Monday, 25 April 2016

अंडर वर्ल्ड डॉन दावूद इब्राहिमला गैंगरीन

भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला गॅंगरीन झालं असून दाऊदचा पाय कापला गेला नाही तर त्याच्या संपूर्ण शरीरात संसर्ग होऊन त्याचा त्याचा मृत्यूही होऊ शकतो, असे वृत्त अनेक वृत्तवाहिन्यांनी पाकिस्तानातील सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. 'दाऊदच्या पायाचा बराचसा भाग सडला आहे. हे गॅंगरीन बरे होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे पाय कापण्याशिवाय गत्यंतर नाही', असे दाऊदवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचं म्हणणं असल्याचं वृत्त 'सीएनएन-न्यूज १८'ने दिलं आहे. पाकिस्तानातील लियाकत नॅशनल हॉस्पिटल आणि मिल्ट्री हॉस्पिटलचे डॉक्टर दाऊदवर उपचार करत आहेत. उच्च रक्तदाब आणि मधुमेह यामुळे दाऊदला गँगरीन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दाऊदचा मृत्यू ओढवू शकतो इतक्या शेवटच्या स्टेजला त्याचं आजारपण गेलं आहे, असंही डॉक्टरांनी नमूद केलं. पाकिस्तानात आयएसआयकडून दाऊदची बडदास्त ठेवली जात असून कराचीबाहेर त्याला नेणं शक्य नसल्याने कराचीतच त्याच्यावर उपचारांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिली. दाऊदने वयाची साठी गाठली असून १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात दाऊद मुख्य आरोपी आहे. दाऊदने टायगर मेमन, याकूब मेमन व अन्य साथीदारांच्या मदतीने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवले होते. या स्फोटांमध्ये २५७ जण ठार तर ७१७ जण जखमी झाले होते. गेल्यावर्षी या प्रकरणातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली. मोबाईल अॅप डाउनलोड

No comments:

Post a Comment