Sunday, 7 October 2018

चला योगाला जाऊ

चला योगाला जाऊ आपण
चला योगाला जाऊ
ॐ काराच्या शुद्ध मनाने
चला प्रार्थना गाऊ

श्वसनमार्ग शुद्धीनंतर सूर्य
नमस्कार ते घालु
आयुष्य बुद्धी अन् मनोबलाचा
विकास आपण साधु

उत्थितपादासन पवनमुक्तासन
सर्वांगासनही करू
संधीवात हा दूर सारुनी
सायटिका दूर करु

मत्स्यासनाने कपालभातीतुन
दमा अस्थमा पळवुनी लावु
हलासने मेरुदंड तो लवचिक
होऊन सुडौल बांधा ही मिळवु

सुलभ प्रसुति होण्यासाठी
गोमुखासन अती ऊत्तम
पाठ मान अन् कमरेसाठी
शलभासन नौकासन करू

धनूरासने चपळ होऊनी
जडत्व आपुले कमी करु
लहान मोठया आतड्याचे
ते विकार सारे दूर करू

आळसाचा नसे थारा
मार्जारासन आपण करु
ऊत्साह आणि आनंदाचा
लाभ तयांचाही घेऊ

सदोष बसणे टाळु आपण
पश्चिमोतानासन करु
बद्धकोष्ठता गुढघेदुखी अन्
अशक्तताही दूर करु

भूनमनासन घालुन आपण
मेद पोटाचा कमी करु
मेरुदंड तो मजबुत होण्या
अर्धमच्छेंद्रासन करुच करु

खांदेविकार रहीत होण्या
हातांचे व खांद्यांचे प्रकार करु
वज्रासन पद्मासनात
ध्यान धारणा चिंतन करु

ताडासनने उंची वाढवुनी
पाऊलेही बळकट करु
उत्कटासने शौच्यादि उत्सर्जन साफ करु

शिर्षासने मेंदूला त्या रक्त
पुरवठा करु
शवासने आराम वाटुनी
चापल्य उत्साह वाढवु

तेज हवेना चेहऱ्यावरती
मग कपालभाती करु
अनुलोम विलोम करुन
आपण श्वसनशुध्दीही साधु

वंदन करुया योगगुरुंना
चरण तयांचे स्पर्शू
सक्षम काटक आनंदाची
गुरू दक्षिणा देऊ..
🙏
🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

No comments:

Post a Comment