Sunday, 23 July 2017

स्वामी काकड़ आरती

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
       *🌞काकड आरती🌞*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!*
*भक्तजन येउनिया !द्वारी उभे* *स्वामीराया !*
*चरण तुझे पहावया !तिष्ठती* *अतिप्रती !!१!!*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!*
*भक्तांच्या कैवारे समर्थ निर्धारे*
*हात ठेउनिया चरणावरी !!*
*गातो आम्ही तुझी स्तुती !!२!!*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!*
*पूर्णब्रम्ह देवाधिदेव !निरंजना तुझा* *ठाव !!भक्तांसाठी देहभाव !धरिसी तू* *विश्वपती!!३!!*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!*
*स्वामी तूची कृपाधन !उठोनी देई* *दर्शन !!*
*स्वमिदास चरण वंदून !!मागतसे* *भावभक्ती!!४!!*
*ओवाळीतो काकड आरती !*
*स्वमिसमार्था तुज प्रती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!*
*चरण दावे जगत्पते !*
*स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*!! स्वामी समर्थ तारक मंत्र !!*
*नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे || अतर्क्य* *अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी ||1||*

*जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय || आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || 2 ||*

*उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे || जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा||3||*

*खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त || कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतीVल साथ||4||*

*विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ | स्वामीच या पंचप्राणामृतात || हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती | न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ||5||*

*। ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ ।।*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*ॐ श्री सदगुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी* *समर्थ महाराज कि जय....🙏🏻*

*श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी*
*श्री पाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरूदेव दत्त समर्थ ।🙏🏻*
*अवधुत चिँतन श्री गुरूदेवदत्त*    
                                                                                         🐚🐚🐚 *भूपाळी* 🐚🐚🐚 
 
    *🌻!!श्री स्वामी समर्थ !!🌻*             
                *स्वामीसुत*

*उठा उठा सकळ जन ! पाहूचला स्वामी चरण !!*
*तुटोनि जाईल भवबंधन ! भावेचरण पाहतांची !!धृ!!*
*त्यांचे होतांचि दर्शन ! तृप्त होतीन नयन !!*
*भावे घालोनि लोटांगण ! चरण तुम्ही वंदाते !!१!!*
*कोटि तीर्थ चरणापाशी ! त्या चरणी सदभावेसी !!*
*विनदुनि तुम्ही अहर्निशीं ! जन्म मरण चुकवा कीं !!२!!*
*रुप पाहाताचि लोचनी ! सुख होईल साजण !!*
*अज्ञान जाऊनि तत्क्षणीं ! ज्ञानज्योती प्रगटेल !!३!!*
*जपा नाम निर्धारी ! पावन ते पंचदशाक्षरी !!*
*तेणे चुकूनि तुमची फेरी ! मोक्षपद मिळेल कीं !!४!!*
*परब्रम्ह हे अवतरले ! म्हणुनी नाम ते पावलें !!*
*आता जपा तोंचि वाहिले ! तुम्हा सुख व्हावया !!५!!*
*स्वामी नाम हाचि वन्ही ! महापापें ती तत्क्षणीं !!*
*तृणवत टाकील जाळुनी ! प्रातःकाळी स्मरतांची !!*
*धर्मलोप बहु झाला ! तेणे भूभार वाढला !!*
*म्हणुनी समर्थ अवतरला ! जड मूढा ताराया !!७!!*
*प्रातःकाळी दर्शन घेता ! मुक्ती मिळेल सायुज्यता !!*
*तेणे चुकेल जन्म व्यथा ! भावे दर्शन घेताचि !!८!!*
*रुप सुंदर सुकुमार ! दिसे आति मनोहर !!*
*पाहुनि तेंचि सत्वर ! कृतार्थ तुम्ही व्हाल कीं !!९!!*
*कोटी सुर्याची ही प्रभा ! चला दर्शन घ्यावया !!१०!!*
*सत्य सांगे स्वामीसुत ! स्वामी पहा हो प्रेमयुक्त !!*
*तेणे व्हाल जन्ममुक्त ! संदेह काही असेना !!११!!*
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

No comments:

Post a Comment