आरती ओवाळू श्री सदगुरु स्वामी समर्था ॥
स्वरुप दिगंबर अजानूबाहू भव्यकाय नाथा-दिव्यकाय नाथा ॥ धृ ॥
ह्रदय निरांजनी शुध्द प्रेमघृती,भावाच्या वाती ॥
भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती ॥ १ ॥
सर्वस्वार्पण नैवेद्याशी ठेविलेचि पुढती ॥
सन्मति, सदधृति,सत् कृति,सद् गति प्रसाद द्या हाती || २ ||
॥ श्री स्वामी समर्थ ॥
सर्वांना शुभ संध्या.....!!
स्वामी संध्या.....!!
No comments:
Post a Comment