*|| यतिचक्रवर्ती इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज विरचितं अभंग ||*
|| पुंडलीकवर उभा विटेवर | नित्य कटीवर कर ठेवूनी ||१||
|| भिवरेचे तीरीं विख्यात पंढरी | नादब्रह्म वरी वरिष्ठा जी ||२||
|| त्या माजी विठ्ठल राहे जो निश्चल | चिन्मय केवळ काळकाळ ||३||
|| चंद्रभागेजवळ राउळ विशाळ | तेथें घननीळ निर्मळ जो ||४||
|| राई रखुमाबाई ज्याच्या पार्श्वभागीं | पाहतां वीतरागी भोगी हो कां ||५||
|| कटी बरोबर हा भव सागर | दावी भक्तोद्धार वासू म्हणे ||६||
No comments:
Post a Comment