Sunday, 30 September 2018

नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे

*मतदार नोंदणी करण्यासाठी.....*
            
*दि.१सप्टेंबर२०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत* नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला आहे.तरी *३१ डिसेंबर २०१८* पर्यंत वय वर्षे १८ पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी खालील कागदपत्रांसह  मतदान केंद्रस्तरिय अधिकारी *[B L O]* यांच्याकडे संपर्क साधावा.

🛑 *नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे*

🔵
*घरातील मुलगा/मुलगी यांच्या नाव नोंदणीसाठी कागदपत्रे*
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी दाखला ग्रामसेवक/तलाठी यांचे सहीचा
३)आधार कार्ड झेरॉक्स
४) १ पासपोर्ट साईज फोटो
५)घरातील नात्यातील(आई, वडील, भाऊ, बहीण)यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स
🔵
*घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे*

१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी दाखला ग्रामसेवक/तलाठी यांचे सहीचा
३)१ पासपोर्ट साईज फोटो
४)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.
५)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला
६)पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स
७)असल्यास लग्नपत्रिका

🔵संपर्क🔵
🛑मतदान केंद्रस्तरिय अधिकारी *[BLO]*

🔵  *टीप*--३१डिसेंबर २००० पूर्वीचे जन्म असलेले स्त्री व पुरुष मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र🔵

*✍ मतदारांनी आपली नावे नोंदवून घ्यावीत व मतदानचा आपला हक्क/अधिकार प्राप्त करा ही विनंती .*

*"चला मतदार होवू या,*
*लोकशाही प्रबळ करु या"*

No comments:

Post a Comment