Thursday, 17 September 2015

अष्टविनायक - मोरेगावचा मयुरेश्वर

ॐ गं गणपतये नमः ll

मोरेगावचा श्री मयुरेश्वर l देवांचाही जो परमेश्वर l
करू या वंदन प्रथम तयाला,कृपा त्याची लाभो सकला ll

सिंधु राजा धुंद होऊनी l बंदिवान करी सर्व देवही l
सुटकेसाठी त्या देवांनी l किती प्रार्थिले गजाननाला  ll

देई गजानन मग आश्वासन l धीर धरा हो देवा आपण l
गिरिजेपोटी जन्मा येऊन,करीन रक्षण अभय तुम्हाला ll

कैलासावर सती पार्वती l पुढे ठेऊनि गणेश मूर्ती l
डोळे मिटुनि पुजन करिती l प्रसन्न झाले देव सतीला ll

मूर्ती समोरील सजीव झाली,प्रसन्न वदनें हासत वदली l पुत्र तुझा मज समज माऊली,किती झाला हर्ष उमेला ll

अंडे फोडुनि पक्षी आला l स्वार त्यावर गणेश झाला l
मयुरेश्वर हा म्हणून गणला l मोरगावी तो सिध्द झाला ll

No comments:

Post a Comment