🌹 *तुलसी कवचम्* 🌹
*श्री गणेशाय नमः II*
*अस्य श्री तुलसीकवच स्तोत्रमंत्रस्य I*
*श्री महादेव ऋषिः I अनुष्टुप्छन्दः I*
*श्रीतुलसी देवता I मन ईप्सितकामनासिद्धयर्थं जपे विनियोगः I*
*तुलसी श्रीमहादेवि नमः पंकजधारिणी I*
*शिरो मे तुलसी पातु भालं पातु यशस्विनी II १ II*
*दृशौ मे पद्मनयना श्रीसखी श्रवणे मम I*
*घ्राणं पातु सुगंधा मे मुखं च सुमुखी मम II २ II*
*जिव्हां मे पातु शुभदा कंठं विद्यामयी मम I*
*स्कंधौ कह्वारिणी पातु हृदयं विष्णुवल्लभा II ३ II*
*पुण्यदा मे पातु मध्यं नाभि सौभाग्यदायिनी I*
*कटिं कुंडलिनी पातु ऊरू नारदवंदिता II ४ II*
*जननी जानुनी पातु जंघे सकलवंदिता I*
*नारायणप्रिया पादौ सर्वांगं सर्वरक्षिणी II ५ II*
*संकटे विषमे दुर्गे भये वादे महाहवे I*
*नित्यं हि संध्ययोः पातु तुलसी सर्वतः सदा II ६ II*
*इतीदं परमं गुह्यं तुलस्याः कवचामृतम् I*
*मर्त्यानाममृतार्थाय भीतानामभयाय च II ७ II*
*मोक्षाय च मुमुक्षूणां ध्यायिनां ध्यानयोगकृत् I*
*वशाय वश्यकामानां विद्यायै वेदवादिनाम् II ८ II*
*द्रविणाय दरिद्राण पापिनां पापशांतये II ९ II*
*अन्नाय क्षुधितानां च स्वर्गाय स्वर्गमिच्छताम् I*
*पशव्यं पशुकामानां पुत्रदं पुत्रकांक्षिणाम् II १० II* *राज्यायभ्रष्टराज्यानामशांतानां च शांतये I*
*भक्त्यर्थं विष्णुभक्तानां विष्णौ सर्वांतरात्मनि II ११ II*
*जाप्यं त्रिवर्गसिध्यर्थं गृहस्थेन विशेषतः I*
*उद्यन्तं चण्डकिरणमुपस्थाय कृतांजलिः II १२ II*
*तुलसीकानने तिष्टन्नासीनौ वा जपेदिदम् I*
*सर्वान्कामानवाप्नोति तथैव मम संनिधिम् II १३ II*
*मम प्रियकरं नित्यं हरिभक्तिविवर्धनम् I*
*या स्यान्मृतप्रजा नारी तस्या अंगं प्रमार्जयेत् II १४ II*
*सा पुत्रं लभते दीर्घजीविनं चाप्यरोगिणम् I*
*वंध्याया मार्जयेदंगं कुशैर्मंत्रेण साधकः II १५ II*
*साSपिसंवत्सरादेव गर्भं धत्ते मनोहरम् I*
*अश्वत्थेराजवश्यार्थी जपेदग्नेः सुरुपभाक II १६ II*
*पलाशमूले विद्यार्थी तेजोर्थ्यभिमुखो रवेः I*
*कन्यार्थी चंडिकागेहे शत्रुहत्यै गृहे मम II १७ II*
*श्रीकामो विष्णुगेहे च उद्याने स्त्री वशा भवेत् I*
*किमत्र बहुनोक्तेन शृणु सैन्येश तत्त्वतः II १८ II*
*यं यं काममभिध्यायेत्त तं प्राप्नोत्यसंशयम् I*
*मम गेहगतस्त्वं तु तारकस्य वधेच्छया II १९ II*
*जपन् स्तोत्रं च कवचं तुलसीगतमानसः I*
*मण्डलात्तारकं हंता भविष्यसि न संशयः II २० II*
*II इति श्रीब्रह्मांडपुराणे तुलसीमाहात्म्ये तुलसीकवचं नाम स्तोत्रं श्रीतुलसी देवीं समर्पणमस्तु II*
*तुलसीकवचं मराठी अर्थ:*
तारकासुराचा युद्धांत पराभव करून त्याचा वध कार्तिक स्वामीच करू शकत होता. म्हणून देवानी कार्तिक स्वामीला तारकासूराशी युद्ध करण्याची विनंती केली होती. कार्तिक स्वामी हा शंकर-पार्वतीचा मुलगा म्हणून हे तुलसी कवच शंकराने कार्तिक स्वामीला सांगितलेले आहे. श्रीगणेशाला नमस्कार असो. या तुलसीकवचस्तोत्र मंत्राचे महादेव हे ऋषी आहेत. ह्याचा छन्द अनुष्टुप् आहे. देवता तुलसी आहे. मनांतील सर्व इप्सित कामना पूर्ण व्हाव्या म्हणून या जपाचा विनियोग सांगितला आहे. तुलसी महादेवी हातांत कमळ असलेल्या तुला माझा नमस्कार. माझ्या