Sunday, 3 December 2017

सासनकाठी मिरवणूक

सासनकाठी मिरवणुक संपादन करा रत्नासुर व कोल्हासुर या राक्षसांनी अत्याचार सुरू केला होता. तेव्हा करवीर निवासनी श्री महालक्ष्मीने केदारनाथांचा (जोतिबा) धावा केला. तेव्हा जोतिबा देवाने राक्षसांचा संहार केला. हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले, तेव्हा महालक्ष्मी व चोपडाई देवीने त्यांना वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. सोहळ्यास यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते. त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेबनात येते. तेव्हापासून केदारनाथ चैत्र पौर्णिमेस श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी सासनकाठी लवाजम्यासह जातात. हीच चैत्र यात्रा होय. चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. . सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो,त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार फक्त संत नावजीनाथच्या किवळ काठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण् देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान इनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा,त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठ्यांच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होते.फक्त संत नावजीनाथ किवळ (जि. सातारा) याच सासनकाठीला यमाई मंदिराच्या दारात उभे राहण्याचा मान आहे.सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होतो. त्यानंतर 'श्रीं'ची पालखी व संत नावजीनाथांची सासन काठी परत श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होते. मंदिर

No comments:

Post a Comment