Thursday, 26 May 2016

जूनियर लक्ष्या येतोय रे - अभिनय बेर्डे

मुंबई टाइम्स टीम नेहमीप्रमाणेच विलेपार्ले इथल्या रामानंद सोसायटीतल्या रहिवाशांची सकाळ झाली. ​ थोड्या वेळानंतर लक्षात येतं की पार्लेकर सतीश राजवाडे या सिनेमाचं दिग्दर्शन करत असतात आणि सिनेमाचे नायक-नायिका असतात अभिनय बेर्डे अर्थात, 'ज्युनिअर लक्ष्या' आणि आर्या आंबेकर. वेळ सकाळची.. नेहमीप्रमाणेच विलेपार्ले इथल्या रामानंद सोसायटीतल्या रहिवाशांची सकाळ झाली. पण ही सकाळ नेहमीपेक्षा थोडी वेगळी होती. खाली परिसरात हाकारे ऐकू येत होते. मोठे रिफ्लेक्टर्स लागले होते. यावरून कुठल्यातरी सिनेमाचं शूटिंग इथे चालू आहे हे सहज लक्षात यावं. थोड्या वेळानंतर लक्षात येतं की पार्लेकर सतीश राजवाडे या सिनेमाचं दिग्दर्शन करत असतात आणि सिनेमाचे नायक-नायिका असतात अभिनय बेर्डे अर्थात, 'ज्युनिअर लक्ष्या' आणि आर्या आंबेकर. 'लिटल चॅम्प' आर्या आंबेकरची ओळख आपल्याला नवी नाही. केतकी माटेगावकरच्या पाठोपाठ आणखी एक गायिका आता अभिनेत्री बनणार आहे. तर तिच्यासोबत आहे अवघ्या महाराष्ट्राला खदखदून हसवणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय. यापूर्वी युवा महोत्सवातून अभिनय चमकला होता. त्याच्या 'भोग' एकांकिकेला पारितोषिक मिळालं होतं. शिवाय, अभिनयच्या अभिनयाची दखलही घेण्यात आली होती. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं होतं. आता सतीश यांच्या सिनेमातून तो मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. सलग सात दिवस सिनेमाचं शूट रामानंद सोसायटीत होणार आहे. पहिल्या दिवशी शूट झालं ते आर्या आणि अभिनयचं. आर्या टू व्हीलरवरून येते आणि अभिनय तिला भेटायला खाली येतो असं ते दृश्य होतं. सध्या या सिनेमाचं नाव सध्या 'टीएसकेके' असं ठेवण्यात आलंय. सतीश किंवा सिनेमाच्या टीममधलं कुणीही सिनेमाबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत. Whatsapp Facebook Google PlusTwitter Email

No comments:

Post a Comment