|| श्री गुरुचरित्र अवतरणीका ||
दिवस चवथा
दत्त जयंती पर्यंत श्री गुरुचरित्र अवतरणीका रोज सर्वानी वाचायची आहे. ज्या साधकाची अवतारणीका वाचून होइल त्यानी comment मधे श्री गुरुदेव दत्त type करायचे आ हे.
श्री गणेशाय नम : श्रीगुरुदेवद्त्तात्रेय चरणा राविन्दाभ्या नम:||गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:||
गुरुरेव परं ब्रह्म तस्में श्रीगुरुवे नम:||श्रोते व्हावे सावधान || श्रीगुरुचरीत्राधाय बावन्न ||
ऐकोनी नामधारकाचे मन || ब्रह्मानंदी निमग्न पै || म्हणोनी नामधारक विनवीत || सिद्धाचे चरणी लागत ||
म्हणे श्रीगुरुचरित्रामृत || अवतरणीका मज सांगा || या श्रीगुरुचारीत्रामृती || भक्त जनांची मनोवृत्ती ||
बुडी देवोनी स्थिरावली || अतुप्त आहे अजुनि || हेची कथा पुन्हा सुचवोनी || अक्षयामृत पाजूनी ||
आनंद सागरी मज ठेवा || बहु औषधींचे सर काढोन || त्रयलोक्य चिंतामणी रसायण || संग्रह करिती विचक्षण ||
तैसे सार मज सांगा || ऐकोनी शिष्याची प्रार्थना || आनंद सिद्धाचिया मना || म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्रीगुरूचरित्री||
श्रीगुरुचरीत्राची ऐका || सांगे आता अवतरणीका || प्रथमपासून सारांशनिका बावानाधायापर्यंत||प्रथमाध्यायी मंगलाचरण ||
मुख्य देवतांचे असे स्मरण || श्रीगुरुमुर्तीचे दर्शन || भक्ताप्रती जाहले ||१ || द्वितीयाध्यायी ब्रःम्होत्प्ती || चारी युगांचे भाव
कथिती || श्रीगुरुसेवा दीपकाप्रती || घडली ऐसें कथियेले ||२ || नामधारका अमरजा संगमा || श्रीगुरू नेती आपुले धामा ||
अंबरीष दुर्वास यांचा महिमा || तृतीयाध्यायी कथियेला ||३|| चतुर्थाध्यायी अनसूयेप्रती || छळावया त्रयमूर्ती येती || परी
तियेचे पुत्र होती || स्तनपान करिती आनंदे ||४ || पंचमी श्रीदत्तात्रय धरी || स्वये अवतार पिठापुरी || श्रीपाद्श्रीयावल्लभधारी||
तीर्थयात्रेसी निघाले ||५ || सहाव्यात लिंग घेउनी || रावण जाता गोकर्णी || विघ्नेश्वरे विघ्न करुनी || स्थापना केली तयाची ||६ ||
गोकर्ण महिमा असंख्यात || रायाप्रती गौतम सांगत || चांडली उद्धरली अकस्मात || सातव्या अध्यायी वर्णिती ||७ ||
मातापुत्र जीव देत होती || तयाप्रती गुरुकथा सांगती || शनी प्रदोष वृत्त देती || ज्ञानी करिती अष्टमी ||८|| नवमाध्यायी
रजकाप्रती || कृपाळू गुरु राज्य देती || दर्शन देऊ म्हणती पुढती || गुप्त झाले मग तेथे ||९ || तस्करी मारिला भक्त ब्राह्मण ||
तस्करा वधिती श्रीगुरू येऊन || ब्राह्मणाला प्राणदान || देती दशमाध्यायात ||१० || माधव ब्राह्मण करंजपुरी ||अम्बनामे त्याची नारी ||
नरसिहसरस्वती तिचे उदरी || एकादशी अवतरले ||११ ||द्वादशाध्याई माते प्रती || ज्ञान कथुनी पुत्र देती || काशीक्षेत्री संन्यास घेती ||
यात्रा करिती उत्तरेची ||१२ || मातापित्यांचे करंजपुरी || भेटुनी येती गोदातिरी || कुक्षिव्यथेच्या विप्रावरी || कृपा करती त्रयोदशी ||१३ ||
क्रूर यवनाचे करुनी शासन || सायंदेवास वरदान || देती श्रीगुरू कृपा करून || चौदाविया अध्यायी ||१४ || पंचदर्शी श्रीगुरुमूर्ती ||
तीर्थे सांगती शिष्यांप्रती || यात्रे दवडुनी गुप्त होती || वैजनाथी श्रीगुरू ||१५ || षोडशी ब्राह्मण गुरुभक्ती || कथूनी दिधली ज्ञानशक्ती ||
श्रीगुरुआले भिल्लवडीप्रती || भुवनेश्वरी सन्निध ||१६ || भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण || जिव्हा घेदोनी करी अर्पण || त्यास श्रीगुरुंनी विद्या देऊन || धन्य
केला सप्तदर्शी ||१७ || घेवडा उपटोनिया दारिद्रियाचा || कुंभ दिधला हेमाचा || वर्णिला प्रताप श्रीगुरूंचा || अष्टादशाध्यायात ||१८ || औदुंबराचे करुनी वर्णन ||
योगीनीस देउनी वरदान || गाणगापुरास आपण || एकोणविशी श्रीगुरू गेले ||१९ || स्त्रियेचा संमंध दवडून || पुत्र दिधले तिजला दोन || एक मरता कथिती
ज्ञान || सिद्धरूपे विसाव्यात ||२० || तेची कथा एकविशी || प्रेत आणिले औदुंबरापाशी || श्रीगुरू येउनी तेथे निशी || पुत्र उठविती कृपाळू ||२१ || भिक्षां
दरीद्र्या घरी घेती ||त्याची वंध्या महिषी होती || तीस करून दुग्धवती || बाविसाव्यात वर दिधला || २२ || तेविसाव्यात श्री गुरूस || राजा नेई गाणगापुरास ||
तेथे उद्धरती राक्षस || त्रिविक्रम करी श्रीगुरू निंदा ||२३ || भेटो जाती त्रिविक्रमा || दाविती विश्वरूप महिमा || विप्रलागे श्रीगुरुपाद्पद्मा || चोविसाव्यात वर
देती ||२४ || म्लेन्छापुढे वेद म्हणती || विप्रा ते त्रिविक्रमा छळती || त्याला घेउनी सांगाती || गुरूपाशी आला पंचविशी ||२५ || सव्विसाव्यात तया
ब्राह्मणा || श्रीगुरू सांगती वेदरचना || त्यागा म्हणती वाद कल्पना || परी ते उन्मत नायकती ||२६ || सत्ताविशी आणोनी पतिता || विप्रासी वेद
वाद करिता || कुंठीत करोनी शापग्रस्ता || ब्रह्मराक्षस त्या केले ||२७ || अष्टाविशी तया पतिता || धर्माधर्म सांगोनी कथा || पुनरपि देऊन
पतितावस्था || गृहाप्रती दवडिला ||२८ || एकोनत्रीशी भस्म प्रभाव || त्रिविक्रमा कथिती गुरुराव || राक्षस उद्धरी वामदेव || हा इतिहास तयांतची ||२९ ||
त्रिशाध्यायी पती मरता || तयाची स्त्री करी बहु आकांता || तीस श्रीगुरू नाना कथा || कथून शांतवू पाहती ||३० || एकतिसाव्यात तेची कथा ||
पतिव्रतेचे धर्म सांगता || सहगमन प्रकार बोधिता || ते स्तियेते जगद्गुरु ||३१ || सहगमनी निघता सती || श्री गुरूस झाली नमस्कारिती || आशीर्वाद देवोनी तिचा
पती || बतीसाव्यात उठविला ||३२ || तेहतीसाव्यात रुद्राक्षधारण || कथा कुक्कुटमर्कट दोघेजण || वैश्य - वेश्यचे कथन || करिती रायाते परस्पर ||३३ ||
रुद्राध्याय महिमा वर्णन || चौतीसाव्यात निरुपण || राजपुत्र केला संजीवन || नारद भेटले रायाते ||३४ || पंचत्रीशप्रसंगात || काचदेवयानी कथा वर्तत || आणिक
सोमवार व्रत || सीमंतिनीच्या प्रसंगे ||३५ || छतिशी ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा || स्त्रियेने नेले परान्न भोजना || कंटाळुनी धरिती श्रीगुरुचरणा || त्याला कर्ममार्ग सांगती ||३६ ||
सप्तत्रिंशी नाना धर्म || विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म || प्रसन्न होवोनी वर उत्तम ||देती श्रीगुरू तयाते ||३७ || अष्टत्रिंशी भास्कर ब्राह्मण || तिघांपुरते आणिले अन्न ||
जेविले बहुत ब्राह्मण || आणिक गावचे शुद्रादी ||३८ || सोमनाथाची गंगा युवती साठ वर्षांची वंध्या होती || तीस दिथली पुत्र संतती || एकूणचाळीसावे अध्यायी ||३९ ||
नरहरी करवी शुष्क काष्टा || अर्चवूनी दवडिले त्याच्या कुष्ठा || शबर कथा शिष्य वारीष्टा || चाळीसाव्यात सांगती ||४० || एकेचाळीसी सायदेवा || हस्ते घेती
श्रीगुरुसेवा || ईश्वर पार्वती संवाद बरवा || काशीयात्रा निरुपण ||४१ || पुत्र कलत्रेसी सायंदेव || येऊनि करिती श्रीगुरुस्तव || त्याला कथिती यात्रा भाव || वरही
देती बेचाळीसी ||४२ || त्रेचाळीसी अनंत व्रत || धर्मराया कृष्ण सांगत || तेची कथा सायंदेवा प्रत || सांगोनी व्रत करविती ||४३ || चवेचाळीसी तंतुकार भक्तासी ||
श्रीपर्वत दावूनी क्षणेसी || शिवरात्री पुण्यकथा त्यासी || विमर्षण राजाची काथेयेली ||४४ || पंचेचाळीसी कुष्टी ब्राह्मण || आला तुळजापुराहून || त्याला
करवूनि संगमी स्नान || कुष्ठ नासुनी ज्ञान देती ||४५ || कल्लेश्वर हिपरगे ग्रामास || श्रीगुरू भेटती नरहरी कवीस || आपुला शिष्य करिती त्यास || शेचाळीसी अध्यायी ||४६ ||
सत्तेचाळीसी दिवाळी सण || श्रीगुरूसी आमंत्रिती सातजण || तितुकी रूपे धरुनी आपण || गेले मठीही राहिले ||४७ || अठेचाळीसी शुद्रशेती त्याचा जोंधळा कापूनी टाकिती ||
शतगुणे पिकवूनी पुढती || आनंदविले तयाते ||४८ || एकोनपंचाषति श्रीगुरुमूर्ती || अमरजा संगम महात्म्य कथिती || आणिक हि तेथे सांगती || कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचे||४९ ||
म्लेन्छाचा स्फोटक दवडिती || भक्तिस्तव त्याचे नगरा जाती || पुढे श्री पर्वती भेटो म्हणती || पन्नासावे अध्यायी ||५० || एकावन्नबावन्नात गुरुमूर्ती || देखूनिया क्षिती पाप
प्रवृत्ती || उपद्रवितील नाना याती || म्हणूनी गुप्तरूपे रहावे ||५१ || ऐसा करुनी निर्धार || शिष्यासी सांगती गुरुवर || आजि आंम्ही जाऊ पर्वतावर || मल्लिकार्जुन यात्रेसी ||५२ ||
ऐसें ऐकुनी भक्तजन || मनी होती अतिउद्विग्न || शोक करिती आक्रंदोन || श्रीगुरुचरणी लोळती ||५३ || इतुके पाहुनी श्रीगुरुमूर्ती || वरदहस्ते तया कुरवाळीती || मद्भजनी धरा
आसक्ती || मठधामी राहोनिया ||५४ || ऐसें बोधुनी शिष्यासी || गुरु गेले कर्दळीवनासी || नाविक मुखे सांगूनी गोष्टीसी || निजानंदी निमग्न होती ||५५ || ऐसें अपार गुरुचरित्र ||
अनंत कथा परम पवित्र || त्यातील बावन्न अध्याय मात्र ||प्रस्तुत कथिले तुजलागी ||५६ || सिद्ध म्हणे नामधारका || तुज कथिली अवतरणिका || श्रीगुरू गेले वाटती लोका || श्रीगुरू गुप्त असती गाणगापुरी ||
कलियुगी अधर्म वृद्धी पावले || म्हणोनी श्रीगुरू गुप्त झाले || भक्तजनाला जैसे पाहिले || तैसे भेटती अद्यापि || ५७ || हे अवतरणिका सिद्ध माला || श्रीगुरू भेटती जपे त्याला ||
जैसा भावार्थ असे आपुला || तैसी कार्ये संपादिती ||५८ || श्रीगुरुरायांचे धरू चरण || सिद्ध मुनिते करू वंदन || नामधारका करू नमन || ऐसें करी नारायण || श्रीगुरू रुपी
नारायणा || विश्वंभरा दीनोद्धारणा || आपणा आपुली दावूनी खुणा || गुरु शिष्यरूपे क्रीडसी || इति श्रीगुरुचरीत्रामृते श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अवतरणीका
नामोध्याय: समाप्त : ||
|| श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु ||श्री
No comments:
Post a Comment