Saturday, 12 August 2017

Kadhi maj watate vhave mi pawan

कधी मज वाटते व्हावे मी पवन॥
हळूच स्पर्शावे माझ्या स्वामींचे चरण॥
होऊनिया सोनचाफा, जाई, जुई॥
जीवनपुष्प माझे स्वामी चरणी समर्पित होई॥
करशील का स्वामी मला तु चंदन नि गंध॥
देह झिजू दे तुझ्या चरणी श्रीरंग॥
वाटते व्हावे स्वामीची वहाण॥
स्वामीराया तुझ्या चरण भेटीची भागेल तहान॥
होइल का स्वामीराया मी धूळ॥
तुझ्या चरणभेटीसाठी जीव होई रे व्याकुळ॥
देहाची ह्या होईल का रे वहिवाट॥
ज्या वाटेवर पडतील फक्त तुझेच चरण
फक्त तुझेच चरण॥
!! ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम: !!

No comments:

Post a Comment