Friday, 29 January 2016

इराणच्या राष्ट्रपतींनी जेवण नाकारल !

फ्रान्स दौऱ्यावर असलेले इराणचे राष्ट्रपती हसन रोहानी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्यासोबतचं जेवण तडकाफडकी रद्द केलं आहे. फ्रान्स सरकारतर्फे ठेवण्यात आलेल्या जेवणात वाइनचा समावेश आल्यानं, तसंच 'हलाल' मांस न पुरवल्यामुळं रोहानी यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. 'डेली मेल'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. पॅरिस येथील एका पंचतारांकित हॉटेलात गुरुवारी ओलांद आणि रोहानी हे एकत्र जेवण घेणार होते. मात्र, लंच मेन्यू काय असावा यावर दोन्ही देशांचं एकमत झालं नाही. जेवणात स्थानिक पदार्थ व वाइन असावी, असा फ्रान्सचा आग्रह होता. तर जेवण मुस्लिम पद्धतीचं असावं, अशी इराणची अपेक्षा होती. तडजोड शक्य न झाल्यानं अखेर हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. 'इराणच्या अपेक्षेनुसार जेवण ठेवलं असतं तर ते प्रजासत्ताक व सार्वभौम फ्रान्सच्या मूल्यांच्या विरोधात ठरलं असतं,' असा खुलासा ओलांद यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. फ्रान्स दौऱ्याआधी रोहानी इटलीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी रोहानी यांना अपमानास्पद वाटू नये म्हणून इटलीचे पंतप्रधान मातेओ रेंजी यांनी इटलीची सांस्कृतिक ओळख असलेली नग्न शिल्पं झाकण्याचे आदेश दिले होते. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. फ्रान्सनं मात्र रोहानी यांच्या इच्छेपुढं मान तुकवण्यास नकार दिला. मोबाई

No comments:

Post a Comment