*उत्तम आरोग्याकरिता*
🌷आरोग्यम् धनसंपदा🌷
१) आठवड्यातून दोनदा तरी पाले भाज्या व मोड़आलेल्या कड धान्याचा जेवणात समावेश करावा
२) जीरे व हिंग ह्यांचा फोडणीत उपयोगकरावा
३) रोजच्या आहारात भात, तुरीच्या डाळीचे वरण, साजूक तुप, पोळी,भाजी, कोशिंबीर, लिंबू व ताक ह्यांचा समावेश करावा
४) आठवड्यातून दोनदा तरी ज्वारीचीकिंवा तान्दळाच्या पिठाची भाकरी खावी
५) लोणचे, पापड, तळकट पदार्थ व गरम मसालेह्यांचा वापर कमी करावा
६) फ्रिज मधील थंड पाणी टाळावे
७) रोज एक वेलची केळखावे
८) ऋतु प्रमाणे संत्र, मोसंबी, सफरचंद, पपई, चिकू, आंबा, टरबूज,खरबूज पिचही फळे खावी
९) रोज कच्चा आवळा खावा
१०) रोज आल्याचा चहा, उपमा, भाजीत उपयोगकरावा
११) रस्सा भाजीत साखरे ऐवजी गुळाचा उपयोग करावा
१२) रोज सकाळी उठल्यावरगुळाचा खडा खावून पाणी प्यावे
१३) रोज वेळेवर जेवावे व वेळेवर झोपावे
१४) रोजपेलाभर दूध प्यावे
१५) जेवणात ब्रेडचा वापर करू नये
१६) मैद्याचे पदार्थ कमीखावे
१७) जेवणात शेंगाच्या भाजीचा वापर आठवड्यातून दोनदा तरी करावा
१८)पोळ्या करिता कणीक चाळून घेवू नये
१९) जेवणात मधून मधून तीळ, लसूण, जवस(अळशी)च्या चटण्याचा वापर करावा
हिरड्या व दात मजबूत रहाण्या करिता
१) पेलाभरपाण्यात तुरटी फिरवावी व त्या पाण्याने गुळण्या कराव्या त्यामुळे गम ब्लीडींगथांबते
२) मीठ टाकलेल्या गरम पाण्याने गुळण्या कराव्या
३) हिरड्याना मधलावावा
४) शेंग दाण्याच्या किंवा तीळाच्या तेलाने हिरड्याना बोटाने मसाजकरावे
५) झोपून उठल्यावर व झोपण्या पूर्वी दात घासावे
🌷आरोग्यम् धनसंपदा🌷
No comments:
Post a Comment