Wednesday, 12 July 2017

अमरनाथ यात्रा

*"अमरनाथ यात्रा "*
----------$$$-----------------

हिंदू भाविकांच्या पवित्र स्थानांपैकी एक म्हणजे अमरनाथ होय. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग परिसरातील बालाटल क्षेत्रात अमरनाथ गुहा आहे. या गुहेत बर्फाचं शिवलिंग असतं आणि ते थंडीच्या वातावरणातच आकार घेतं.
*आषाढ पौर्णिमा ते रक्षाबंधन-नारळी पौर्णिमेपर्यंत हे शिवलिंग पूर्ण आकार घेतं.*
त्यामुळे या काळात शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

या शिवलिंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दरवर्षी रजिस्ट्रेशन करतात.
रक्षाबंधनला अमरनाथ यात्रा पूर्ण होईल.
समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंच
अमरनाथ गुफा ही समुद्र सपाटीपासून 3,888 मीटर म्हणजेच सुमारे 12 हजार 756 फूट उंचावर आहे. इथपर्यंत जाण्यासाठी एकतर पायीच जावं लागतं किंवा खेचरांचा आधार घ्यावा लागतो.
दक्षिण काश्मीरमधील पहलगावपासून हे अंतर सुमारे 46 किमी आहे. म्हणजेच अमरनाथ गुहेपर्यंत तब्बल 46 किमी चालत जावं लागतं. यासाठी पाच दिवस लागू शकतात.
या यात्रेसाठी दुसरा रस्ता सोनमर्गच्या बालटालवरुनही आहे. इथून अमरनाथ गुहेचं अंतर केवळ 16 किमी आहे. मात्र उभी चढण असल्याने हा प्रवास अत्यंत कठीण मानला जातो
ही गुहा नेहमीच बर्फाने झाकोळलेली असते.  मात्र थंडी ओसरल्यानंतर हळूहळू बर्फ वितळून गुहेचं तोंड उघडतं. त्याचवेळी भाविक इथे येतात.
श्रावण महिन्याच्या आस-पास यात्रा सुरु होते. साधारण 45 दिवसांपर्यंत ही यात्रा असते.
ही यात्रा नेमकी कधी सुरु झाली, त्याबाबतची ठोस माहिती उपलब्ध नाही. गेल्या 20 वर्षात या यात्रेचं प्रस्थ वाढलं आहे.
त्यामुळे 2000 मध्ये अमरनाथ यात्रा समितीची स्थापना करण्यात आली. ही समितीच या यात्रेचं आयोजन करते.

*अमरनाथ गुहेची अख्यायिका*

भगवान शंकराने याच गुहेत आपलं अस्तित्व आणि अमरत्वाबाबतचं रहस्य पार्वतीला सांगितल्याची अख्यायिका आहे. या गुहेचा उल्लेख काश्मीरी इतिहासकार कल्हण यांनी 12व्या शतकात रचलेलं महाकाव्य ‘राजतरंगिणी’तमध्येही आहे.
या गुहेच्या छतातून थेंब थेंब पाणी गळतं तेच पाणी गोठून एक विशालकाय रुप धारण करतं. याचा आकार शिवलिंगाप्रमाणे असतो, त्यामुळे हिंदू भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात." -

*संकलन :- सतीश अलोनी*
--------------✡---------------

No comments:

Post a Comment