कुलस्वामिनी - श्री यल्लम्मा/ यमाई देवी नमो नमः
जय जय यमाई कुलस्वामिनी, जय जयअंबा मूलपीठवासिनी l
जय जय भवानी भवमोचंनी, जय जय शिव मनरंजनी ll
तू ते आहे विश्वजननी , तुझी माया सहस्त्र गुणी l
सत्वर येऊनि रक्षण करुनी, पावन करी जगदंबे ll
ऐसे ऐकोनि करुणावाणी, सत्वर धावे जगत्रयजननी l
आले आले म्हणोनि, आकाश ध्वनी उठला ll
कवण्या दृष्टे माझा भक्त, गांजिला म्हणोनि अंबा तप्त l
धावे तेव्हा पाताळ सप्त, दणाणीले भयंकर ll
सिंहारुढ होऊनी जगज्जननी ,खड्ग झाडी क्षणोक्षणी l
पवन वेगे करुनि ,भक्त सदना पातली ll
कोटी विजेचा काढिला गाभा ,कोटी वीजेची पडली प्रभा
ऐसी दैदिप्यमान अम्बा ,भक्ते दृष्टी देखिली ll
अज्ञान अंधकार सरला ,भक्त हृदयी आनंद झाला l
ज्ञानसूर्य प्रकाशला ,मनीचा गेला अहंभाव ll
चरणीची भूषणें करिती गजर
तेणेचि नादे प्राणा मुकले असुर l
पायी ब्रीदाचा तोडर, तोचि तारी पतिता ll
कर्दळी गर्भाचे परी ,मांडीया कोमल वेश्टील्या चिरी l
क्षुद्र किँकिणिच्या हारी ,माजि बांधिला सुजडित ll
कोटी विजांचा भडीमार , तैसे तळपे कनकाम्बर l
नाभीपासुन मुक्ताहार ,गळा घातला अम्बेच्या ll
हृदय संधिमाजि पातक ,वाटे दडला तमांतक l
क्षिप्र सारूनिया देख हृदय निकटि संचला ll
तडीत प्राय पीत कंचुकि,अनंत अयुधे अष्ट हस्तकी l
शशी सुर्य सुवर्ण पंकी ,जडली तानवडे ll
वज्रचुडेमंडीत हस्त ,दशमुद्रिका लखलखीत l
कर्णि भूषणें असंख्यात,मुक्त घोस .डोलती ll
दैत्य मर्दिले प्रचंड ,स्फुरती अम्बेचे भुजदंड l
जे दंड करुनि अखंड ,दुष्ट मर्दीले पॄथ्वीचे ll
सुहास्य मुख विशाल नयन, माजी सुदयाचे अंजन l
सरळ नासिका अससी सुमन, तेवी भान नेटके ll
कर्दळी कोंदणी सतेज, हिरे जोडीले मुखीचे द्विज l
किंवा डाळिंबीयाचे बीज, अधरपुटी जोडीले ll
जडीत नाकीचे सुपाणी, तेणे शोभली जगज्जननी l
कपाळी मळवट भरुनी, भव्य भवानी साजिरी ll
भांगी भरला आरक्त सिंदूर, कस्तुरी टिळक भाळावर l
वेष्टूनी बांधला कंबरीभार, वरी मुकुट साजिरा ll
जैसे ओळीने जोडीले भास्कर ,तैसे मुकूटमणी अपार l
मयूरपिच्छे मुकुटावर, तुरा खोविला अंबेने ll
कवडी दर्शनाचा हार, अपार रुळती धरणीवर l
ऊर्ध्व हस्ते त्रिशूळ डोर, झेलीत असे जगदंबा ll
ऐसी भगवतीची मूर्ती, निजभक्ते देखिली अवचिती l
नमस्कारुनी परम प्रीती,चरण धरिले अंबेचे ll
कंठ दाटला प्रेम भरून, मुखी न निघे काहि वाचन l
नयनोदके चरणक्षालन, दाटला पूर्ण गहिवरे ll
ऐसे देखोनि तत्क्षणी, प्रसन्न झाली त्रिजगज्जननी l
मस्तकी ठेविला वरदपाणी, अमृतवाणी बोलली ll
आता माग इच्छित मना, जे तव असेल मनकामना l
ते पूर्ण करीन जाण मना, न सरे सहसा दुसरेने ll
आत्मानुभवे बोले वचन, तू न जाय माझे हृदयातून l
म्यां तुझे जे केले स्तवन, त्या स्तवनी प्रीत राहो तुझी ll
माता पिता देव गुरू, यांचे सेवेत बैसो अत्यादरु l
तुझ्या कृपेने आयुष्य मेरू, न ढळे ऐसे तू करी ll
दिधले म्हणोनि बोले वाणी, आता तू न भी अंतःकरणी l
तुझ्या मनीची इच्छा झणी, पूर्ण केली निर्धारें ll
ऐसे बोलोनि वरद वाणी, प्रसन्न मुख जगज्जनंनी l
भक्तांचीये हृदय सदनी, तैसीच मूर्ती ठसावली ll
मूळपीठ ते भक्त हृदये, तेथे अक्षय मूळ माये l
वास्तव करुनी नांदे स्वये, सह योगिनी समवेत ll
करुनी साष्टांग नमस्कार,विनंती करी वारंवार l
ऐसेच अंबेने निरंतर, मम हृदयी वसावे ll
इति श्री देवी भगवते, यल्लम्मा, यमाई महात्मे
तुरजा यमाई स्तोत्र सपूर्णमस्तु, ओम तत्सत
श्री जगदंबा यमाई तुरजांबार्पणमस्तु l शुभं भवतु ll
नमन जगदंबेस
ReplyDeleteखूप छान रचना !
ReplyDelete