(सरा-सरी मुक्तपीठ वरील, श्री.योगिन गुर्जर यांची पोस्ट शेअर करत आहे)
आपातकालिन स्थिती व भारतीय.
कालच्या दुर्दैवी घटनेला जितके प्रशासन जवाबदार आहे ,तितकेच आम्ही नागरीक ही तितकेच जवाबदार आहोत.
विरोधक याचे राजकारण करणार आणि त्यांनी ते केलेही पाहिजे.
पुल जुना आहे.
लोकसंख्येच्या मानाने खुपच अरुंद आहे, तो पुरेसा रुंद असता तर मृत्यु कमी झाले असते वगैरे.
लोकसंख्येच्या प्रमाणात तो रुंद करायलाच हवा होता या बाबत दुमत असता कामा नये.
पण वाढली गर्दी की वाढव पुल / रस्ता ,इतके सोपं त्रैराशिक नाही.
काहिंनी संधी साधुन बुलेट ट्रेन प्रोजेक्ट वरही हल्ला चढवला.
आपल्या कडे चेंगरा चेंगरी कुठेहि होते व लोक मरतात.
त्याही वेळेस आपण प्रशासन व पोलिसांवर ठपका ठेऊन मोकळे होतो.
दोषारोप केला की आपण आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल अस आपल्याला वाटत असत.
आपल्या कडे मंदिरात चेंगराचेंगरी होते.
रावण दहनच्या वेळेस होते.
प्रसाद वाटपा वेळेस होते.
बिहार सारख्या ज्याला आपण मागास राज्य म्हणतो तिथे होते,
तर पुढारलेल्या महाराष्ट्रातही होते.
एक व्यक्ती म्हणुन आपण प्रत्येकजण फार चांगले आहोत.
पण जेव्हा आपण समुहात येतो तेव्हा आपण कसे वागतो??
कसे असतो?
एक ऊदा. देतो , ९/११चा अमेरिकेतील WTC हल्ला ,
पहिले विमान धडकल्यावर त्या उंच बिल्डींग मधील ऊदवाहन बंद पडली.
लोक जिन्याने धावत सुटले.
विमान आपल्या बिल्डिंगला धडकलय, आग लागली आहे, याही परिस्थतीत कुठेही गडबड गोंधळ ,ढकलाढकली नाही. सगळे जिन्याच्या एका बाजुने धावत सुटले .
त्याच वेळेस मदत करणारी आपातकालीन यंत्रणा ,पोलिस जिन्याच्या दुसर्या बाजुने वर जात होती.
इतक्या मोठ्या बहुमजली ईमारतीतुन बाहेर पडताना एकही चेंगरला गेला नाही.
पोलिस सुद्धा तात्काळ वर जाऊ शकले व अनेकांचे प्राण वाचवु शकले.
भारतात फक्त शहर स्मार्ट होऊन काय ऊपयोग ?
बुलेट सारखे तंत्रज्ञान आले तरी आपली मानसीकता कशी बदलणार?
विमानात सुद्धा १००% भारतीय प्रवासी असतील तर ते सुद्धा शिस्तीने वागत नाहीत.
गडबड गोंधळ ,ढकलाढकली रेटारेटी हे होतच राहणार आहे. कधी लोक मरतील ,कधी नाही.
फरक काय तो आकड्याचाच असेल.
अगदि सिग्नलला ऊभे असलो तरी लालचा पिवळा झाला कि मागचे हाँर्न वाजवायला सुरुवात करतात. समोरचा काय सतरंजी ,ऊशी घेऊन वस्तीला आलाय का ? पिवळ्याचा हिरवा झालाकी पुढे निघेलच ना. पण कळतंय कुणाला?
परदेशात मध्यरात्रीसुद्धा ड्रायव्हर STOP or RED सिग्नलला थांबतात.जिथे क्राॅस करायला त्या वेळी चिटपाखरु नसत. ही शिस्त आम्हाला जमते कधी ?
सिग्नल असो नसो,,, बाईकवाले तर रस्ता "बा" चा आहे समजून उधळत असतात.
या देशाचे राष्ट्रीय चारित्र्य घडवायचे असेल , सामुहिक मानसिकता बदलायची असेल तर शालेयस्तरा पासुनच प्रयत्न, प्रयोग करावे लागतील. नागरिकशास्त्र हा विषयच आपल्या अभ्यासक्रमात दुर्लक्षित आहे.
NCC ,होमगार्ड प्रशिक्षण बंदच झाल्यात जमा आहे. शाळा ,काँलेज मधे फक्त आणी फक्त मार्कांवरच लक्ष केंद्रित केले जाते .
आपातकालीन व्यवस्थापन disaster management हा विषय विद्यार्थी दशेतच शिकवायला हवाय.
जो पर्यंत लोक स्मार्ट होणार नाहीत तो पर्यंत कितीही तंत्रज्ञान आणा ,ते आत्मसात होणार नाही.
तो पर्यंत असे अपघात हे होतच राहणार.
कालच्या अपघातातुन राजकारणी, प्रशासन व नागरिक काही धडा घेतील ही अपेक्षा अवाजवीच ठरावी.
कालच्या अपघातातील सर्व मृतांना भावपुर्ण श्रद्धांजली.
(तुर्त तरी एवढच आपल्या हाती आहे. )साभार - सौ योगिनी गुर्जर
No comments:
Post a Comment