आरती सप्रेम जय जय तानाजी वीरा
स्वराज्यवर्धन शिवबासाठी लढलासी शूरा ||धृ||
आधी लगीन कोंढाण्याचे मग बाळ रायबाचे
कुटुंब ठेऊनी मागे भान ठेवी वचनाचे
सुभेदार दिलदार दाखवी तेज शौर्याचे
चढशी हा कोंढाणा प्राण घेशी शत्रूंचे ||१||
दुर्जन मारिसी अवघे रणात कृतांत तू होशी
धर्मद्वेषी स्वराज्यद्वेषी अवघे फोडीशी
मर्दुनी उदेभान मग तू प्राण त्यागीशी
शत्रू भयंकर नाना धाडी मृत्युपंथासी ||२||
दिगंत कीर्ती लाभो वीरा शंभू महादेवा
पुत्रप्रेम त्यागुनी केली देशाची सेवा
अपार झुंजलासी वीरा सिंहाचा छावा
दुर्गम कोंढाण्यासी झेंडा लाविलासी भगवा ||३||
आरती सप्रेम जय जय तानाजी वीरा
स्वराज्यवर्धन शिवबासाठी लढलासी शूरा ||धृ||
-नितीन
No comments:
Post a Comment