Saturday, 16 January 2016
निम्बोनिच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई
निम्बोणीच्या झाडामागे
चन्द्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला
झोप का ग येत नाही
गाय झोपली गोठ्यात
घरट्यात चिऊ ताई
परसत वेलीवर
झोपल्या ग जाई जुई
मीट पाकळ्या डोळ्यांच्या
गाते तुला मी अंगाई
आज माझ्या पाडसाला
झोप का ग येत नाही
निम्बोणीच्या झाडामागे
चन्द्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला
झोप का ग येत नाही
देवकी नसे मीबाळा
भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी
केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता
जगावेगळी अंगाई
आज माझ्या पाडसाला
झोप का ग येत नाही
निम्बोणीच्या झाडामागे
चन्द्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला
झोप का ग येत नाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment