Saturday, 19 September 2015

पालीचा बल्लाळेश्वर

ॐ गं गणपतये नमः l

बल्लाळेश्वर हा पालीचा
वर्षाव करो सदा कृपेचा  ll  धृ  ll

पल्लिपूर हे गाव ते
कल्याण हा राही तेथे
इंदुमति जी पत्नी त्याते
अगणित होता खजिना त्याचा ll1 ll

स्वर्गि सुखे नित घरी नांदती
तरीही दोघे उदास असती
संतान नसे त्यांच्या पोटी

कलंक तयांना निपुत्रिकाचा ll 2 ll
भक्ती भावे इंदुमतिने
गणरायाला घोर तपाने
प्रसन्न केले उपासनेने
पुत्र लाभला तिज नवसाचा ll 3ll

बल्लाळ दिले नाव तयाला
दिसमासे जो मोठा झाला
रात्रंदिन त्या ध्यास एकला
नाम गजर श्री गणरायाला ll 4 ll

सर्व मुले त्या सन्गतीतली
श्रींचे चिंतन करू लागली
उपासना ही ज्याची केली
प्रसन्न तो जाहला  ll 5ll

तुझ्या मुलाने मुले बिघडवली
गावांमध्ये ओरड झाली
बापाने मग खरड काढली
मारमारुनी पाठ फोडिली ll6ll

सुद बुध बल्लाळाची हरपली
प्रसन्न झाला तो विघ्नेश
पाली ग्रामी स्थित तो जाहला
वक्रतुंड श्री बल्लाळेश्वर  ll 7ll


No comments:

Post a Comment