Sunday, 6 September 2015

केदारनाथा तुझ्या चरणी मी ठेवितो माथा

केदारनाथा तुझ्या चरणी मी ठेवितो माथा
गातो तुझे गोड गुण ध्यान मी
तुझा महिमा रे आदीनाथा   ll

ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर,त्रिगूणरूपी तु नाथ
राग चतुर्थ जमदग्नी हा म्हणुनी तु रवलनाथ
तु रे चतुर्भुजधारी ,अम्रुताचे पान करी
त्रिशूल डमरु हाती ,आली घोड्यावरती स्वारी
राजा दयाधना तुझे ज्योति स्वरुप अनंता
गातो तुझे गोड गुण ध्यान मी
तुझा महिमा रे आदीनाथा  ll

रक्तभोज अन् रत्नासुर ,दैत्य माजले ते भूवर
खड्ग हे हाती घेऊन नाथा केलांसी त्यांचा संहार
काळभैरव चर्पटअम्बा आदिशक्ती महामाया
घेऊनी ते शक्तीनिशी आली तुझ्या रे सहाय्या
मर्दोनी असुरांसि सुखी क्र अवनीं अनंता
गातो तुझे गोड गुण ध्यान मी
तुझा महिमा रे आदीनाथा  ll

किवळ ग्रामी नावजी भक्त नित्य घेई दर्शन
जाऊनी त्याच्या गृही तु नाथा झालासी प्रसन्न
रविवारी पौर्णिमेसी ,भक्त दर्शनासि येती
खारीक खोबरे दवणा गुलाल हा ऊधळिती
जौतिबाचा चांगभला ,दर्शन घेती तुज नाथा
गातो तुझे गोड गुण ध्यान मी
तुझा महिमा रे आदीनाथा  ll

No comments:

Post a Comment