नोटाबंदीचे 1 वर्ष: येथे वाचा- काय झाले नुकसान, काय झाला फायदा?
.
8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदीची- निश्चलनीकरणाची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. याला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. गतवर्षी पंतप्रधान मोदींनी याच दिवशी 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती.
.
> हा निर्णय काळे धन, नकली नोटा आणि दोन नंबरच्या पैशांवर कारवाई करण्यासाठी घेण्यात आला होता.
.
> नोटबंदीच्या या निर्णयाबद्दल अनेकांनी नरेंद्र मोदींची प्रशंसा केली, दुसरीकडे एक मोठ्या गटाने तीव्र टीकाही केलेली आहे. राजकीय पक्षांमध्येही नोटबंदी आणि पंतप्रधान मोदींबद्दल वेगवेगळी मते आढळून आली.
.
रात्री 8 वाजता झाली होती घोषणा
> भारताच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या निश्चलनीकरणाला मीडियामध्ये नोटाबंदी म्हटले गेले. 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीव्हीवर राष्ट्राला उद्देशून संबोधित केले होते. त्यात घोषणा केली होती की, 500 आणि 1000च्या नोटा रात्री 12 वाजेपासून बाद होतील, म्हणजेच 500 आणि 1000च्या नोटा फक्त कागदाचे तुकडे उरतील आणि त्यांच्या जागी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या जातील. लोकांना म्हणाले होते की, ज्यांच्याकडेही 500 आणि 1000च्या नोटा आहेत त्यांनी त्या बँकांमध्ये जमा कराव्यात.
.
यामुळे झाली होती नोटाबंदी
> या निर्णयानंतर देशवासीय खूप त्रस्त झाले, परंतु त्यांनी एक चांगले पाऊल मानून हे स्वीकारही केले. नोटा बदलून घेण्यासाठी दररोज कित्येक तास बँकांसमोर लांबच लांब रांगा लागू लागल्या. त्या वेळी पूर्ण देशच बाकीच्या सर्व चिंता सोडून फक्त नोटा बदलून घेण्याची चिंता करत होता.
.
> बँकांतून नव्या नोटा घेणे आणि जुन्या नोटा बदलण्यासाठी एक मर्यादा ठेवण्यात आली होती. लोक एका ठराविक रकमेपर्यंतच पैसे काढू शकत होते.
.
> नोटाबंदीच्या माध्यमातून सरकारला ही अपेक्षा होती की, बँकांत जो पैसा येईल तो व्हाईट मनी असेल. आणि जो बँकांत जमा होणार नाही तो काळ्या धनाच्या श्रेणीत ठेवला जाईल. जेथे राजकीय पक्ष मोदींच्या या निर्णयाला राजकीय गेम प्लॅन म्हणून पाहत होते, तिथे सामान्यांनी याला स्वातंत्र्याचा दुसरा लढा असल्याचे मानले आणि सर्वकाही सहन केले.
.
नोटा बदलण्याची प्रक्रिया डिसेंबर 2016 पर्यंत सुरू होती. तथापि, यानंतरही नोटा बदलणे सुरूच होते.
> तथापि, नोटाबंदीला 1 वर्ष होत असताना यातून सामान्य जनतेला किती फायदा झाला, देशाला किती फायदा झाला आणि किती काळे धन परत आले? हे जाणून घेणे गरजेचे ठरते.
.
पुढच्या 10 स्लाइड्समधून जाणून घ्या, नोटबंदी काय झाला फायदा? आणि काय झाले नुकसान?
Wednesday, 8 November 2017
नोटबंदी 1 वर्ष
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment