Thursday, 28 April 2016

हाजी अली दर्ग्यात प्रवेश पासून तृप्ति देसाई ला रोखल

ruptidesaiarrest AAA मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई शनिचौथरा, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासाठी यशस्वी आंदोलन करणाऱ्या पुण्यातील भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांना आज मुंबईतील हाजी अली दर्ग्याबाहेर तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. दर्ग्यात प्रवेश करण्याआधीच परिस्थिती चिघळण्याची भीती लक्षात घेऊन पोलिसांनी देसाई यांना रोखलं. दरम्यान पोलिसांच्या या अटकावाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्यासाठी देसाई कार्यकर्त्यांसह 'वर्षा' निवासस्थानाकडे निघाल्या होत्या. मात्र ब्रीच कॅण्डी रुग्णालयाजवळच गावदेवी पोलिसांनी त्यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. देसाई यांना नंतर आझाद मैदाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून देसाई यांनी 'हाजी अली सबके लिए' या फोरमची स्थापना केली आहे. या फोरमने आज दुपारपासूनच दर्ग्यापासून ५० मीटर अंतरावर आंदोलन सुरू केलं होतं. त्याचवेळी देसाई यांना विरोध करणाऱ्या समाजवादी पार्टी, एमआयएमचे कार्यकर्तेही दर्ग्याजवळ जमले होते. दरम्यान, रात्री ७.३० च्या सुमारास देसाई यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह दर्ग्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांनीच रोखलं. त्यावेळी पोलीस आणि देसाई यांच्यात काहीशी शाब्दिक चकमकही झडली. या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत देसाई यांनी आम्ही आता मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार आहोत, असं सांगितलं. 'हेच अच्छे दिन आहेत का?' असा सवाल करताना मुख्यमंत्र्यांची भेट झाली वा नाही झाली तरी आम्ही त्यांच्या घराबाहेर ठिय्या देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानावर धडक देण्यासाठी देसाई व भूमाता ब्रिगेडच्या महिला निघाल्या असता ब्रीच कॅण्डी रुग्णालयाजवळ त्यांना रोखण्यात आलं. गावदेवी पोलिसांनी देसाईंसह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, हाजी अली प्रवेश आंदोलनाला विरोध करणाऱ्यांनी आपल्याला गाडीतून उतरूही दिलं नाही. दर्ग्याजवळ माझ्या गाडीची काच फोडण्यात आली असा आरोप, देसाई यांनी केला आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि रा

No comments:

Post a Comment