उठा उठा हो सकलजन ,घेऊ नाथांचे दर्शन
प्रथम नंदी हर वंदुन ,चर्पट अम्बा वंदुया ll
वंदन करुनी गजानना ,घेऊ नाथांचे दर्शन
खारीक खोबरे गुलाल दवणा, श्री नाथांना वाहून ll
घालुनिया लोटांगण, मागु एकच मागणं
सुख शांती पुत्र पौत्र ,धन धान्य दे समाधान ll
ज्योतीबाचा चांगभला ,श्री नाथांना प्रार्थुन
नमन करुनी हनुमन्ता ,महालक्ष्मी वंदुया ll
कालभैरीसी वंदिता ,हरते संसाराची व्यथा
इथुन वंदुया जगन्माता ,मुळ पीठ येमाई ll
आदीनाथा वंदुन ,पुन्हां नाथांचे दर्शन
रामालिंगा वंदुन ,तुलसी माता वंदुया ll
काशी विश्वेश्वरा वंदुन ,घेऊ दत्ताचे दर्शन
परमयोगी अत्रिनंदन ,दीनानाथे वंदिला ll
No comments:
Post a Comment