Sunday, 18 December 2016

असे पातकी मी दीन स्वामी राया

असे पातकी मी दीन स्वामी राया l
पदी पातलो सिध्द व्हा उध्दराया ll
नसे अन्य त्राता जगी या दीनाला l
समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ll
मला माय न बाप न आप्त बंधू l
सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ll
तुझा मात्र आधार या लेकराला l
समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ll
नसे शास्त्र विद्या कलादीक काही l
नसे द्न्यान,वैराग्य ते सर्वथा ही ll
तुझे लेकरु ही अहंता मनाला l
समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ll
प्रपंची पुरा बध्द झालो दयाळा l
तुझा दास मी ही स्मृती मनाला ll
क्षमेची याचना त्वदपदाला l
समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ll
मला काम क्रोधाधिके नागविले l
म्हणोनी समर्था तुला जागविले ll
नको दूर लोटू तुझ्या सेवकाला l
समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ll
नको अंत पाहू त्वरे धाव घेई l
तुझ्याविण नाही दुजी श्रेष्ठ आई ll
अनाथासी आधार तुझा दयाळा l
समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ll
कधी गोड वाणी न ये मुखाला l
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ll
कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला l
समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ll
मला एवढी घाल भिक्षा समर्था l
मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ll
घडो पाद सेवा, तुझ्या किंकराला l
समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ll

श्री स्वामी समर्थाय,नमो,नमो,नमो नम: ll

1 comment:

  1. श्री स्वामी समर्थ..🙏

    ReplyDelete