Wednesday, 8 November 2017

श्रीराम जय राम जय जय राम

*तरीही म्हणावे..श्रीराम जय राम जय जय राम!!*

वेद ही असावे..मंत्र ही असावे..
असावे सखोल द्यान...
परी असले जरी हे काही...
तरीही म्हणावे..!!श्रीराम जय राम जय जय राम!!

धनही असावे..असावी श्रीमंती..
असावा सर्वत्र सन्मान...
परी असले जरी हे काही..
तरीही म्हणावे..!!श्रीराम जय राम जय जय राम!!

कामही असावे..,श्रमही असावे...
मिळवावे कष्टाचे दाम..
परी असले जरी हे काही..
तरीही म्हणावे..!!श्रीराम जय राम जय जय राम!!

सुंदर असावे...सुंदर दिसावे...
असावा साज श्रंगार...
परी असले जरी हे काही..
तरीही म्हणावे..!!श्रीराम जय राम जय जय राम!!

ओढ असावी...असावी जवळिक..
असावे सदैव प्रेम..
परी असले जरी हे काही..
तरीही म्हणावे..!!श्रीराम जय राम जय जय राम!!

संसार असावा...असावी गोडी...
असावे समाधान...
परी असले जरी हे काही..
तरीही म्हणावे..!!श्रीराम जय राम जय जय राम!!

वृक्ष असावी...असावी फळे ही...
असावा बगीचा ही छान...
परी असले जरी हे काही..
तरीही म्हणावे..!!श्रीराम जय राम जय जय राम!!

असावे नेता.,,वा अभिनेता...
असावा सर्व जगी बहुमान...
परी असले जरी हे काही..
तरीही म्हणावे..!!श्रीराम जय राम जय जय राम!!

हे सगळे वैभव आहे केंव्हा..
आहे ..ह्रदयी जोवर राम..
सद्गुरुंचा कर जय घोष...
!!श्रीराम जय राम जय जय राम!!
!!श्रीराम जय राम जय जय राम!!
!!श्रीराम जय राम जय जय राम!!
!!श्रीराम जय राम जय जय राम!!
!!श्रीराम जय राम जय जय राम!!
📿📿📿📿📿📿📿📿

No comments:

Post a Comment