उभे राहून पाणी पिण्याच्या सवयीमुळे होणारे नुकसान :
१. किडनीचे विकार :
किडनीचे काम असते पाण्याचे फिल्टर करणं. उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी किडनीमधून योग्य रीतीने फिल्टर न होता वाहून जाते. वेळेसोबत तुमच्या मूत्राशय आणि रक्तामध्ये घाण जमू लागते. जर हीच स्थती जास्त काळापर्यंत राहिली तर मूत्राशय, हृदय आणि किडनीचे विकार होऊ शकतात.
२. पोटाचे आजार :
उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी अन्ननलिकेद्वारा वेगाने खाली वाहून जाते आणि पोट आतल्या द्वारातून आणि आसपास च्या अंगावर पाणी जोराने धार पडल्यामुळे तिथे क्षती पोहोचते. सारखं सारखं असं होण्याने पचनतंत्र बिघडते. ह्यामुळे हृदयाला सुद्धा नुकसान पोहोचु शकते.
३. संधिवात :
जर तुम्ही उभे राहून पाणी पीत असाल तर भविष्यात तुम्हाला संधिवात सारखे भयंकर आजार जडू शकतात. कारण उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरातील द्रव पदार्थाचे संतुलन बिघडते. पाणी सरळ तीव्र वेगाने खालच्या दिशेने जाते जे सांध्यांमध्ये असलेल्या द्रवपदार्थांचे संतुलन बिघडवून तिथे गोठण्याची प्रक्रिया सुरु होते. ज्यामुळे सांधे दुखी आणि गाठ येण्यासारख्या समस्या निर्माण होतात.
४. तहान अपूर्ण राहते :
उभे राहून पाणी प्यायल्याने लवकर तहान भागत नाही. आणि आयुर्वेदामध्ये सांगितले आहे कि पाणी असे प्यायचे असते जसे खात आहात आणि अन्न असे खा कि जसे पीत आहात. अर्थात अन्न असे चावून खा कि त्याचे पाणी बनेल.
५. अपचन :
उभे राहून पाणी प्यायल्याने पोटाला अराम मिळत नाही, पोटावर अधिक जोर पडतो, बसून पाणी प्यायल्याने पोटाला अराम मिळतो ज्यामुळे पोट अजून चांगल्या पद्धतीने कार्य करते.
६. शरीरावरील ऍसिडिटीवर संतुलन ठेवते :
उभे राहून पाणी प्यायल्याने शरीर आम्लावर (ऍसिड) संतुलन करू शकत नाही. ज्यामुळे शरीरावर ऍसिडचे प्रमाण वाढत जाते आणि ऍसिडिटीसोबत अनेक समस्या निर्माण होतात.
७. अल्सर आणि हृदयात जळजळ :
उभे राहून पाणी प्यायल्याने जळजळ आणि अल्सर सारखे आजार होऊ शकतात. अश्या मध्ये अन्ननलिकेच्या खालच्या भागात वाईट परिणाम पडू शकतो. जिथून पुन्हा reflex परत येते. आणि ते Sphincter ला अडथळा निर्माण करतात. ज्याकारणाने छाती आणि हृदयात जळजळ होते आणि अल्सर सारख्या रोगांना आमंत्रण मिळते.
८. नसांमध्ये तणाव :
जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा शरीराची “fight and flight system” एक्टीव्हेट होते. ज्यामुळे सर्व नसांवर ताण पडतो. ह्याच्या विरुद्ध जर तुम्ही बसून पाणी पीत असाल तर ‘rest and digest system’ Activate होऊन जाते. जे सर्व इंद्रियांना शांत करते, ज्यामुळे पचन संस्था चांगली राहते.
तर समजलात ना तुम्ही. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जेवढे जास्त पाणी पिणे गरजेचे आहे तितकेच जास्त गरजेचे योग्य रीतीने पाणी पिणे आहे. जर तुम्हीसुद्धा उभे राहून पाणी पित असाल तर आताच हि सवय बदला आणि बसून पाणी पिण्याची सवय लावून घ्या.
No comments:
Post a Comment