Friday, 19 February 2016
कन्हैया कुमारला सुप्रीम कोर्टाचा दणका,
कन्हैया कुमारला सुप्रीम कोर्टाचा दणका
Maharashtra Times | Feb 19, 2016, 12.04 PM IST
Whatsapp Facebook Google PlusTwitter Email
Kanhaiya
AAAमटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील स्डुडंट्स युनियनचा नेता कन्हैया कुमार याला सर्वोच्च न्यायालयानं आज जोरदार दणका दिला. सत्र व उच्च न्यायालयाला डावलून थेट सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेणाऱ्या कन्हैयाच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिला. कन्हैयानं जामिनासाठी उच्च न्यायालयात जावं, असे निर्देश खंडपीठानं दिले.
पटियाला हाउस न्यायालयात वकिलांकडून झालेल्या हल्ल्यानंतर कन्हैया कुमारनं जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. खालच्या न्यायालयात आपल्याला न्याय मिळण्याची आशा नसून जीवाला धोका असल्याचं त्यानं याचिकेत म्हटलं होतं. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी खंडपीठानं अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला. 'उच्च न्यायालय हे प्रकरण हाताळू शकत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. याचिकाकर्त्यांनी आधी तिथं जावं. जामिनासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात येण्याची वेळ अद्याप आलेली नाही,' असं खंडपीठानं स्पष्ट केलं. त्याचवेळी, पटियाला हाउस न्यायालयातील वातावरण ठीकठाक नसल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. कन्हैया कुमार व त्याच्या वकिलांना योग्य ती सुरक्षा पुरविण्याची व्यवस्था करण्याचे आदेशही न्यायालयानं दिल्ली व केंद्र सरकारला दिले.
सर्वसाधारणपणे कोणताही आरोपी जामिनासाठी प्रथम सत्र न्यायालयात अर्ज करतो. तिथं जामीन न मिळाल्यास उच्च न्यायालयात जातो. सर्वोच्च न्यायालय हा सर्वात शेवटचा पर्याय असतो. मात्र, कन्हैया कुमारनं खालच्या न्यायालयांना डावलून जामिनासाठी थेट सर्वोच्च न्यायालय गाठलं होतं. मात्र, त्याची निराशा झाली.
मोबाईल अॅप डाउनलोड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment