Wednesday, 14 December 2016

व्यक्ती आणि वल्ली

आपल्या रोजच्या आयुष्यातही आपल्याला निरनिराळ्या प्रवृत्तीचे लोक भेटत असतात. याचप्रकारे प्रत्येक कंपनीमध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी विविध स्वभाव असलेल्या व्यक्ती सहवासात असतात. या सगळ्यांशी जुळवून घेतच आपल्याला काम करावं लागतं. खाली काही दिलेल्या स्वभावाची माणसं प्रत्येकाच्या कंपनीमध्ये हमखास आढळतात. धोका पत्करणारी एखादी नवीन गोष्ट, धाडसी संकल्पना कंपनीमध्ये मांडताना या व्यक्ती दिसतात. नवे विचार, कल्पना कंपनीमध्ये आणण्यासाठी हे लोक उत्सुक असतात. आव्हानं स्वीकारायलाही नेहमी तयार असतात. आपल्या मतावर ठाम तसंच अपयशाला तोंड द्यायला तयार असण्याची त्यांची मानसिकता असते. कंपनीमध्ये बदल घडवण्यासाठी धाडसाचे निर्णय घ्यायची या लोकांची तयारी दिसून येतेय. अशा स्वभावाच्या व्यक्ती कंपनीमध्ये जरूर असाव्यात. वर्षानुवर्षं तेच काम, कामाची तीच पद्धत या लोकांना अजिबात आवडत नाही. वेळेचं बंधन ठेवता काम करणारे या लोकांना कामासाठी वेळेचं बंधनच नसतं. उशिरापर्यंत काम करताना या व्यक्ती दिसतात; पण जास्तीचं काम करणंही या व्यक्ती आनंदानं करतात, कारण त्यांना काम करणं आवडतं. ज्या कंपनीचे परदेशी कंपनीबरोबर व्यवहार आहेत, त्या कंपनीमध्ये परदेशी कंपनीच्या वेळेनुसार त्यांच्याशी बोलायला अगर व्यवहार करायला अशा व्यक्तींची खूप मदत होते, कारण कोणत्याही वेळी काम करायला या व्यक्ती तत्पर असतात. कामाबद्दल ते नेहमी जागरूकही असतात. मस्तमौला या व्यक्ती कंपनीमधील केवळ सहकारीच नसतात, तर चांगले मित्रही बनतात. मित्र आणि उत्तम मार्गदर्शक अशा या व्यक्ती असतात. यांचा हसताखेळता आणि मनमिळाऊ स्वभाव कंपनीमधील वातावरण प्रसन्न, टेंशन फ्री ठेवतो. दुसऱ्याला मदत करायला या व्यक्ती पुढे असतात. अडचणीच्या प्रसंगी दुसऱ्याचं काम करायला, त्याची मदत करायला यांना आवडतं. टेंशन नही लेनेका..बोले तो बिनधास्त रेहनेका असा यांचा स्वभाव असतो.. उत्साहाचा झरा सदैव उत्साहानं भरलेल्या या व्यक्ती असतात. नवनवीन आव्हानांना तोंड द्यायला या व्यक्ती घाबरत नाहीत. एखादं काम जितकं लवकर संपवता येईल, तितक्या लवकर संपवून या मोकळ्या होतात. एक-दोन महिन्यातून भन्नाट ट्रिपचं प्लान करण्यात त्यांचा पुढाकार असतो. वैयक्तिक आयुष्यातही नेहमी उत्साही असतात. सतत कार्यतप्तर सतत कामामध्येच व्यग्र असं या व्यक्तींचं स्टेटस असतं. स्वभावानं गरीब आणि कुणी सांगेल ते काम करणाऱ्या या व्यक्ती असतात. घरी काम, ऑफिसमध्ये काम असंच त्यांचं स्वरुप असतं. त्यांच्या अशा स्वभावामुळे हे लोक ताणतणावाखाली असतात. या व्यक्तींचा फायदा इतर लोकांकडून अनेकदा घेतला जातो. चुगल्या करणारे एकमेकांविषयी चुगल्या करणं, चुकीचे संदेश देणं, गट पाडणं आणि भांडणं लावून देणं ही कामं करण्यात या लोकांना जास्त रस असतो. या लोकांच्या सतत नकारात्मक बोलणं, दुसऱ्याच्या चुका काढणं, नावं