Sunday, 6 September 2015

श्री जोतिबा प्रसन्न -गोड तुझे रुप नाथा

गोड तुझे रूप नाथा ,गोड तुझे ध्यान
पाहुनिया होई माझे ,मन समाधान  ll

त्रिशूल खड्ग पात्रं हाती ,शेषाचे आसन
डमरु नाद कानी पडता ,हरपते भान ll

कालभैरी चर्पट अम्बा ,शक्ति सहाय्य होता
राक्षसांचे मर्दन झाले ,रत्नागिरी माथां ll

नावजीच्या भक्तिसाठी ,धाव घेसी नाथा
त्रिशूल भुमीसी मारुनी ,धान्य दाविले अनंता ll

किती तुझे गुण गावे ,उणी पड़े वाणी
दीनानाथ लीन होई ,नाथांच्या चरणी ll

No comments:

Post a Comment