स्मरूंनी तुला उभी आहे तुझ्या दरबारी
प्रार्थना कराया अंतरीचा हा खेळ सारीपाटावरती
अश्रुंनी सजवली तुझ्या फुलांची टोकरी
दु:खानच्या भावनांनी सजवला हा हार ही
अंतरिक मनाच्या भावनांनी सजवली ही
दीपवात आरती.....
घंटा किणकिनाद खरा वाजे चौफेरी
प्रगट होशील आता तरी डोळे दिपून जातील खरी
प्रसन्न मन चित्त तत्त्व विसरुनी
आयुष्य तुझ्या चरणी ठेवीते हेच मी
घेशील मला कवेत तू ना
पुढचा प्रवास हा माझा तुझ्या खांद्यावरी
संपता संपता उभी राहिले खरी
हीच तुझी परीक्षा समजूनी
माझ्या भावनांना वाट दिलीस
तुझ्या ह्या आशिर्वादानी....
आरती लोटलीकर.
No comments:
Post a Comment