ठेवणं अशा सवयींमुळे ऑफिसमधलं वातावरण बिघडतं. अशा लोकांपासून दूर राहणं आणि त्यांच्यावर जास्त विश्वास न ठेवणंच योग्य असतं. ट्रबल शूटर कंपनीमध्ये काही समस्या उद्भवल्यास त्या चुटकीसरशी सोडवण्यात हे लोक अग्रेसर असतात. कुठलीही अडचण आल्यास त्यावर या लोकांकडे उपाय असतो. या लोकांकडे संवादकौशल्य चांगलं असतं. याबरोबर व्यावहारिक ज्ञानाचीही चांगली जाण असते. अशा व्यक्तींमुळे कंपनीला चालना मिळतेच; शिवाय समस्यांवर लगेच तोडगा काढण्याच्या सवयीमुळे कामाची गतीही राखली जाते. प्रत्येक कंपनीमध्ये अशा व्यक्ती जरुर असल्या पाहिजेत. दुरून डोंगर साजरे जे काम, जी परिस्थिती समोर येईल त्याला सामोरं जाणं हा यांचा स्थायी स्वभाव. यांच्याकडे कंपनीबाबत नवीन कल्पना, नवे विचार असतात; पण घाबरून अथवा संकोचल्यामुळे या व्यक्ती ते व्यक्त करत नाहीत. फक्त रोजचं काम करणं आणि तेवढ्यास तेवढा संबंध ठेवणं असं यांचं वागणं असतं. बहुतांश लोकांचा हा स्वभाव असतो. गॉसिपकिंग गॉसिपिंग करणं, कुजबुजणं होत नाही अशी एकही कंपनी तुम्हाला सापडणार नाही. एकमेकांविषयी चुगल्या करण्याची सवय बऱ्याचजणांना असते. दुसऱ्याच्या कामाविषयी, स्वभावाविषयी कुजबुजण्याचा या लोकांचा उद्योग असतो. या लोकांना स्वत:च्या कामापेक्षा दुसऱ्याच्या कामातच जास्त रस असतो. त्यामुळेच कंपनीत मतभेत निर्माण आणि वादविवाद होतात. संकलन -ओंकार कुलकर्णी प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट Whatsapp Facebook Google PlusTwitter Email SMS Web Title: office, man, types (Marathi News from Maharashtra Times , TIL Network) मनोरंजन 00:27 'कॉफी विथ करण' मध्ये सलमान हरला ही पैज 00:23 ह्रतिक रोशन ठऱला जगातील तिसरा हॅण्डसम मॅन 00:27 दीपिकाचे हॉट फोटो शुट 00:28 रणबीर, जॉन, अभिषेक आणि फुटबॉल 00:33 ब्रेक अप झाले असेल तर कारण नक्की असणार: आलिया 01:56 करिश्मा कपूर आपल्या 'प्रियकरा'सोबत राहणार? 00:27 कतरिना आणि दीपिका एकत्र! 00:30 मी सहज भावूक होतो; डोळ्यातील अश्रू खरे असतात: आ... 01:42 सोनमनेही सोसला होता विनयभंगाचा आघात 00:21 आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जीची 'डिनर डेट' 02:20 मलायका अरोराला अफवांनी फरक पडत नाही! आणखी मनोरंजन फॅशन बाल्ड इज बोल्ड नववधू, बॅग भरली? लग्नात दिसा सुंदर फेस्टिवलची धूम, फॅशनवर झूम आणखी फॅशन एक दृष्टिक्षेप बातम्या: महाराष्ट्र देश थोडक्यात बातमी विदेश सिटी न्यूज अर्थ क्रीडा संपादकीय सिनेमॅजिक करिअर लाइफस्टाइल इन्फोटेक भविष्य हसा लेको लाइव टीव्ही इतर फोटो धम्माल व्हिडिओ फोटोगॅलरी इन्फोग्राफिक्स सिटीझन रिपोर्टर आमच्या इतर साइट्स: தமிழ்తెలుగుമലയാളംবাংলাગુજરાતીहिन्दीಕನ್ನಡEnglish आमच्या बद्दलवापर अटीडेस्कटॉप आवृत्ती Copyright © 2016 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights: Times Syndication Service

No comments:

Post a Comment