कैलासींचा देव भोळा चक्रवर्ती । पार्वतीचा पति योगिराज ॥१॥
तयाचिया पाया माझे दंडवत । घडो आणि प्रीत जडो नामीं ॥२॥
जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळीं । तिजा नेत्रज्वाळी जात वेद ॥३॥
कंठीं काळकूट डौर त्रिशूल हातीं । सर्वांगीं विभूति शोभतसे ॥४॥
गळां रुंडमाळा खापर हस्तकीं । रामनाम मुखीं सर्व-काळ ॥५॥
व्याघ्रचर्मधारी स्मशानीं राहिला । संगें भूतमेळा बिरा-जित ॥६॥
नामा ह्मणे नामें नासोनियां पाप । करीं मुखरूप भक्तांलागीं ॥७॥
No comments:
Post a Comment