-----------------------------–-----------
*"आज शनिवार शनिदेवतेचा वार"*
------------------------------------------
धर्म ग्रंथांमध्ये सांगितल्यानुसार, शनिदेव यांची आराधना करून जगातील सर्व प्रकारचे सूख मिळवले जाऊ शकते.
शनि महाराज चांगल्या कर्माचे फळ देऊन भक्तांवर कृपा करतात. तर श्री शनीदेवतेचीआपल्यावर कृपा राहिल्यास बल, बुद्धि, ज्ञान आणि यशाच्या स्वरुपा आपल्याला मिळत असते.
शनिवार हे शनिदेवतेची आराधना करण्यासाठी चांगले दिवस मानले गेले आहेत. या दिवशी शनिदेवाची आराधना केल्यास आपल्यावर ही कृपा दृष्टी राहते." -
*शनि स्मरण मंत्र*
*नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं विनायकम्।*
*छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्।।*
*शनि स्मरण मंत्रानंतर सुख संमृद्धीसाठी या मंत्रांचेही करा पठन-*
*१.ॐ दीनार्तिहरणाय नम:।*
*2. ॐ दैन्यनाशकराय नम:।*
*3. ॐ भानुपुत्राय नम:।*
-----------------------------------------
*!! शनिवार आवश्यक उपासना !!*
----------------------------------------
आकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश्वर्य आणि शांती प्राप्त होते.
-------------------------------------
*🙏🏻🌺 !! शनि देव !! 🌺🙏🏻*
शनि हा सूर्यपुत्र म्हणून ओळखला जातो. शनि ग्रह सूर्याला प्रदक्षिणा घालतो. जन्मकुंडलीमध्ये शनि जर शुभ स्थानावर असेल तर जातकाला यश, ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य आणि चिंतन शक्ति देतो. परंतु तो जर अशुभ स्थानात असेल तर अनाचार वाढवतो. शनिची दशा ही अडीच वर्षे आणि साडेसात वर्षे असते.
सौरमंडळात शनिचे स्थान पश्चिमेला असते.
शनि ग्रहाच्या प्रसन्नतेसाठी भैरव देवाची साधना उपयुक्त असते. शनिवारी उपवास करणार्यांनी दुपारनंतर भोजन करावे. भोजनात मिठाचा वापर करू नये.
-------------------------------------
*!! उपासना मंत्र !!*
*ॐ शनैश्चराय नमः ॥*
*नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् ।*
*छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् ।।*
I pray to Saturn, the slow moving, born of Shade and Sun, the elder brother of Yama,
the offspring of Sun, he who has the appearance of black collyrium .
*!! ध्यान मंत्र !!*
*ॐ सूर्यपुत्रो दीर्घदेही विशालाक्षः शिवप्रियः ।*
*मन्दाचारः प्रसन्नात्मा पीडा हरतु ते शनिः ॥*
*ॐ शं शनैश्चराय नमः ।*
*ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनये नमः ।*
*शनिमंत्र संख्या -*
शनिदेवाच्या मंत्राची जपसंख्या २३००० आहे.
-------------------------------------
*ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनये नमः ।*
या मंत्राचा जप करावा आणि ते यंत्र लोखंडाच्या ताईतामध्ये किंवा काळ्या किंवा निळ्या वस्त्रात घालून धारण करावे.
-------------------------------------
*शनि यंत्र*
या यंत्राची बेरीज कुठुनही केली तरी ३३ इतकीच येते.
हे यंत्र कोणत्याही महिन्यातील शुक्लपक्षात येणार्या पहिल्या शनिवारी सूर्यास्ताच्या एक तास आधी डाळिंबाची काडी किंवा काळ्या घोड्याच्या नालेपासून बनवलेली लेखणी अष्टगंधाच्या शाईत बुडवून भुर्जपत्रावर लिहावे. नंतर त्या यंत्राला धूप, दीप, काळी फुले वाहून
-------------------------------------
*शनि दान*
*शनिदानाचे साहित्य -*
काळे तिळ, उडीद, तेल, काळे वस्त्र, लोखंड, काळी गाय, इंद्रनील, म्हैस इ. हे दान शनिवारी दक्षिणेसहित द्यावे.
🙏🏻🌺!! जय श्री राम !!🌺🙏🏻
-------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोनी*
--------------------------------------------------
No comments:
Post a Comment