Friday, 17 August 2018

लोकल प्रवास

लोकल प्रवास
नको तो जीवघेणा प्रवास.....

नको झालाय तो लोकलचा जीवघेणा प्रवास,
तुफान गर्दि बघतानाच बंद होवून जातो श्वास |
पळता पळता प्रवाशीही होवूनच जातो हताश,
अगदी नाही मिळाली लोकल होतो तो निराश ||१||

सागरा येवढी तुफान गर्दि असे ती स्थानकात,
गर्दि बघतानाच भिती उभी राहते मना मनात |
काय कराव कस कराव हे सुचतच नाही तेंव्हा,
हताश होतो प्रवाशी गाडीच निघून जाते तेंव्हा ||२||

जीव घेणा प्रवास आता तर नकोसाच झालाय,
कधी होईल मुक्त कोणी काढील काय ऊपाय |
कामा पेक्षा प्रवाशी थकुनच जातो तो प्रवासात,
पोहचल पाहीजे कामावर येवढच असत मनात ||३||

सकाळी ऊठून धावपळ करत कामावर जायच,
रात्री अपरात्री थकून भागून कस तरी घरी यायच |
निघालो घरातून बाहेर पुन्हा यायची शाश्वती नाही,
काय होईल दिवसात कुणालाच थांग पत्ता नाही ||४||

धावपळ करून करुन अर्धा जीवच जातो निघून,
नकोसाच होतो हा खडतर प्रवास बेफाम गर्दितुन |
नकोसच झालय आता हे सार धकाधकीच जीवन,
गावच बर होत आपल होत लोकल मुक्तच जीवन ||५||

ईतभर पोटासाठी मुंबईत आलो हा संसार सोडून,
सुखात चाललेला संसार मी तिथेच आलो मोडून |
आज लोकलच्या प्रवासानेच पुरता गेलोय थकून,
पश्चातापाने आता बसलोय माथ्यावर हात ठेवून ||६||

खरच नको तो जीवघेणा प्रवास......

श्री.दत्तात्रय शिवरान धनावडे
कोळसेवाडी, कल्याण
भ्रमणध्वणी :- ९८२१३४५१०१

No comments:

Post a Comment