लवचिक पट्टा असतो, जो पायाच्या तळव्याखालून जातो. तो टाचेच्या हाडाला पायाच्या हाडांशी जोडतो आणि पायासाठी शॉक ऍब्सॉर्बर म्हणून कार्य करतो. या प्लांटर फेशियाचे नुकसान होऊन आतमध्ये लहान फटी (मायक्रो टियर्स) विकसित होऊ शकतात. यामुळे प्लांटर फेशिया घट्ट होऊ शकतो आणि टाचदुखी जडते. अशा वेळी आजूबाजूची ऊती आणि टाचेचे हाड यांचादेखील काही वेळेस दाह होऊ शकतो. प्लांटर फॅसायटीस हे टाचदुखीचे सर्वांत सामान्य कारण आहे.
काही सोपे उपचार
१. खड़े मीठ गरम पाण्यात टाकुन टाचा शेकाव्यात.
२. टांचदुखी हा वाताचा प्रकार आहे. होमिओपथिच्या गोळ्या घ्याव्यात
३. मऊ चपला मिळतात त्या वापराव्या.
४. फिजिओ थेरेपीचे काही सोपे एकसरसाइज जसे भिंतीला हात टेकून उभे रहायचे अणि पायाच्या बोटानी टाचा वर उचलून जागच्या जागेवर जॉगिंग करायच.
५. जमिनीवर टॉवेल पसरून पाय त्यावर ठेवून पायाच्या बोटा नी टॉवेल जवळ आणायचा.
६. टाचेवर बिब्बा घालून पहा.
७. रूईचे पान व विटेचा तुकडा गरम करून त्याने टाचा शेकणे.
८. गोडे तेलात मीठ घालून फेटावे व रात्री टाचेला लावून प्लास्टिकचा कागद बांधून झोपावे.
९. पाण्याची pet.वाटली पाणी भरून फ्रिजर मधे ठेवली. पूर्णपणे. बर्फ झाल्यावर पायाखाली ठेवुन पाय पुढे मागे करत रहावे.सुरवातीला खुपच गार वाटते पण मग बरे वाटु लागते .असे साधारण ५ १०मिनिटे करावे. असे दिवसातुन २ ३वेळा करावे. दुसर्या दिवशी बराच फरक वाटेल.असे ३-४ दिवस केल्यावर खुपच फरक पडलेला जाणवेल.
१०. बर्फाच्या शेकाने स्नायूंना आलेली सूज जाते व त्यामुळे बरे वाटते.
११. योग्य प्रकारची पादत्राणे वापरणे देखील महत्त्वाचे आहे. शक्यतो, आपण आपल्या पायाचे बाक आणि टाचा यांना आधार आणि मऊपणा देणाऱ्या कमी ते मध्यम टाचेची पादत्राणे घालावीत. टाचा नसलेले शूज घालणे टाळावे. स्पंजची गादी असलेली पादत्राणे वापरावीत.
१२. शक्य तेवढी विश्रांती घ्यावी. पाय सरळ व थोडा उंच करून ठेवावा. बर्फाचा शेक घ्यावा.
Saturday, 23 September 2017
टाचदुखीवर उपाय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment