Tuesday, 9 February 2016
निवृत्ती नंतरची गुंतवणूक
AAAजगभरात वयाची ६० वर्षे झालेल्या तसेच त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींची संख्या २०१५मध्ये सुमारे ९०१ दशलक्ष होती. ही संख्या वाढून २०५० पर्यंत २.१ अब्ज होईल, असा अंदाज आहे. सध्या आशियामध्ये एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे. म्हणजेच आशियामध्ये सुमारे ४ अब्ज लोक ज्येष्ठ आहेत. २०५० पर्यंत जगाची ज्येष्ठ लोकसंख्या २.१ अब्ज होणार असेल, तर त्याचवेळी २०५० पर्यंत आशियातील ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येत वाढ होऊन ती एकूण लोकसंख्येच्या सध्याच्या ६० टक्क्यांवरून ६६ टक्के असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
वरील माहितीचा स्पष्ट अर्थ असा की, दिवसेंदिवस यामुळे आशियातील अनेक देशांच्या आरोग्यसेवेवरील ताण वाढणार आहे. आशियातील अनेक देशांमध्ये सामाजिक सुरक्षितता योजना अगदीच प्राथमिक स्तरावर आहेत. अशा देशांना परिस्थिती हाताळणे कठीण होऊन बसणार आहे.
२००९मध्ये आशियातील मध्यमवर्ग जगाच्या एकूण लोकसंख्येच्या २८ टक्के होता. यात २०३०पर्यंत वाढ होऊन तो ६६ टक्के होईल. वैयक्तिक संपत्तीत वाढ होत असल्याने आशियाई लोकांचे जीवनमान सुधारत आहे. परिणामी, या लोकांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनशैलीबाबतच्या अपेक्षांमध्ये वाढ होत आहे. पारंपरिकदृष्टीने निवृत्ती ही आर्थिक विपन्नावस्थेकडे नेणारी स्थिती असते. परंतु सध्याची परिस्थिती पाहता वैयक्तिक भरभराट ही अशी स्थिती येऊ देणार नाही असे दिसते. म्हणजेच आयुष्यभर स्वतः केलेली गुंतवणूक व बचत ही निवृत्तीनंतर त्या व्यक्तीला उपयोगी पडणार आहे. निवृत्तीनंतर विशिष्ट जीवनशैली असावी असे वाटत असलेले लोक काटेकोर आर्थिक नियोजनावर जाणीवपूर्वक भर देत आहेत.
आशियातील गांभीर्याने बचत करणाऱ्यांसाठी बँकेत पैसा ठेवणे हा शेवटचा पर्याय असतो. असा साठवलेला पैसा निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी चलनवाढीइतक्या टक्केवारीने वाढत नसेल, तर मग तुमची वस्तू खरेदी करण्याची क्षमता अर्थात क्रयशक्ती कमी होत जाते. म्हणून मग चलनवाढीचा मुकाबला करणारा परतावा किंवा उत्पन्न मिळवण्यासाठी वित्त बाजारात पैसा गुंतवणे अगत्याचे ठरते.
मात्र अशावेळी समभाग किंवा बाँड यापैकी कोणता अॅसेट क्लास अल्पावधीत किंवा मध्यम मुदतीत चांगले उत्पन्न देईल याविषयी अंदाज बांधणे जोखमीचे ठरते. उदयोन्मुख इक्विटीसारखे वर्षभरात चांगले उत्पन्न देणारे अॅसेट्स त्यानंतरच्या वर्षांत आपली निराशा करू शकतात. त्याचवेळी सरकारी रोख्यांसारखे स्थिर उत्पन्न देणारे अॅसेट्स आपल्याला आकर्षून घेत नाहीत.
आता दीर्घ काळासाठी एकाच प्रकारच्या अॅसेटमध्ये पैसा गुंतवणे हे गुंतवणुकीसाठी सोपे असले तरी वित्त बाजारामध्ये धोके असतात तसेच जोखीम व उत्पन्न हे एकमेकांशी संलग्न असतात हेदेखील विचारात घेतले पाहिजे. इक्विटींतून दीर्घकाळासाठी चांगले उत्पन्न मिळते हे खरे असले तरी, त्यांना विक्रीचा फटका बसू शकतो. हे टाळण्यासाठी केवळ बाँडमध्येच पैसा गुंतवला तर तितके आकर्षक उत्पन्न मिळू शकणार नाही.
गुंतवणुकीसाठी नेमकी कोणती मत्ता (अॅसेट) निवडावी हे काही गोष्टींवर ठरते. निवृत्तीसाठी जमवलेला पैसा किती जोखीम घेऊन गुंतवायचा आणि त्याचवेळी तुम्ही मनात योजलेले गुंतवणणुकीचे व उत्पन्नाचे ध्येय कसे गाठायचे यावर अवलंबून असतो. निवृत्ती घेण्यासाठी नेमकी किती रक्कम तुमच्याजवळ असावी, जेणेकरून निवृत्त होण्याचे वय तुम्हाला ठरवता येईल अशा प्रकारेदेखील तुम्ही नियोजन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भांडवल बाजारात पैसा गुंतवल्यास बाजार पडल्यावर किती रुपयांचे नुकसान तुम्ही सहन करू शकाल, त्यावरही ही गुंतवणूक अवलंबून असते.
जोखीम घेण्याची ताकद किती आहे हे पाहताना ही ताकद वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळी असते हे लक्षात घ्यायला हवे. म्हणजे निवृत्त व्हायच्या वयातील जोखीम घेण्याची क्षमता ही तरुण व संपत्ती तयार करण्याच्या वयातील व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा निश्चितच कमी असते. याचाच अर्थ, एखाद्या व्यक्तीसाठी गुंतवणुकीचा एखादा प्रकार योग्य असला तर तो कदाचित दुसऱ्या व्यक्तीसाठी अयोग्यही ठरण्याची शक्यता आहे. गुंतवणूक हा व्यक्तीनिहाय बदलता प्रकार आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी गुंतवणूकदाराने एकाच प्रकारच्या अॅसेटमध्ये गुंतवणूक करावी का? निश्चितच नाही. जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार उत्तम परतावा व उत्पन्न देणारे गुंतवणुकीचे पर्याय शोधण्यावर प्रत्येक गुंतवणूकदाराने भर द्यायला हवा. अशा मिळालेल्या परताव्यात किमान जोखीम स्वीकारून वाढ कशी करता येईल हेही पहायला हवे.
विखरून केलेल्या गुंतवणुकीचे लाभ
एकाच प्रकारच्या मत्तेशी (अॅसेट) निगडित फंडामुळे गुंतवणूकदाराची त्या एकाच मत्तेशी ओळख होते. त्याचवेळी अनेक मत्ता असणाऱ्या फंडामुळे अनेक मत्ता त्याला परिचित होतात. त्यामुळे त्याच्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ विविधांगी होतो. मल्टिअॅसेट फंड पारंपरिक अॅसेटमध्ये गुंतवणूक करणारे असू शकतात. यामध्ये इक्विटी व बाँडचा प्रामुख्याने समावेश होतो. त्याचवेळी काही मालमत्ता व वस्तू यांसारख्या नव्या मत्तांमध्ये गुंतवणूक करणारेही असतात.
इक्विटी व बाँड यांचे मिश्रण असलेला पोर्टफोलिओ असले तर त्यात जोखीम कमी असते. यामध्ये कदाचित इक्विटीपेक्षा कमी परतावा मिळत असेलही, परंतु यात जोखीम कमी असते. यातील काही परतावा हा स्थिर असतो. अॅसेटमध्ये विखरून पैसा गुंतवल्यास जोखमीमध्ये संतुलन राहते आणि स्थिर उत्पन्नाकडे वाटचालही सुरू होते.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रत्येक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment