ॐ गं गणपतये नमः l
वरदविनायक महड गावी
स्तुती सुमने ही त्याच्या चरणीं ll धृ ll
गृतसमद मुनि हा ऋग्वेदातील
दुष्टा म्हणती जो मन्त्रातील
तुच्छ मानिति याज्ञिक मंडळी
जन्म तयाचा अनीतीमधुनी ll 1 ll
संतापुनिया जन निंदेने
निज मातेला निर्वाणिने
"कोण पिता मज ?" पुशिले त्याने
रुक्मानंद हा पिता भुवनी ll 2 ll
ग्रुत्समद मग मनात चिडला
शाप दिला झणि निज मातेला
"इंद्रपुत्र " हि नभात वाणी ll 3 ll
वैतागून तो वनात गेला
अष्टाक्षरीचा मंत्र ही जपला
त्यास विनायक प्रसन्न झाला
मूर्ति स्थापिली महड ठिकाणी ll 4 ll
No comments:
Post a Comment