डोक्याचे तुलसी रक्षण करो तर माझ्या कपाळाचे यशस्विनी रक्षण करो. पद्मनयना माझ्या दृष्टीचे आणि श्रीसखी माझ्या कानांचे रक्षण करो. सुगंधा माझ्या नाकाचे आणि सुमुखी माझ्या मुखाचे रक्षण करो. जिभेचे शुभदा तर विद्यामयी माझ्या कंठाचे रक्षण करो. माझ्या खांद्यांचे कह्वारिणी तर हृदयाचे विष्णुवल्लभा रक्षण करो. माझ्या मध्यंगाचे पुण्यदा तर नाभीचे सौभाग्यदायिनी रक्षण करो. माझ्या कटीचे कुंडलिनी तर ऊराचे नारदवंदिता रक्षण करो. माझ्या गुडघ्यांचे जननी तर जंघांचे सकलवंदिता रक्षण करो. माझ्या पायांचे नारायणप्रिया तर सर्वांगाचे सर्वरक्षिणी रक्षण करो. संकटांत, विषम परिस्थितींत, गडावर, भयांत, भांडणांत, अरण्यांत व संधीकाळी नेहमी तुलसी माझे रक्षण करो. हे अतिशय गुप्त असे तुलसी कवच आहे. मर्त्य लोकांसाठी अमृत तर भितर्यासाठी अभय देणारे आहे. मोक्षाची इच्छा असणार्यांसाठी मोक्षदायी तर ध्यान करणार्यांसाठी ध्यान योगांत यश देणारे आहे. वश करण्याची इच्छा असणार्यानसाठी वशदायी तर विद्येची इच्छा असणार्यानसाठी वेदांचे ज्ञान देणारे आहे. दरिद्री लोकांना द्रव्य देणारे तर पापी लोकांचे पाप नष्ट करणारे आहे. भुकी लोकांना अन्न देणारे, स्वर्गाची इच्छा असणार्यांसाठी स्वर्ग सुख देणारे आहे. पशूंची इच्छा असणार्यांसाठी पशु देणारे तर पुत्राची इच्छा असणार्यांसाठी पुत्र देणारे आहे. राज्यभ्रष्ट राजांना राज्य देणारे तर शांतीची इच्छा असणार्यांसाठी शांती देणारे आहे. विष्णुभक्तांना सर्वांच्या अंतरात असलेल्या विष्णुची भक्ती देणारे आहे. ह्याचा सूर्योदयी नमस्कार करून केलेला जप गृहस्थाना विशेष फलदायी आहे. तुलसीवनांत राहून किंवा बसून केलेला जप सर्व कामना पुरती करणारा असा माझ्याजवळ केल्यासारखाच आहे. माझे नेहमी चांगले करणारा व हरिभक्ती वाढविणारा आहे. ज्या स्त्रीची अपत्ये मेली आहेत तिच्या अंगावर या कवचाने मार्जन केल्यावर तिला निरोगी व दीर्घायू पुत्राची प्राप्ती होते. वंध्या स्त्रीलासुद्धा या कवचाने कुश/दर्भ द्वारे सर्वांगावर मार्जन केल्यावर एका वर्षांत सुंदर गर्भधारणा होते. अश्वमेध राज्याची इच्छा असणार्यांसाठी अग्नी जवळ बसून केलेला या कवचाचा जप फलदायी होतो. पलाश वृक्ष संनिध विद्यार्थ्याने जप करावा तर तेजाची इच्छा असणार्यांसाठी सूर्यासमोर केलेला जप फलदायी होतो. कन्येची इच्छा असणार्यांसाठी चंडिका गेहे (देवळांत) केलेला या कवचाचा जप फलदायी होतो. शत्रुंचा नाश करण्याची इच्छा असणार्यांसाठी माझ्या (श्री शंकरांच्या) देवळांत बसून केलेला या कवचाचा जप फलदायी होतो. धनाची अपेक्षा असणार्याने विष्णु मंदिरांत तर स्त्रीची इच्छा असणार्याने उद्यानात बसून केलेला या कवचाचा जप फलदायी होतो. जे जे इच्छा असेल ते ते तुला प्राप्त होईल. माझ्याकडे तू तारकासुराचा वध करण्याच्या इच्छेने आला आहेस या तुलसीकवच मंत्राच्या जपाने तू या मंडळावर तारकासुराचा वध करणारा म्हणून प्रसिद्ध होशील यांत संशय नाही. अशा रीतीने हे ब्रह्मांड पुराणांतील तुलसीमहात्म्यांत आलेले तुलसीकवच नावाचे स्तोत्र तुलसीमातेला समर्पण करू.
*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*
No comments:
Post a Comment