अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो
सुंदर ध्यान साजिरे तुम्ही ,स्वामी राया माझे हो,
पंढरपुरीत विठ्ठल तुम्ही, दक्षिणेत बालाजी हो
कैलासावर तुम्हीच बसला, सदगुरु स्वामी राया हो!!!
स्वामी समर्था तुम्हीच पाठी, निर्भय असा मी झालो हो
संकटात उभा पुढे मी, सावरले राया तुम्ही हो
चूक झाली माझी समर्था, हात जोडतो तुम्हा हो
अनंत पाप गिळूनी माझे , माफ करा स्वामी राया हो !!!
तेज डोळे बघती मजला ,रुद्राक्ष हाती शोभते हो
कंबरेवर हात ठेवून ,जणू विठ्ठल दारी उभा हो
पावन झाले अक्कलकोट ,स्पर्श तुमचा झाला हो
नतमस्तक मी चरणी तुमच्या, सदगुरु स्वामी राया हो !!!
आज आलो दारी तुमचा, पापमुक्त मी झालो हो
अशीच कृपा असू द्या राया आपल्या या स्वामीभक्ता हो
बालक तुमचा आई तुम्ही, रडतो तुमचा चरणी हो
तूची एक स्वामी समर्था अगाद तुमची करणी हो !!!
अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो
सुंदर ध्यान साजिरे तुम्ही ,स्वामी राया माझे हो !!!
!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री गुरूदेव दत्त दत्त !!
स्वामी सकाळ
Friday, 30 December 2016
अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment