Wednesday, 21 December 2016
माउली माउली माउली माउली
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हो …
तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भीमेची निघाली
तुझ्या नाम घोषात इन्द्रायणी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हो …
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा
दाटला मेघ तू सावळा
मस्तकी चंदनाचा टिळा
लेऊनी तुळशी माळा गळा ह्या
पाहसी वाट त्या राऊळा
आज हारपलं देहभान
जीव झाला खुळा बावळा
पाहन्या गा तुझ्या लोचनात
भाबड्या लेकरांचा लळा
हो …
भिडे आसमंत ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
चालला गजर जाहलो अधिर
लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन
आता पाहीन पांडुरंगाला
देखीला कळस डोईला तुळस
धावितो चान्द्रभागेशी
सामीपही दिसे पंढरी
याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता
तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या
पायरी ठेवतो माथा
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली
!! पुंडलिक वरदे हारि विठ्ठल !!
!! श्री ज्ञानदेव तुकाराम !!
!! पंढरीनाथ महाराज की जय !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment